Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘कारभाऱ्यां’च्या दुर्लक्षामुळे पुणे दहशतीच्या छायेत

$
0
0
पुण्यातील टेकड्या-जमिनी आणि टीडीआर यांचा हिशेब मांडण्यातच रस असलेल्या ‘कारभाऱ्यां’कडून सुरक्षाविषयक प्रश्न सोडविण्याबाबत अक्षम्य दुर्लक्ष केल्यानेच पुणेकर दहशतीच्या छायेत लोटले गेले आहेत.

‘फरासखान्या’तील पार्किंग हलवले

$
0
0
मजूर अड्ड्याशेजारील पार्किंगमध्ये लावल्या जाणाऱ्या वाहतूक विभागाच्या वाहनांसह इतर सर्व वाहने शुक्रवारी सायंकाळी हलवण्यात आली. फरासखाना पोलिस स्टेशनच्या आवारात गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यातील १०-१५ तरुण रियाझ भटकळच्या संपर्कात

$
0
0
पुण्यातील १० ते १५ तरुण ‘इंडियन मुजाहिदीन’चा प्रमुख आणि पाकिस्तानात राहून भारतात स्फोट घडवण्याचे प्लॅनिंग करणारा दहशतवादी रियाझ भटकळ याच्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती खुद्द रियाझनेच उघड केली आहे.

कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा हवा

$
0
0
‘पुण्यात ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होण्यास दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. अशा प्रकारे नागरिकांच्या जिवाशी खेळणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

बहुतांश CCTV दुकानांच्या आतच

$
0
0
शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दुकानदारांनी, तसेच व्यावसायिक आस्थापनांनी महापालिकेच्या आवाहनानंतर बसवलेले बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे दुकानांच्या आतील बाजूला बसवण्यात आले आहेत.

CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू

$
0
0
‘एटीएस’ आणि पुणे पोलिसांनी फरासखाना पोलिस ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व ‘सीसीटीव्हीं’चे फुटेज गोळा केले आहे. त्यात फरासखाना पोलिस ठाण्यासमोरील इमारतीचे फुटेज तपासण्यात आले आहे. स्फोटाआधी एक तास त्या ठिकाणी संशयित ‘बॉम्ब प्लँटर’ दुचाकी घेऊन येत असल्याचे या फुटेजमध्ये दिसत आहे.

CCTV बसवण्याचे काम धीमे

$
0
0
जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटांच्या घटनेनंतर शहराच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात निभावले

$
0
0
फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात स्फोट झाल्याच्या ठिकाणापासून काही अंतरावर स्टेनलेस स्टीलचा एक संशयित डिटोनेटर बॉम्बशोधक पथकाला सापडला आहे. स्टीलचा डिटोनेटर सापडल्याची ही पहिली घटना असल्याने दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.

जादा एलबीटीवसुली अंतिम अधिसूचनेनंतरच

$
0
0
महापालिका हद्दीत ३४ गावांचा समावेश करण्याचे अंतिम नोटिफिकेशन जारी झाल्यावरच या गावांतील खरेदी-विक्री व्यवहारांवर एक टक्का जादा एलबीटी (स्थानिक संस्था कर) आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अवघा मावळ सुखावला

$
0
0
पावसाने जूनपासून सव्वा महिना विश्रांती घेतल्याने महाराष्ट्रासह मावळातील नागरिक दुष्काळाच्या भयाने धास्तावले होते. परंतु, अखेर शुक्रवारी सकाळपासून लोणावळ्यासह मावळात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे.

अखेर रिमझिम तरी बरसला…

$
0
0
तळकोकणासह राज्याच्या विविध भागांत पाऊस सक्रिय झाला असला, तरी घाटावर मात्र तो का रुसला आहे, असा प्रश्न सध्या पुणेकरांना पडला आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारपासून शहरात ढगाळ वातावरण टिकून आहे.

पालिकेने दाखवले कारवाईचे ‘पाणी’

$
0
0
पिण्याच्या पाण्याचा गैरवापर होत असलेल्या तक्रारींची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने सुमारे ३५० ठिकाणी कारवाई करून पाण्याचा होणारा गैरवापर थांबवला. धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने उपलब्ध पाण्याचा वापर योग्य कारणासाठीच करण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या होत्या.

असे असेल दिवसाआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक

$
0
0
पाऊस जोर धरत नसल्याने धरणांतील पाणीसाठा काटकसरीने वापरण्याच्या हेतूने पुण्यात सोमवारपासून (१४ जुलै) एक दिवसाआड पाणी पुरवले जाणार आहे. त्याचे नियोजन पुढीलप्रमाणे केल्याचे पालिकेने कळवले आहे.

समृद्ध वृक्षसंपदेवर कुऱ्हाड

$
0
0
समृद्ध वृक्षसंपदेचे वरदान असलेल्या जिल्ह्याच्या सीमा परिसरात सध्या राजरोसपणे वृक्षांची कत्तल सुरू आहे. वनविभागाच्या हद्दीत घुसून वृक्षतोडीचे प्रकार होत असूनही त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

धरणातील साठलेल्या गाळाची फेरपाहणी करण्याचा निर्णय

$
0
0
पानशेत धरणफुटीच्या घटनेला ५३ वर्षे होत असताना या धरणात साठलेल्या गाळाची फेरपाहणी करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. या गाळाच्या पाहणीचे काम नाशिकच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेला (मेरी) देण्यात आले आहे.

जमीन सरकार जमा करा

$
0
0
बेकायदेशीर टेकडीफोड करणाऱ्या किसन राठोड याने लँड सिलिंग अॅक्ट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्याची जमीन सरकारजमा करण्याची नोटीस महसूल प्रशासनाने पाठविली आहे. राठोड याच्या पुण्यासह राज्यातील जमीन खरेदीचा तपशील तातडीने प्रशासनाने मागविला असून तो न दिल्यास ही कारवाई केली जाणार आहे.

समितीच्या मान्यतेविनाच प्रमाणपत्र वाटपाचा घाट

$
0
0
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांचे कैवारी असल्याचा आव आणत, त्यांच्यासाठी प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमाचा घाट राष्ट्रवादी काँग्रेसने घातला आहे.

प्लँचेटमार्फत तपासाच्या चौकशीची मागणी

$
0
0
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी मांत्रिकाच्या मदतीने प्लँचेटच्या माध्यमातून तपास करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.

उत्खननाशिवाय जाणा भूगर्भातील गुपिते

$
0
0
हजारो वर्षांपूर्वीच्या पूर्वजांच्या वसाहती शोधण्यासाठी कित्येक महिने उत्खनन करणाऱ्या संशोधकांना आता जमिनीखालील दिसणारे ‘डोळे’ मिळाले आहेत. हे अत्याधुनिक डोळे म्हणजे ‘जीपीआर सिस्टीम’ असून, त्यामुळे हरियाणा येथील वस्त्या आणि शेतांखाली वसलेल्या प्राचीन सारस्वत संस्कृतीचे पुरावे उत्खननाशिवय उपलब्ध झाले आहेत.

धरणग्रस्तांच्या खापरपणतूंना दाखला

$
0
0
जिल्ह्यातील भाटघर, वीर आणि मुळशी या प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्या गावांमधील सुमारे दहा हजारांहून अधिक कुटुंबांना अनेक दशकांनंतर प्रकल्पग्रस्तांचा दाखला मिळणार आहे. यासाठी खास बाब म्हणून या कुटुंबांमधील खापरपणतूंची प्रकल्पग्रस्त म्हणून सरकारदरबारी नोंद होणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images