Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

फसवणूकप्रकरणी तरुणीला अटक

$
0
0
सामान्य लोकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन दहा हजाराच्या कर्जासाठी त्यांच्या सह्या घेऊन त्या कागदपत्रांद्वारे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ४४ हजार ८०० चे कर्ज घेऊन फसवणूक केल्याच्या प्रकरणात एका तरुणीला अटक करण्यात आली आहे.

रेल्वे डब्यांमध्येही आता ‘बायोडायजेस्टर’

$
0
0
उंचावरील अतिथंड भागातही मानवी विष्ठेचे विघटन करू शकणारे तंत्रज्ञान संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केले आहे. सियाचीनसारख्या बर्फाच्छादित परिसरातील लष्करी अधिकारी, जवानांना शुद्ध पाणी उपलब्ध होण्यासाठी या शोधाचा उपयोग होणार आहे.

वस्ती शिक्षकांना नियमित करण्याचे आदेश

$
0
0
तुटपुंज्या मानधनावर जिल्ह्यातील वस्ती शाळांवर नियुक्त असलेल्या २९३ वस्ती शिक्षकांना राज्य सरकारच्या आदेशानुसार नियमित वेतन श्रेणी लागू केली जाणार आहे. पुणे जिल्हा परिषदेतर्फे सोमवारी या शिक्षकांना त्यासंबंधीचे पत्र सोमवारी देण्यात आले.

‘पणन’इमारतीच्या खर्चाच्या चौकशीची मागणी

$
0
0
राज्य पणन मंडळाच्या गुलटेकडी मार्केट यार्डमधील कार्यालयीन इमारतीच्या नूतनीकरणावर झालेल्या खर्चाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यासाठी मंजूर झालेल्या खर्चापेक्षा अधिक खर्च झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या असून या संपूर्ण प्रकाराच्या चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

दुचाकीस्वारांना लुटणारी टोळी गजाआड

$
0
0
गाडी व्यवस्थित चालवता येत नाही का, ओव्हरटेक करतोस का, अशा प्रकारच्या धमक्या देत रात्रीच्यावेळी दुचाकीस्वारांना लुटणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनीट तीनने अटक केली. या दुचाकीवरील आरोपींनी शहरात तब्बल ३८ गुन्हे करत २५ लाख रुपयांचे दागिने हिसकावले होते.

स्वच्छतेअभावी ४० हजारांचा दंड

$
0
0
हॉटेलमध्ये स्वच्छतेचा अभाव तसेच किचनमध्ये जळमटे आढळल्याने निगडीतील एका हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाने कारवाई केली. वारंवार सूचना देऊनही सुधारणा न झाल्याने हॉटेलमालकास ४० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची कारवाई सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी केली.

अस्वच्छ हॉटेलांवर बडगा

$
0
0
शहरातील लहान-मोठ्या गल्ल्यांमध्ये, चौकासह मुख्य रस्त्यावर असणाऱ्या अमृततुल्य, हॉटेल, चायनीज, वडापाव, भाजीपाला विक्रेत्यांसह दूधडेअरीमध्ये आता स्वच्छता नसेल तर संबंधित विक्रेत्याच्या विरोधात आता दंडात्मक कारवाई होणार आहे.

निम्म्या ‘यंग सीनिअर्स’च्या वाट्याला छळ

$
0
0
दिवसेंदिवस हरवत चाललेली माणुसकी आणि दुरावलेले नातेसंबंधाचे परिणाम आता घराघरात अनुभवायला लागले आहेत. सध्याच्या ‘व्यावहारिक’ जगात ज्येष्ठ नागरिक अडचण ठरत असल्याची भावना तरुण पिढीमध्ये बळावत असल्याने सध्या दर दहापैकी पाच ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक, आर्थिक अथवा मानसिक शोषणाला सामोरे जावे लागते आहेत. यात ५२ टक्के प्रमाण महिलांचे, तर ४८ टक्के प्रमाण पुरुषांचे आहे.

‘..तिथूनच मनमोहनसिंगांच्या शेवटाची सुरुवात’

$
0
0
‘काँग्रेसने राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी बसवण्याचा ठरवलेला अजेंडा हीच पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीच्या शेवटाची सुरुवात ठरली,’ असे मत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे माध्यम सल्लागार संजय बारू यांनी मांडले.

नागरिकांनीच सुरू केली वृक्षगणना

$
0
0
आपल्या सोसायटीच्या परिसरामध्ये कोणत्या प्रकारची झाडे आहेत, त्यांची संख्या किती, त्यातील किती दुर्मिळ आहेत, अशा प्रश्नांची उत्तरे स्वतःच शोधण्यासाठी कल्याणीनगरमधील नागरिकांनी वृक्षगणनेचा उपक्रम हाती घेतला आहे.

विखे पाटील शाळेचे ‘RTE’बाबत मौन

$
0
0
मोफत शिक्षण हक्क कायद्या (आरटीई) अंतर्गत ४० विद्यार्थ्यांना तातडीने प्रवेश द्यावेत, असे आदेश प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी डॉ. विखे पाटील फाउंडेशनला देऊनही अद्याप या शाळेने कोणालाही प्रवेश दिलेला नाही.

होस्टेलमधील गैरसोयींच्या विरोधात ‘एसपी’त आंदोलन

$
0
0
होस्टेलमधील विविध गैरसोयींविरोधात एस.पी. कॉलेजच्या होस्टेलवरील विद्यार्थ्यांनी सोमवारी दुपारी कॉलजमध्ये आंदोलन केले. होस्टेलवर पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतेच्या गैरसोयींमुळे त्रस्त झालेल्या या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन कॉलेज प्रशासनाने दिल्यानंतरच विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

‘CBSE’ विद्यार्थ्यांकडून ‘ITI’ प्रवेशाची ‘विकेट’

$
0
0
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) यंदा पहिल्यांदाच सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनीही अर्ज केल्याने ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची ‘विकेट’ घेतली आहे. परिणामी, राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून तयार केलेल्या प्रवेशप्रक्रियेत काही बदल करावे लागले.

‘रोटाव्हायरसमुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी औषधनिर्मिती’

$
0
0
रोटाव्हायरसमुळे बालमृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असून, ते रोखण्यासाठी भारतात रोटावॅक या नावाने चार वेगवेगळ्या औषधांची निर्मिती करण्यात आली असून, पंतप्रधानांनी त्याला मान्यता दिली आहे.

गावठाणांच्या रहिवास क्षेत्रवाढीची अधिसूचना जारी

$
0
0
गावठाणांच्या रहिवास क्षेत्रात वाढ करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली असून, पश्चिम घाटातील संरक्षित क्षेत्रात येणाऱ्या गावांच्या गावठाणांत दोनशे मीटरपर्यंत निवासी बांधकामांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

कोर्टाच्या निर्णयांनंतरही प्राध्यापकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

$
0
0
सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने प्राध्यापकांच्या बाजूने दिलेल्या निर्णयांनंतरही प्राध्यापकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकार आणि उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालय दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राज्य प्राध्यापक महासंघाने सोमवारी केला.

कोकण वगळता जोर कमी

$
0
0
राज्यातही कोकण किनारपट्टी वगळता पावसाचा जोर कमी झाला आहे. येत्या दोन दिवसांत कोकणात जोरदार पावसाची शक्यता असून, उर्वरित संपूर्ण राज्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर पुण्यात हलक्या सरींची शक्यता आहे.

पाणलोट क्षेत्रातही रिपरिपच

$
0
0
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची रिपरिपच सुरू असून, या धरणांच्या पाणीसाठ्यात अत्यल्प वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासांत झालेल्या पावसाने धरणांत ०.१६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी वाहून आले आहे.

महाराष्ट्रातील विजय मोदींचाच करिष्मा

$
0
0
‘लोकसभेच्या निवडणुकीत देशभराप्रमाणे महाराष्ट्रातही मिळालेला विजय हा केवळ नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळेच आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या जागावाटपासाठी कोणत्याही परिस्थितीत जुनी समीकरणे चालवून घेणार नाही,’ असा पवित्रा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाच्या नेत्यांनी घेतल्याचे समजते.

‘ईपीएफओ’ विभागाची झाडाझडती सुरू

$
0
0
अधिकाऱ्यांकडून परदेश दौऱ्यांद्वारे होणारी सरकारी पैशांची उधळण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. देशाप्रमाणेच पुण्यातील एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गेनायझेशन (ईपीएफओ) विभागाचीही झाडाझडती सुरू झाली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images