Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बीआरटी रेंगाळली प्रशासनाच्या निष्क्रियतेने

0
0
आळंदी आणि नगर रोडवरील बीआरटी प्रकल्प रेंगाळण्याचे खापर महापौर चंचला कोद्रे यांनी पुन्हा एकदा प्रशासनाच्या आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर आणि उदासीनतेवर फोडला आहे. ‘बीआरटी’बाबत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा तपशील दर आठवड्याला महापौर कार्यालयाकडे द्यावा, असे आदेशही त्यांनी मंगळवारी दिला.

शेवट गोड, ते सारेच गोड!

0
0
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पुणे विद्यापीठाच्या नामविस्तारावरून मंत्रिडळामध्ये झालेला वाद विसरून जाण्याची तयारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी दाखविली. ‘शेवट गोड झाल्याने वादात जायची इच्छा नाही,’ असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

नामविस्ताराने विद्यापीठात जल्लोष

0
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून केवळ राज्यातील किंवा देशातीलच नव्हे, तर महिलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील महिलांसाठी प्रेरणादायी कार्य होण्याची अपेक्षा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांनी मंगळवारी व्यक्त केली.

पालिकेच्या दवाखान्यातही मोफत औषधे

0
0
ग्रामीण भागातील सरकारी हॉस्पिटलप्रमाणेच राज्यभरातील महापालिका आणि नगरपालिकेच्या हॉस्पिटल, दवाखान्यातही उपचारास येणाऱ्या पेशंटला मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

‘MBA’ अॅडमिशनसाठी १० लाखांचा गंडा

0
0
सेनापती बापट रोडवरील एका ना​मांकित कॉलेजमध्ये ‘एमबीए’ला अॅडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने रायपूर येथील एका तरुणीला दहा लाख रुपयांना फसवल्याचा प्रकार कॉलेज आणि मेरिएट हॉटेलमध्ये घडला.

कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊच

0
0
‘विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात कोणालाही प्रवेश देण्यासंदर्भात पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येईल,’ असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.

नाव बदलासाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया

0
0
नाव, जन्मतारिख व धर्म बदलण्यासाठी आता सरकारने सुटसुटीत प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. याद्वारे नाव बदलण्यासाठी आता नागरिकांना ऑनलाइन अर्ज करता येणार असून, या नावांचे ई-राजपत्रही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पाणीकपात वाढीची टांगती तलवार

0
0
पावसाचे आगमन आणखी लांबल्यास शहरातील पाणीकपातीमध्ये वाढ करायची की नाही, यासंदर्भात येत्या शुक्रवारी बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, येत्या गुरुवारपासून मान्सून सक्रीय होण्याचा अंदाज हवामानखात्याने वर्तविला आहे.

‘BRT’पाठोपाठ ‘टर्मिनल’चाही बोजवारा

0
0
आळंदी-नगर रोडवर बीआरटी सुरू करण्यासाठी विश्रांतवाडी येथे टर्मिनल उभारण्याची मागणी पीएमपीने लावून धरली असली, तरी ही जागाच वादात असल्याने टर्मिनलचे स्वप्न प्रत्यक्षात येणे अशक्य बनले आहे. या परिसरात बस टर्मिनलसाठी इतरत्रही मोकळी जागा उपलब्ध नसल्याने ‘टर्मिनलशिवाय बीआरटी नाही’ ही भूमिका पालिका आणि पीएमपीच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

ढोल-ताशाचा विनापरवाना ‘गजर’

0
0
गणेश मंडळांकडून लाखो रुपयांची बिदागी घेणाऱ्या ढोलपथकांनी आता सरावासाठी नदीपात्रातील जागा कोणाच्याही परवानगीविना ताब्यात घेतली आहे. नदीपात्रात सभा अथवा इतर कार्यक्रम घेण्यासाठी आयोजकांना विविध परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण करावी लागत असताना, विविध ढोल पथकांचा सराव कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, अशी विचारणा केली जात आहे.

वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन

0
0
वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या उदरनिर्वाहाचा आर्थिक भार उचलण्यामध्ये जिल्हा परिषद हातभार लावण्याच्या प्रयत्नात आहे. परिषदेच्या कृषी समितीने वृद्ध शेतकऱ्यांना मासिक पेन्शन योजना लागू करण्यासंबंधिचा ठराव केला असून येत्या दोन दिवसांत तो राज्य सरकारला पाठविला जाईल.

शिक्षण मंडळे बरखास्त

0
0
केंद्र सरकारच्या ‘मोफत व सक्तीचा शिक्षण कायदा २००९’ची (आरट‌ीई) अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाल्याने शिक्षण मंडळे, प्राधिकरण, तसेच शिक्षण समित्यांना दिलेले अधिकार संपुष्टात आले आहेत.

CCTV योजना अडचणीत

0
0
पुण्यात जर्मन बेकरी आणि जंगली महाराज रस्त्यावर बॉम्बस्फोटांच्या घटना घडल्यानंतर सुरक्षिततेसाठी क्लोज सर्किट टीव्ही कॅमेरे (सीसीटीव्ही) लावण्याची योजना पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या भूमिकेमुळे अडचणीत आली आहे.

‘व्हॉट्स अॅप’मुळे सापडला खुनी

0
0
शहरात एकीकडे ‘व्हॉट्स अॅप’मुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, त्याच ‘व्हॉट्स अॅप’चा एका तरुणीच्या खुन्याला पकडण्यासाठी येरवडा पोलिसांना मोलाची मदत झाली. खराडी येथे तरुणीचा बॅगमध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख ‘व्हॉट्स अॅप’मुळे पटली आणि चोवीस तासांच्या आत पोलिसांनी तिच्या प्रियकराला गजाआड करत खुनाची उकल केली.

नवोदित साहित्य संमेलन यंदा भरणार लातूरमध्ये

0
0
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे लातूर येथे २५ ते २७ जुलै या कालावधीत २१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

बांधकाम व्यवसायिकाला ग्राहक मंचाचा दणका

0
0
फ्लॅटची संपूर्ण रक्कम घेऊनही भोगवटापत्र, खरेदीखत, देखभाल रक्कमेचा हिशोब तसेच सोसायटीच्या नावाने खरेदीखत करून न देणाऱ्या बांधकाम व्यावासायिकाने सहा आठवड्याच्या आत कायदेशीर बाबींची पूर्तता तक्रारदाराला करून द्यावी, असा आदेश ग्राहक न्याय मंचाने दिला.

सोनाराला पोलिस कोठडी

0
0
सोन्याचे दागिने चोरट्यांकडून विकत घेतल्याप्रकरणी पोलिसांनी एका सोनाराला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता अकरा जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनिरुद्ध पाठक यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

जाधव हत्या : आणखी एकाला अटक

0
0
जमीन पाहण्यासाठी बोलावून परशुराम उर्फ आबा पांडुंरग जाधव याच्यावर पिस्तुलाने गोळ्या झाडून त्याचा खून केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

चीनच्या चॉकलेट, कँडीजवर बंदी

0
0
चीनमध्ये उत्पादित झालेल्या चॉकलेट, कँडीज, गोळ्या, बिस्किटे, तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनांना भारतात विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी आता सहा वर्षांपासून वेळोवेळी ठराविक मुदतीसाठी वाढविण्यात आली असून यंदा ती एका वर्षासाठी वाढविण्यात आली आहे.

भाडेकरार आता महा ई-सेवा केंद्रांत

0
0
फ्लॅट किंवा दुकानांच्या भाडेकराराचे दस्त आता महा ई-सेवा केंद्रांतून ऑनलाइन पद्धतीने नोंदविता येणार आहेत. मुद्रांक व नोंदणी विभागाच्या या सुविधेचा प्रारंभ आज, गुरुवारी शहरातील पाच महा ई-सेवा केंद्रांतून केला जाणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images