Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बुडत्या ‘पीएमपी’ला अखेर पालिकेचा आधार

0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) झालेला १३१ कोटी रुपयांचा तोटा भरून काढण्यासाठी पीएमपीएमएलला १३ कोटी ६४ लाख रुपये उचल म्हणून देण्यास सोमवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. मागील वर्षी २०१३ -१४ मध्ये पीएमपीला हा तोटा झाला होता.

इनामदार हॉस्पिटलच्या विरोधात पालिकेतर्फे कॅव्हेट

0
0
महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेने इनामदार हॉस्पिटलला नोटीस बजाविली आहे. या नोटीसच्या विरोधात हॉस्पिटल प्रशासनाने कोर्टात धाव घेऊन स्थगिती घेऊ नये, यासाठी महापालिकेने कोर्टात ‘कॅव्हेट’ दाखल केले आहे.

पालिकेच्या बजेटला लागणार गळती

0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याबाबत हालचाली सुरू असतानाच, केंद्र सरकारने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना (जेएनएनयूआरएम) स्थगित केल्याने केंद्र आणि राज्याकडून मिळणाऱ्या अनुदानावरही पालिकेला पाणी सोडण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

वरसगाव धरणाच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त

0
0
मातीचा बांध, फाउंडेशन गॅलरी व इन्स्पेक्शन गॅलरीतून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पाणी गळतीमुळे वरसगाव धरणफुटीचा धोका निर्माण झाल्याने दुरुस्तीसाठी अखेर राज्य सरकारला मुहूर्त सापडला आहे.

बाळ्या चौधरी कोर्टात शरण

0
0
सराईत गुन्हेगार परशा उर्फ परशुराम जाधव याच्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित सूत्रधार बाळ्या चौधरी हा सोमवारी दुपारी शिवाजीनगर कोर्टात शरण आला. भारती विद्यापीठ तसेच गुन्हे शाखेकडून त्याचा शोध घेण्यात येत होता.

सोनोग्राफीसाठी डॉक्टरांची ‘रेफरल नोट’ बंधनकारक

0
0
प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री करता येणार नसल्याचा आदेश बजाविल्यानंतर आता सोनोग्राफीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची शिफारस (रेफरल नोट) बंधनकारक करण्यात आली आहे.

शुल्क सवलतीसाठी ४.५ लाखांचीच मर्यादा

0
0
ओबीसी गटाला आवश्यक असलेल्या नॉन क्रिमीलेअरसाठी वाढविलेली सहा लाख रुपयांच्या उत्पन्नाची मर्यादा फक्त प्रवेश आणि नोकरभरतीसाठीच लागू आहे. शुल्क सवलतीसाठी साडेचार लाख रुपयांचीच मर्यादा कायम आहे, असे राज्य सरकाने स्पष्ट केले आहे.

सावित्रीबाईंचे नाव हा विद्यापीठाचाच गौरव

0
0
पुणे विद्यापीठाच्या ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे’ या नामविस्ताराच्या प्रस्तावाला अंतिम मान्यता देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे विविध संस्था-संघटनांतर्फे स्वागत करण्यात आले. सावित्रीबाई फुलेंच्या स्त्री शिक्षणातील बहुमोल योगदानाची दखल घेत, विद्यापीठाला देण्यात आलेले त्यांचे नाव हा एका अर्थाने विद्यापीठाचाच गौरव असल्याचे सांगण्यात येत आहे.

मतदारांना घरपोच नोंदणी अर्ज

0
0
गेल्या वर्षी विविध मोहिमांमध्ये मतदारयादीतून नावे वगळण्यात आलेल्या सुमारे सात लाख मतदारांना जिल्हा प्रशासन घरपोच मतदार नोंदणी अर्ज पाठविणार आहे. या सर्वांना मतदारनोंदणीची संधी मिळावी, म्हणून निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

पानपट्टी होणार महायुतीची कार्यालये

0
0
सुगंधित सुपारी आणि प्रक्रिया केलेल्या तंबाखूच्या विक्रीवरील बंदी १८ जुलैपूर्वी मागे न घेतल्यास आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पानपट्टीची दुकाने महायुतीची कार्यालये होतील, असा इशारा पानविक्रेत्यांनी राज्य सरकारला दिला.

‘बेटरमेंट’साठी एकाच शाखेचा विचार

0
0
अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेदरम्यान दोन वेगवेगळ्या शाखांना प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना ‘बेटरमेंट’च्या माध्यमातून केवळ एकाच शाखेसाठीच्या कॉलेजमध्ये ‘बेटरमेंट’ मिळाल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

पुण्याच्या लौकिकाचा होतोय ‘खून’

0
0
पुण्यात गेल्या चोवीस तासात खुनाच्या दोन, तर खुनाच्या प्रयत्नाची एक घटना घडली आहे. गेल्या सहा महिन्यांत खुनाचे सर्वाधिक ६६ गुन्हे घडले आहेत. रेकॉर्डवरच्या गुन्हेगारावर पिस्तुलातून करण्यात आलेल्या गोळीबार, मुलाने वडिलांचा केलेल्या खून, दुचाकीस्वारांची लुटमार, सोनसाखळी चोऱ्या, घरफोडी यासारख्या घटनांनी शहरातील कायदा सुव्यस्थेचे वाभाडे निघत आहेत.

निम्हण यांच्यामुळे भाजप अस्वस्थ

0
0
आमदार विनायक निम्हण यांच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू झाल्याने शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपमधील इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यासंदर्भात पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ आज (मंगळवारी) प्रदेशाच्या नेत्यांची भेट घेणार असल्याचे समजते.

‘आत्म्या’कडून तपासाची माहिती?

0
0
आयुष्यभर अंधश्रद्धेविरोधात लढा देणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचे गूढ उलगडण्यासाठी पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी प्लँचेट करुन दाभोलकरांच्या आत्म्याशी संवाद (?) साधण्याचा खटाटोप केल्याचा गौप्यस्फोट एका नियतकालिकाने केला आहे.

‘विठ्ठल’नामातच हृदयाची उर्जा

0
0
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलनामात किती ताकद आहे हे पुन्हा एका संशोधनावरून अधोरेखित झाले आहे. विठ्ठलनाम घेताच तुमच्या हृदयाची उर्जा वाढत असल्याचा दावा वेदन विज्ञा संशोधन केंद्राने केला आहे.

अँड्रॉइड अॅपच्या मदतीने बेपत्ता व्यक्तींचा शोध

0
0
बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी त्यांचे नातेवाइक, पोलिस यंत्रणा जंगजंग पछाडत असते. मात्र, ‘सारे जहाँ से अच्छा’ या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेऊन ‘प्रोजेक्ट रियुनाइट’ हे अनोखे अँड्रॉइड अॅप्लिकेशन तयार केले असून, या अॅपच्या माध्यमातून बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सरकारकडून मराठवाड्याला सापत्न वागणूक

0
0
गेल्या वर्षीच्या दुष्काळाच्या काळात राज्य सरकारने सुविधा पुरवताना मराठवाड्याला सापत्नभावाची वागणूक दिल्याचे एका संशोधनात्मक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. सरकारने पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्याकडे दुर्लक्ष केल्याने या दुष्काळाची सर्वाधिक झळ मराठवाड्याला सोसावी लागली.

विविध मागण्यांसाठी नर्स निघाल्या संपावर

0
0
राज्यातील सरकारी डॉक्टरांचा संप मिटतो न मिटतो तोच राज्यातील परिचारिकाही आता येत्या पाच ऑगस्टपासून संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या बाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

सायन्सचे समीकरण कोठे सुटते?

0
0
बारावीनंतरच्या स्पर्धा परीक्षांच्या क्लासचे लोढणे आठवी-नववीपासून लादण्याबाबत फारसे सकारात्मक मत नसले, तरी विज्ञान विषयांत रस आणि गुणवत्ता आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी शालेय पातळीवर कोणतेच वेगळे प्रयत्न केले जात नाहीत, असेही निरीक्षण मांडले जात आहे.

पुणेकरांना दिली पावसाने हुलकावणी

0
0
कोकण आणि मराठवाड्यात मुसळधार बरसलेल्या पावसाने पुण्याला मात्र बायपास केले. दुपारी शहरात ढग दाटल्यामुळे सायंकाळी तरी जोरदार पाऊस होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र पावसाने पुणेकरांना हुलकावणीच दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images