Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

इंग्लंडमधील रेस कॅम्पसाठी सहा भारतीयांची निवड

$
0
0
‘निस्सान अँड प्लेस्टेशन जीटी अॅकॅडमी इंडिया चॅलेंज’च्या विजेत्यांच्या नावाची घोषणा ‘निस्सान’तर्फे जयपूर येथे नुकतीच करण्यात आली. देशभरातून निवडण्यात आलेल्या २८ खेळाडूंमधून अंतिम सहा खेळाडूंची निवड करण्यात आली.

पूर्वजांची जीवनशैली पहा ‘याचि देही याची डोळा’

$
0
0
आपले पूर्वज कोण होते, त्यांच्या जीवनशैलीविषयी कितीही कुतूहल असले तरी आपल्याला सध्या पुस्तकांतील माहितीवर समाधान मानावे लागते. मात्र, आता आपल्या पूर्वजांची जीवनशैली प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी इतिहासप्रेमींना मिळणार आहे.

एका दिवसात सोनसाखळी चोरीच्या तीन घटना

$
0
0
पुणे आणि परिसरात नुकत्याच दिवसभरात तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. बाणेर, शनिवार पेठ, एरंडवणा येथून पायी जात असलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी तोडून चोरून नेली.

गुरूरूपी पित्याचे पंकजा मुंडेंकडून स्मरण

$
0
0
‘माझे बाबा गोपीनाथ मुंडे हेच माझे गुरू आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. कधी काही अडचण आली तर बाबांना फोन केला तर ते क्षणात माझे प्रश्न सोडवत असत. आता मी कुणाला फोन करू,’ असा भावनिक प्रश्न उपस्थित करीत त्यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना नुकताच उजाळा दिला.

‘बीआरटी’साठी आंदोलन

$
0
0
चिंचवड स्टेशन येथील ‘बीआरटी’ मार्ग युवक काँग्रेसने रविवारी आंदोलन करून वाहतुकीसाठी खुला केला. रस्त्यावरील सिमेंट ब्लॉकचे अडथळे तोडल्याप्रकरणी पोलिसांनी दहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

‘मिशन १७१’साठी शिवसेनेची तयारी

$
0
0
महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ‘मिशन १७१’च्या पूर्तीसाठी मोर्चेबांधणी चालू आहे. त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व जागांवर भगवा फडकविण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

कोंढव्यात फायर ब्रिगेडचे उपकेंद्र

$
0
0
कोंढवा परिसरात फायर ब्रिगेडचे आणखी एक उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे त्यासाठी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, मध्यंतरी बंद पडलेल्या कामाला आता पुन्हा सुरुवात झाली आहे.

‘जनतेच्या संकटकाळात राजकारण नको’

$
0
0
देशाच्या निम्म्या भागात अवर्षणाचे संकट निर्माण झाले असले, तरी देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करावा. केद्र आणि राज्य सरकार या परिस्थितीतून मार्ग काढत असताना जनतेच्या संकटकाळात राजकारण करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.

कुंभारवळण नागरिकांचा घनकचरा डेपोस विरोध

$
0
0
पुणे विभागीय हरित लवादाने सासवड पालिकेस कचरा हलविण्यासाठी दिलेली मुदत संपल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने हा घनकचरा आपल्या कुंभारवळण येथील नियोजित कचरा डेपोमध्ये हलविण्याची घाई सुरू केली; परंतु तेथील नागरिकांनी कचरा टाकण्यास तीव्र विरोध केला आहे.

पाण्याच्या टाक्या वर्षभरापासून सफाईविना

$
0
0
येरवडा-नगर रोड परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्यांची गेल्या वर्षभरापासून देखभाल दुरुस्ती आणि स्वच्छता केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोसळणारा पाऊस, हिरवाई अन् पर्यटकांची गर्दी

$
0
0
लोणावळा खंडाळा व मावळात तब्बल सव्वा महिन्याच्या विश्रांतीनंतर सुरू झालेल्या पावसाने सलग चौथ्या दिवशी हजेरी लावली. येथे जोरदार पाऊस सुरू असून, पाऊस सुरू झाल्यानंतर आलेल्या पहिल्याच विकेंडला वर्षाविहार आणि पर्यटनासाठी लोणावळा खंडाळ्यातील पर्यटन स्थळी मोठी गर्दी केली होती.

कामगारांची हिंमत वाढविण्यासाठी गरज

$
0
0
‘संपत्तीच्या जोरावर भांडवलदार प्रबळ होऊ पाहत आहेत. तसेच, लोकशाहीचे रूप बदलून ते धनाढ्यशाही होत असल्याचे चित्र दुर्दैवी आहे. अशा परिस्थितीत कामगारांची हिंमत वाढविण्यासाठी संघटनांची गरज आहे,’ असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी मांडले.

भाजीपाल्याचे भाव आवाक्यात

$
0
0
पावसाला सुरुवात झाल्यामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढली असून दर आवाक्यात येऊ लागले आहेत. कोथिंबिरीच्या जुडीचा दर वीस रुपये झाला असून कांदापात आणि मुळ्याच्या जुडीच्या दराने पंचविशी गाठली आहे.

घोले रोड नाट्यगृहाचे काम अद्यापही रखडलेलेच

$
0
0
घोले रोडवर आकाराला येत असलेल्या प्रायोगिक नाटकांसाठीच्या छोट्या नाट्यगृहाचे काम रखडलेलेच आहे. २२५ आसन क्षमता असलेल्या नाट्यगृहासाठी महापालिकेने पाच कोटींची तरतूद केली होती. मात्र, रखडलेल्या कामामुळे नाट्यगृहाचा खर्च वाढत असून, नाट्यगृहाची पहिली घंटा ऑगस्टपर्यंत वाजणार नाही.

वलयांकित कोर्सेसची ओसरली लाट

$
0
0
वलयांकित कोर्स म्हणून ओळख असलेल्या इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंट अभ्यासक्रमांची चमक सध्या कमी होत असून, राज्यातील ३१ तंत्रशिक्षण अभ्यासक्रम यंदा बंद तरी झाले आहेत किंवा त्यासाठीच्या जागा तरी कमी झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात तंत्रशिक्षणाच्या एकूण १२८३ जागा कमी झाल्या आहेत.

पुण्यात आजपासून दिवसाआड पाणी

$
0
0
पुण्यात आज, सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील साठा घटल्याने बांधकाम प्रकल्प तसेच, जलतरण तलावांचा पाणीपुरवठाही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाणीसाठ्या‌त अपेक्षित वाढ होईपर्यंत ही पाणीकपात सुरूच राहणार आहे.

‘भगव्या महाराष्ट्रा’ला ‘नमो नमः’चा शह?

$
0
0
मोदी लाटेच्या जोरावर केवळ पुण्यातच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपकडून ‘शत प्रतिशत’साठी गांभीर्याने विचार सुरू झाला आहे. येथील सर्व जागा स्वबळावर लढविल्या, तर पश्चिम महाराष्ट्रातून भाजपचे वीस ते पंचवीस आमदार निवडून येऊ शकतात, असे प्राथमिक चाचपणीत प्रदेश भाजपच्या नेत्यांना आढळल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

शिवाजीनगर, खडकवासला हवेत

$
0
0
कोथरूड, पुणे कँटोन्मेन्ट आणि वडगावशेरी या शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघांवर हक्क सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाला रविवारी शिवसेनेनेही प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या ताब्यात असलेले शिवसेना आणि खडकवासला हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे घ्या, अशी मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आली.

सॉफ्टवेअर इंजिनीअरला लुटले

$
0
0
हिंजवडी पोलिसांनी आठवड्यापूर्वीच रस्त्यावर दरोडे घालणारी टोळी पकडली असली तरी वाकड येथील एका सॉफ्टवेअर इंजिनीअरला ठाण्यात सोडण्याच्या बहाण्याने लुटण्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडला. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात तिघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालिकेचे स्कॉलरशिप अर्ज आजपासून

$
0
0
शहरातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपच्या अर्जांचे वाटप आजपासून (सोमवार) होणार आहे. पालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयात हे अर्ज उपलब्ध होणार असून, यावर्षीपासून विद्यार्थ्यांना ऑफलाइनबरोबरच ऑनलाइन पद्धतीनेही हे अर्ज भरता येतील.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images