Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मोदी सरकारचा अर्थसंकल्प स्वागतार्ह

$
0
0
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारस्थापनेनंतर दोनच महिन्यांत सादर केलेला अर्थसंकल्प सर्वासमावेशक असून, हा अर्थसंकल्प ‘वेलकम अर्थसंकल्प’ असल्याची प्रतिक्रिया गुरुवारी कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय)च्या सदस्यांनी व्यक्त केली.

‘सरकारचे धोरण स्पष्ट करणारा अर्थसंकल्प’

$
0
0
केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प स्वागतार्ह आहे. सर्वच क्षेत्रात उद्योगजगताला सामावून घेण्यात आले आहे. या अर्थसंकल्पातून सरकारचे धोरण स्पष्ट होत आहे, अशा शब्दात पुण्यातील उद्योगजगतातर्फे केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले.

राज्यासाठीची IIM पुण्यात येईल काय?

$
0
0
अर्थसंकल्पामधून राज्याशी थेट संबंधित बाबींमध्ये महत्त्वाचा भाग असलेले ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम) पुण्यातच उभी राहण्याची दाट शक्यता आहे.

पुणे मेट्रोसाठी ‘बुरे दिन’!

$
0
0
केंद्र सरकारने तत्त्वतः मान्यता देताना लादलेल्या अटींची पूर्तता करण्यात राज्य सरकार आणि महापालिका अपयशी ठरल्याने केंद्रीय अर्थसंकल्पात पुणे मेट्रोच्या निधीला रेड सिग्नल मिळाला आहे. पुण्यानंतर मान्यता मिळालेल्या अहमदाबाद आणि लखनौ येथील मेट्रोसाठी प्रत्येकी ५० कोटी रुपये, विशाखापट्टणम आणि विजयवाडा मेट्रोसाठी प्राथमिक १० कोटींची तरतूद केली असताना, पुण्याच्या मेट्रोला अर्थसंकल्पामध्ये रेड सिग्नलच आहे.

‘इंडस्ट्रियल कॉरिडॉरचे मुख्यालय पुण्यात’

$
0
0
देशात इंडस्ट्रियल कॉरिडॉर स्थापन करण्यात येणार असून त्याचे मुख्यालय पुण्यात असणार आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली. त्यामुळे देशातील उद्योगजगतात ऑटो आणि आयटी हब असलेल्या पुण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

प्रियदर्शनी शाळेविरोधात आंदोलन

$
0
0
शाळेत मराठी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या भोसरी येथील प्रियदर्शनी शाळेच्या आणि त्यांच्या शिक्षकांच्या विरोधात शहरातील विविध राजकीय पक्षांनी गुरुवारी आंदोलन केले.

१० मिनिटांतच परिसराची नाकेबंदी

$
0
0
बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक नेहमीच वर्दळीचा भाग. दुपारच्या दोन वाजून दोन मिनिटांनी प्रचंड मोठा आवाज होतो आणि आवाजाच्या तीव्रतेने स्फोट झाल्याचा अंदाज बांधत चौकातील विक्रेत्यांकडून स्वतःहून अवघ्या दहाव्या मिनिटांत दुकानांना टाळे लावले जाते.

स्फोटाचा तपास ‘ATS’ कडे

$
0
0
फरासखाना पोलिस ठाण्याजवळ झालेल्या स्फोटाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गुरुवारी दिली. दरम्यान, येत्या गणेशोत्सवापूर्वी शहरातील झोन एक आणि दोनमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.

‘IIM’वरच संशयाची सुई

$
0
0
आयएमच्या दहशतवाद्यांच्या चॅटिंगमध्ये यापुढे भारतातील पोलिसांवर (मामू) हल्ले करण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्फोट करण्याबरोबरच पोलिसांवर गोळीबार करण्याबाबतही त्यांच्यात चर्चा झाली असून राष्ट्रीय तपास यंत्रणेने हे चॅ​टिंग रिकव्हर केले आहे.

फरासखान्याच्या आवारात स्फोट

$
0
0
शहराच्या मध्यवस्तीत, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या जवळ आणि फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला.

प्रियदर्शनी शाळेचे सीईओ अटकेत

$
0
0
शाळेत मराठी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी भोसरी येथील प्रियदर्शनी शाळेच्या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सिंह यांना अटक करण्यात आली आहे. विविध राजकीय पक्षांच्या भोसरी पोलीस ठाण्यासमोर केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर ही कारवाई करण्यात आली.

पुणे स्फोटामागे दहशतवादी

$
0
0
पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या बॉम्बस्फोटामागे दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता आज महाराष्ट्र एटीएसने व्यक्त केली. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नसली तरी तपास मात्र त्याच दिशेने सुरू झाला आहे.

प्रियदर्शनीच्या CEO ला अटक आणि सुटका

$
0
0
मराठीत बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना काठीने मारहाण करणाऱ्या प्रियदर्शनी शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सिंह यांना शुक्रवारी (११ जुलै) सकाळी पावणेअकराच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यांच्यावर बाल अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी कोर्टात त्यांची जामिनावर सुटका झाली.

पिंपरीकरांना पाणीकपातीचा इशारा

$
0
0
‘पवना धरणात केवळ साडेतेरा टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्येही पुन्हा पाणीकपातीचा प्रसंग उद्भवू शकेल,’ असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (११ जुलै) दिला.

२ घटनांमध्ये दीड लाखांना गंडा

$
0
0
शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दुचाकीवरून आलेल्या इसमांनी दोन व्यक्तींजवळील सोनसाखळी, साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख ४८ रुपयांचा ऐवज चोरून नेला.

मागासवर्गीय योजना गावागांवात पोहचविणार

$
0
0
मागासवर्गीय समाजाविषयीचे धोरण, त्यांच्यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपयुक्त योजनांची माहिती गावागावांतील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविली जात असून, त्यासाठी राज्याचा दौरा घेण्यात येत आहे, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मागासवर्गीय विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष के. राजू यांनी दिली.

व्यसनाधीनतेसाठी भारतीय तरुणांना लक्ष्य

$
0
0
‘दहशतवादासाठी लागणारा पैसा मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांच्या विक्रीतून उभा केला जातो. भारतातील तरुणांना व्यसनाधीन करण्यासाठी लक्ष्य केले जाते आहे. दहशतवाद रोखायचा असेल तर तरुणांनी व्यसनांपासून दूर राहायला हवे,’ असे​ आवाहन पुणे पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

PMP कडून सावत्र वागणुकीचा आरोप

$
0
0
पिंपरी-चिंचवड शहराला पीएमपीकडून नेहमीच सावत्रपणाची वागणूक मिळत असते, असा आरोप करत, या मार्गावर जुनाट बसेस पाठवल्या जातात, बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे. पूर्वीच्या पीएमटीच्या कर्मचाऱ्यांचे शोषण केले जात असल्याचा आरोप महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला.

‘साई’चे प्रशिक्षण केंद्र नागपुरात

$
0
0
नागपूर शहरातील खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘स्पोर्टस् अथॉरिटी ऑफ इंडिया‘ (साई) च्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात विस्तारित प्रशिक्षण केंद्र शनिवारपासून सुरू होत आहे.

पुरंदर, भोर तालुक्यात पाण्याची समस्या

$
0
0
पुरंदर आणि भोर तालुक्यात अद्याप मान्सूनचा पाऊस सुरू झाला नसल्याने शेती-पिके, पशुधन आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना धोक्यात आल्या आहेत. या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या उभी आहे. धरण पाणलोट क्षेत्रात अद्यापही मान्सून नाही. त्यामुळे मोठा दुष्काळ पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images