Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शहरात १५ ऑगस्टपर्यंत CCTV कॅमेरे बसणार

$
0
0
शहरात मध्यवर्ती भागात १५ ऑगस्टपर्यंत ‘सीसीटिव्ही’ कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन ‘सीसीटिव्ही’ बसवणाऱ्या ठेकेदार कंपनीने पोलिस आयुक्तालयात झालेल्या समन्वय बैठकीत दिले आहे.

दिवसाआड पाण्याचा फज्जा

$
0
0
शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या पहिल्याच दिवशी काही ठिकाणी कमी दाबाने, तर काही भागांत वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

शिंदेवाडी ग्रामपंचायत अखेर बरखास्त

$
0
0
बांधकाम व्यावसायिक राठोड बंधूंच्या बांधकामांची बेकायदा नोंद केल्याबद्दल शिंदेवाडीची ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा आदेश सोमवारी महसूल प्रशासनाकडून काढण्यात आला. याप्रकरणी सरपंच-उपसरपंच आणि सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले.

शेवटच्या विद्यार्थ्यालाही ‘ऑनलाइन’च प्रवेश हवा

$
0
0
पारदर्शी पद्धतीने राबविण्यात आलेली अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया मध्येच न थांबविता शेवटच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळेपर्यंत राबविण्यात यावी.

राज्यातील १०० शाळांत ‘टाटा क्लासएज’ ई-लर्निंग

$
0
0
शैक्षणिक क्षेत्रासाठी खुल्या झालेल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून राज्यातील शंभरहून अधिक शाळांसाठी आता ‘टाटा क्लासएज’ ही अत्याधुनिक ई-लर्निंग यंत्रणा उपलब्ध होणार आहे.

पुरुषांच्या तुलनेत महिलांचे पोट सुटण्याचे प्रमाण अधिक

$
0
0
धकाधकीच्या जीवनात व्यायामाकडे होणारे दुर्लक्ष, फास्ट फूडचे वाढलेले प्रमाण आणि अयोग्य आहारपद्धतीमुळे पुण्यातील पुरुषांच्या तुलनेत महिलांचे पोट सुटण्याचे प्रमाण जास्त असल्याचे एका पाहणीतून निष्पन्न झाले आहे.

‘बीडीपी’त चार टक्के बांधकाम?

$
0
0
महापालिकेतील समाविष्ट गावांत जैववैविध्य उद्यानासाठी (बीडीपी) आरक्षित केलेल्या जमिनीवर चार टक्के बांधकाम करण्यास परवानगी देण्याची महत्त्वपूर्ण शिफारस नगररचना विभागाच्या संचालकांनी राज्य सरकारला केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

‘एटीएम’ होणार ‘डीटीएम’

$
0
0
दिवस असो वा रात्र, कधीही पैसै काढण्याची सोय असलेली काही ‘एटीएम’ आता ‘डीटीएम’ म्हणजेच ‘डे टाइम मनी’ होण्याची शक्यता आहे. परंतु, या निर्णयामागे केवळ रात्रीच्या वेळची सुरक्षितता हेच एकमेव कारण नसून रात्रीच्या वेळी कमी होणारे व्यवहार व एटीएम चालविण्याच्या वाढत्या खर्चामुळे बँकांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.

जाहिरातच का?...ट्रेलर का नाही?

$
0
0
पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रकाशक सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवतात. कधी प्रदर्शने, जाहिरातींमधून, तर कधी लेखकाबरोबर गप्पा आणि अभिवाचनाच्या कार्यक्रमातून पुस्तकाचे मार्केटिंग सुरू असते.

स्फोटासाठी स्थानिकांची मदत

$
0
0
फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात झालेल्या स्फोटासाठी ‘स्थानिकां’ची मदत घेतल्याची शक्यता तपास यंत्रणांना आहे. त्यादृष्टीने यंत्रणांनी स्थानिकाचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, ‘इंडियन मुजाहिदीन’चा बॉम्बमेकर आणि फरारी दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशी याचा शोध घेण्यात येत आहे.

दिवसाआड पाण्यावर फेरले ‘पाणी’

$
0
0
धरणांतील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे दिवसाआड पाण्याची तयारी केलेल्या पुणेकरांना सोमवारी पहिल्याच दिवशी पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सहन करावा लागला. शहराच्या काही भागांतील नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली, तर काही भागांत अनपेक्षितपणे पाणी सुरू राहिले!

ऑलिम्पियाडमध्ये भारताचा चौकार

$
0
0
दक्षिण आफ्रिकेतील केपटाउनमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या संघाने एक रौप्य आणि तीन कांस्य पदकांवर आपली मोहोर उमटवली आहे.

काँग्रेस बचावात्मक पवित्र्यात

$
0
0
एकीकडे राष्ट्रवादीचे नेते जाहीरपणे ‘निम्म्या जागा द्या, अन्यथा सर्वच जागा लढवू,’ असे इशारे देत असताना दुसरीकडे काँग्रेस मात्र बचावात्मक पवित्र्यात आहे. पुणे दौऱ्यावर असलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (एआयसीसी) निरीक्षकांनी केवळ काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघांमधील पदाधिकाऱ्यांशीच नुकतीच चर्चा केली.

ज्येष्ठ नागरिक डॉक्टरची कोथरूडमध्ये आत्महत्या

$
0
0
कोथरूडमधील स्वप्नशिल्प सोसायटीत आठव्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली उडी मारून एका ७७ वर्षांच्या डॉक्टरांनी आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. ‘माझी आत्महत्या ही इच्छामरण समजावी,’ असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे.

मार्केट यार्डवर राहणार ‘सीसीटीव्ही’चे लक्ष

$
0
0
मार्केट यार्डमधील बाजारपेठेची सुरक्षा कडक करण्यात आली असून, त्याठिकाणी आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. बाजारपेठेमध्ये ‘सीसीटीव्ही’ बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. येत्या आठ दिवसांमध्ये हे सर्व कॅमेरे कार्यरत होणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक दिपक तावरे यांनी सांगितले.

कास पठारालाही पावसाची प्रतीक्षा

$
0
0
पावसाने पाठ फिरवल्याचा फटका शेतीबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील वनक्षेत्र आणि विविध नैसर्गिक अाधिवसानांही बसला आहे. एरवी जून अखेरपासूनच हिरव्या आणि विविध रंगांच्या आकर्षक फुलांची झालर पांघरणारे कास पठार यंदा जुलैचा दुसरा आठवडा उलटला तरी अजून फुललेले नाही.

रेल्वे रूळाच्या क्लिप खरेदीत २७ लाखांचा घोटाळा

$
0
0
रेल्वेरूळाच्या क्लिप खरेदीची खोटी बिले सादर करून २७ लाखांचा घोटाळा करण्यात आल्याचा प्रकार केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने उघडकीस आणला. या प्रकरणी सीबीआयने रेल्वे कर्मचाऱ्यासह पाच जणांना अटक केली.

कँटोन्मेंटमध्ये सुरू होणार पहिले नागरी सुविधा केंद्र

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाने पहिल्यांदाच कामकाजाच्या विकेंद्रीकरणाला सुरुवात केली असून, जन्म-मृत्यूचे दाखले आणि प्रॉपर्टी टॅक्सची बिले देण्यासाठी महात्मा गांधी रस्त्यावर नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

स्टेशनमधून बाहेर जाताना प्रवाशांचे चेकिंग होणार

$
0
0
तुम्ही जर रात्रीच्या वेळेस पुणे स्टेशनवर उतरलात तर तुमची तपासणी झाल्यानंतरच तुम्हाला बाहेर जाता येणार आहे. पुणे स्टेशनवरून बाहेर जाण्यासाठी अनेक ठिकाणाहून रस्ते उपलब्ध आहेत. मात्र, रात्रीच्या वेळेत येणाऱ्या प्रवाशांना मुख्य प्रवेशद्वारातूनच बाहेर जाता येणार आहे.

रेल्वे स्टेशनवर घाण करणाऱ्या २८९ जणांवर कारवाई

$
0
0
पुणे स्टेशनवर घाण करणाऱ्या २८९ जणांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई करून त्यांच्याकडून २८ हजार ९०० रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. प्रशासनाने एप्रिल ते जून या कालावधीत ही कारवाई केली असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images