Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘NA’ची प्रक्रिया सुलभ करणार

$
0
0
राज्यातील जमिनी ‘एनए’ (​बिगर शेती) करण्याची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शी करण्यात येणार असून, ‘एनए’ सर्टिफिकेट नागरिकांना जास्त कागदपत्रे सादर करायला न लावता दिली जाणार आहेत.

आता दिवसाआड पाणी

$
0
0
धरणांतील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे सोमवारपासून पुण्यात दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्याचबरोबर, बांधकाम प्रकल्पासाठीचा आणि जलतरण तलावांचा पाणीपुरवठा पूर्णतः थांबविला जाणार आहे. धरणांमधील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ होईपर्यंत ही पाणीकपात लागू राहील, असे महापालिकेने शुक्रवारी स्पष्ट केले.

पवना नदीपात्रातील गाळ उपसण्याचे काम चालू

$
0
0
रावेत बंधाऱ्याजवळ पवना नदीपात्रातील गाळ उपसण्याचे काम पिंपरी-चिंचवड महापालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढणार आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे. पावसाने ओढ दिल्याने रावेत बंधाऱ्याबरोबरच पवना नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तांना नोटीस

$
0
0
प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन व हाताळणीबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका करत नसल्याचे समोर आल्यामुळे, पर्यावरण रक्षण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी नगरसेविका सीमा सावळे यांनी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांना पर्यावरण कायद्यातील तरतुदींनुसार ६० दिवसांची नोटीस बजावली आहे.

पुण्यात वाहनचोरांचा शोध सुरू

$
0
0
फरासखाना पोलिस स्टेशनच्या पार्किंगमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासाठी चोरीच्या दुचाकीचा वापर केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांकडून पुणे आणि सातारा परिसरातील वाहनचोरांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

शरियत कोर्ट ही मुल्ला, मौलवींची दुकानदारी

$
0
0
शरियत न्यायालये बेकायदा असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने नुकताच दिला आहे. व्यक्तिगत प्रकरणे हाताळू नका असेही कोर्टाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यदभाई यांच्याशी दत्ता जाधव यांनी साधलेला संवाद

तोंडी व प्रॅक्टिकलसाठी ग्रेड पद्धतीच योग्य

$
0
0
दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालांच्या वाढलेल्या टक्केवारीवर आणि त्याचे मुख्य कारण असलेल्या तोंडी- प्रॅक्टिकल परीक्षांच्या गुणांवर ‘सिस्टिम्स करेक्टिंग मूव्हमेंट्स’नेही (सिस्कॉम) आक्षेप घेतला आहे.

बारावी परीक्षेतील विक्रमी टक्केवारीचे गूढ उलगडेना

$
0
0
राज्यातील विद्यार्थ्यांच्या बारावीच्या निकालाची विक्रमी टक्केवारी नोंदविणारे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (बोर्ड) स्वतः मात्र माहिती अधिकाराच्या परीक्षेत नापास झाले आहे.

दिवसभर ‘संथ’तधार…!

$
0
0
सकाळपासून दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शनिवारी पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरात पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस पुण्यात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अकरावी प्रवेशांचा ‘बाजार’ यंदाही फोफावणार?

$
0
0
अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून मिळालेले प्रवेश न घेता ‘नॉट रिपोर्टेड’ राहणाऱ्या विद्यार्थ्यांची हजारोंची संख्या पाहता, यंदाही कॉलेज पातळीवरील प्रवेशांदरम्यान ‘बाजार’ फोफावण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

विद्यार्थ्याचा लोणावळ्याजवळ अपघाती मृत्यू

$
0
0
जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर एका अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेने कानपूर आयआयटीचा विद्यार्थी जागीच ठार झाला, तर एक जण जखमी झाला आहे. लोणावळा परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला.

बॉम्बस्फोटाच्या तपासासाठी वाहनचोरांचा शोध सुरू

$
0
0
फरासखाना पोलिस स्टेशनच्या पार्किंगमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटासाठी चोरीच्या दुचाकीचा वापर केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांकडून पुणे आणि सातारा परिसरातील वाहनचोरांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या ऑडिटला अखेर मुहूर्त

$
0
0
शहरातील कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये किती कचऱ्यावर प्रक्रिया होते, बायोगॅस प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालतात का, त्यातून निर्माण होणारा गॅस पर्यावरण मानकांनुसार आहे का, यासह प्रकल्पांची तांत्रिक तपासणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामुळे, कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या ऑडिटला अखेर मुहूर्त मिळणार आहे.

सक्षम उमेदवारांना नक्की संधी; पण...

$
0
0
‘विधानसभेच्या निवडणुकीत जेथे आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत, तेथे पक्षाच्या उमेदवारांनाच संधी देण्यात येईल. मात्र, काही ठिकाणी सक्षम उमेदवार नसतील आणि मोठे नेते येण्याच्या तयारीत असतील, तर त्यांचाही विचार करण्यात येईल,’ अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष देंवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.

मेडिकल कॉलेजमध्येही विद्यार्थ्यांच्या निवडणुका

$
0
0
राज्यातील सर्व मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडणुका घेण्यात याव्यात याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सर्व मेडिकल कॉलेजसह आरोग्य विद्यापीठाला आदेश जारी केले आहेत.

भुशी धरण परिसरात सरींवर सरी

$
0
0
गेल्या महिन्याभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने लोणावळा-खंडाळ्याच्या निसर्गरम्य परिसरात हजेरी लावली आहे. सरींवर सरी कोसळत असल्याने हा परिसर पर्यटकांनी गजबजून गेला आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण ६० टक्के भरले आहे.

...म्हणून पाणी ओतू नका!

$
0
0
‘दिवसाआड पाणी येणार असल्याने खबरदारीसाठी घरा-घरांतून भरून ठेवले जाणारे पाणी पुन्हा पाणी आल्यावर शिळे झाले म्हणून ओतून देऊ नका. परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करा’, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केले.

जिल्ह्यात दिवसाआड पाणी

$
0
0
पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड, सर्व नगरपालिका आणि नगर परिषदा, ग्रामपंचायती आणि ‘एमआयडीसीं’मध्ये येत्या सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला आहे.

शत प्रतिशत पुणे...!

$
0
0
लोकसभेतील यशाचे टॉनिक मिळालेल्या भारतीय जनता पक्षामध्ये आता पुणे शहरातील सर्व जागा लढवण्याची मागणी पुढे आली आहे. शहरातील सर्व जागा लढवण्याची किंवा मैत्रीपूर्ण लढतींना परवानगी देण्याची मागणी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाच्या कोअर कमिटीकडे शनिवारी केली.

कारभारी काय करणार?

$
0
0
‘लखनौ, अहमदाबादच्या मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारतर्फे निधी जाहीर केला जातो; पण पुण्याच्या मेट्रोसाठी तरतूद होत नाही. नेहरू योजनेतून अपूर्ण प्रकल्पांना निधी मिळणार का, हे केंद्रीय बजेटमधून स्पष्ट होत नाही.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images