Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी पळवली

$
0
0
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञान व्यक्तींनी पाच तोळे वजनाची एक लाख रुपयांची सोन्याची चेन चोरून नेली. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कर्वेनगर येथील प्रतिज्ञा हॉल समोर हा प्रकार घडला.

मीडिएशनला पक्षकारांची पसंती

$
0
0
कोर्टकचेरीच्या कचाट्यामुळे पक्षकार सामंजस्याने आणि समझोत्याने केसेस निकाली काढण्यास तयार होतात. मीडिएशनद्वारे केसेस निकाली काढण्याचा पर्याय उपलब्ध असून पुणे जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांकडून पक्षकारांच्या केसेस मीडिएशनसाठी पाठविण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात या वर्षी जुलै अखेरपर्यंत तीन हजार ७१८ केसेस मीडिएशनसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिन यंदाही जुन्याच गणवेशावर

$
0
0
पिंपरी-चिंचवडमध्य महापालिकेच्या शाळा सुरूहोऊन दोन महिने झाले तरी विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे यावर्षीही विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन जुन्याच गणवेशांवर साजरा करावा लागणार आहे. शिक्षण मंडळाच्या साहित्य वाटपाच्या या घोळामुळे पालक वर्गात नाराजीचा सुर आहे.

भरतीसाठी कलाशिक्षक चेटकीण, गारुड्याच्या वेषात

$
0
0
सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक वेतन या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका प्राथमिक शाळेत कला, क्रीडा शिक्षकांच्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य ललित कला शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी अभिनव आंदोलन करण्यात आले. यात शिक्षकांनी चेटकीण, गारुडी, डोंबारी आदींच्या पारंपारिक वेशभूषा साकारल्या होत्या.

फौजदारी कारवाई करणार

$
0
0
पोलिस बंदोबस्त नसला तरी अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविता येणार नाही, असे स्पष्ट करीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी मंगळवारपासून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा पर्याय खुला असल्याचा इशारा दिला आहे. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मार्च २०१२ नंतरच्या अनधिकृत बांधकामांना थारा दिला जाणार नाही, असे पुन्हा एकदा स्पष्ट केले.

राजकीय लाभासाठी रस्सीखेच

$
0
0
मावळ गोळीबार घटनेचे राजकीय पटलावर खोलवर प्रतिबिंब उमटले आहे. या दुर्घटनेनंतर झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला लाभ झाला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला. यापुढील काळातही या घटनेचा राजकीय लाभ उठविण्यासाठी प्रमुख पक्षांमध्ये रस्सीखेच होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

हस्तांतरणाला सोसायट्यांचा प्रतिसाद

$
0
0
सोसायटीच्या नावावर जागा होण्याच्या प्रक्रियेला वेग मिळावा, यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘डिम्ड कन्व्हेयन्स’ला (मानवी हस्तांतरण) सोसायटींचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सब रजिस्टार कार्यालयाकडे आलेल्या १८२ पैकी ११४ प्रस्तावांमध्ये डिम्ड कन्व्हेयन्सची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

क्रेडाईतर्फे मोफत आरोग्य तपासणी

$
0
0
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने क्रेडाई पुणे मेट्रोने मोशी येथे बांधकाम मजुरांची मुले आणि गर्भवती महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. त्याचा सुमारे तीनशेहून अधिक जणांनी लाभ घेतला.

गोदामांचे ‘ऑनलाइन’ बुकिंग

$
0
0
धान्यांच्या साठवणुकीसाठी भाडेतत्वावर गोदामे घेण्यासाठी करावी लागणारी ‘कारकुनी’ हद्दपार होणार असून आता गोदामांची ‘ऑनलाईन’ बुकिंग होणार आहे. पंधरा ऑगस्टपासून याची अंमलबजावणी होणार असून राज्य वखार महामंडळाने याबाबत निर्णय घेतला आहे.

स्वाइन फ्लूचे आणखी ७ पेशंट

$
0
0
पिंपरी चिंचवड परिसरात स्वाइन फ्लूच्या पेशंटची संख्या वाढत असून या आजाराची लागण झालेल्या आणखी सात जणांना मंगळवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत दाखल झालेल्या पेशंटची संख्या आता १६ झाली आहे.

इन्शुरन्स कंपनीत चोरी

$
0
0
चोरी झाल्यानंतर नागरिकांच्या मदतीला धावणा-या इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिसमध्येच चोरट्याने एक लाख ८५ हजाराचा डल्ला मारला आहे. कॅम्प येथील अरोरा टॉवर्समध्ये असलेल्या युनायटेड इंडिया इन्शुरन्सच्या कार्यालयात हा प्रकार घडला.

मंदीचा ट्रान्सपोर्टला फटका

$
0
0
औद्योगिक मंदीची झळ आता निगडीतील उद्योगनगरीत असलेल्या ट्रान्सपोर्टनगरीलाही बसत आहे.विविध प्रकारच्या मालाची ने-आण करण्यासाठी या ट्रान्सपोर्टनगरीतून मालवाहतूक करण्यात येते. मात्र, सध्या कंपन्यांमधील उत्पादन मंदावल्याने त्याचा फटका या व्यवस्थेलाही बसत असून ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या नियंत्रणाखाली चालणार्या सुमारे दीड हजार गाड्या मालाअभावी जैसे थेच आहेत.

पुण्यात रस्त्यांवर दहीहंडीला बंदी

$
0
0
पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली असून गोविंदांना मोकळ्या मैदानात थर लावावे लागतील. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासमवेत पोलिस अधिका‍ऱ्यांच्या झालेल्या बैठकीनंतर रस्त्यावरील दहीहंडीवर बंदी घालण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला.

पुण्यातील स्फोटांमागे पाकिस्तान?

$
0
0
जंगली महाराज रोडवरील साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासामध्ये 'इंडियन मुजाहिदीन' आणि 'लष्कर-ए-तैय्यबा'च्या दोघा संशयितांचा 'एटीएस'ने शोध सुरू केला आहे. पुण्यात स्फोट घडवून आणण्यामागे पुन्हा एकदा सीमेपलिकडील शक्तींचाच हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

‘आयटीएस शुल्काची वसुली बेकायदा’

$
0
0
पुणे महापालिकेच्या इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टमद्वारे (आयटीएस) कंत्राटदारामार्फत विशेष शुल्क वसूल करणे बेकायदा असून ही यंत्रणा पोलिसांकडे हस्तांतरीत करावी, अशी मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी बुधवारी केली आहे.

ज्येष्ठांना आकर्षण कन्नडचे

$
0
0
आजची तरुणाई परदेशी भाषांकडे आकर्षित होत असली, तरी त्यांपैकी काहींना आणि ज्येष्ठ नागरिकांना अन्य भारतीय भाषा आकर्षित करीत आहेत. पुण्यातील मराठी-कन्नड स्नेहवर्धन केंद्राला याची प्रचिती येत असून, या केंद्रातर्फे राबविण्यात येत असलेल्या कन्नड वर्गांना ज्येष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

३ टक्के भरतीचा नियम अन्यायकारक

$
0
0
शिक्षकेतर पदभरती वरील निर्बंध हटविल्यानंतरही, उपलब्ध पदांपैकी दरवर्षी केवळ तीन टक्के पदांचीच भरती करण्याचा नवा नियम शासनाने काढला आहे. हा नियम शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी अन्यायकारक आहे. शालेय विभागाने अनुदानित माध्यमिक शाळांसाठी हा निर्णय जसाच्या तसा लागू न करता, उपलब्ध जागांचा विचार करून तो लागू करावा, अशी मागणी पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघाच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये करण्यात आली आहे.

येरवडा जेलमध्ये लोकअदालत

$
0
0
जेलमध्ये असलेल्या आरोपींच्या कोर्टातील केसेस लवकर निकाली निघाव्यात, म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ११ ऑगस्ट रोजी जेलमध्ये लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालत मध्ये प्ली बार्गेनिंगच्या (गुन्हा कबुलीच्या) केसेस ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. के. मलाबादे यांनी दिली.

खून प्रकरणातील आरोपीला अटक

$
0
0
शनिवारवाड्याच्या ऑफिसमधील तिजोरी चोरुन नेत असताना चोरट्यांना विरोध करणा-या सफाई कामगाराच्या खूनप्रकरणातील मुख्य आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. पी. जैन - देसरडा यांनी हा आदेश दिला.

विद्यार्थिनीचा ड्रेस उतरविणा-या मुख्याध्यापिकेला अटक

$
0
0
बंडगार्डन परिसरातील एका कॉन्व्हेंट शाळेच्या मुख्याध्यापिकेने आपल्याच विद्यार्थिनीला युनिफॉर्म उतरविण्याची शिक्षा केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी बुधवारी संबंधित मुख्याध्यापिकेला अटक केली. तिला कोर्टात हजर करण्यात आले असता तिची जामिनावर सुटका करण्यात आली. याप्रकरणी निता अॅन्ड्रयुज गोरडे (वय -५१, रा. लुल्लानगर) यांना अटक करण्यात आली होती.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images