‘अपुले मरण पाहिले म्या डोळा...’ असाच काहीसा अनुभव सध्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करणारे हजारो वाहनचालक घेत आहेत. जलद आणि सुरक्षित वाहतुकीसाठी बांधलेला हा द्रुतगती मार्ग ‘मृत्यूचा द्रुतगती’ मार्ग होत चालला आहे.
अपुले मरण पाहिले म्या डोळा!
↧
↧
मोदी सरकारवर राजू शेट्टी नाराज
‘यूपीए सरकारची शेतकरी विरोधी धोरणेच एनडीए सरकार मागील पानावरून पुढे सुरू ठेवणार असेल, तर आम्हाला नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी रविवारी दिला.
↧
गुणपडताळणीचे ‘वाजले की बारा’
पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशप्रक्रियांना सुरुवात झाली असतानाही, बारावीच्या गुणपडताळणीच्या अर्जांचा निकालच न मिळाल्याने प्रथम वर्षाचे प्रवेशोच्छुक विद्यार्थी हैराण झाले आहेत.
↧
‘जेईई’च्या चक्रात विद्यार्थी ‘चक्रावले’!
करिअरच्या तीव्र स्पर्धेचे ‘जोखड’ मानगुटीवर किती आणि कधीपासून टाकायचे, याचे तारतम्य पालकांकडून सुटत चालल्याने ‘जेईई-मेन’च्या निमित्ताने विद्यार्थी सध्या आठवीपासूनच ‘बिझी रुटीन’च्या चक्कीत पिसला जात आहे.
↧
जमीन घोटाळे राष्ट्रवादीशी संबंधित
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या जमिनींच्या ३२ कथित घोटाळ्यांच्या तक्रारींवर चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी दिले आहेत. यापैकी बहुसंख्य घोटाळ्यांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला.
↧
↧
योजनांच्या अंमलबजावणीअभावी रेल्वेसेवेचा विकास खुंटला
आतापर्यंत पुण्यातील रेल्वेचे सर्व प्रश्न मार्गी लागायला हवे होते. ऐतिहासिक वारसा असणाऱ्या पुणे स्टेशनला जागतिक दर्जा मिळायला हवा होता. मात्र, त्याची पूर्तता अद्याप होऊ शकलेली नाही. पुण्याच्या आसपास असणाऱ्या रेल्वे स्टेशनचादेखील आदर्श स्टेशनच्या यादीमध्ये समावेश होणे अपेक्षित होते.
↧
पिंपरीत मुलाने केला वडिलांचा खून
दारूच्या नशेमध्ये घरी आलेल्या वडिलांनी खाण्यासाठी मागितलेल्या चिकनवरून झालेल्या वादात, एका सतरा वर्षांच्या मुलाने वडिलांच्या डोक्यात आणि शरीरावर कोयत्याने वार करून त्यांचा खून केला.
↧
सीएनजी किटच्या मागणीसाठी मोर्चा
पिंपरी-चिंचवडमधील रिक्षांना सीएनजी किटसाठी अनुदान द्यावे, यासह इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने महापालिकेवर सोमवारी रिक्षा मोर्चा काढण्यात आला. निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्प समूहाला पुष्पहार अर्पण करून सकाळी ११ वाजता पंचायतीचे प्रदेशाध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला प्रारंभ झाला.
↧
आयुक्तांच्या बंगल्यावर तब्बल २४ कर्मचारी
महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी किती कर्मचारी असावेत, याबाबत महाराष्ट्र प्रांतिक महापालिका अधिनियमात स्पष्टता नाही. परंतु, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांच्या ‘आविष्कार’ या बंगल्यावर २४ कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्या वेतनावर दरमहा सुमारे साडेपाच लाख रुपये खर्च होत असल्याची माहिती पुढे आली आहे.workers @
↧
↧
मल्टिप्लेक्स मालकांच्या मालमत्तेचा शोध
प्रेक्षकांकडून बेकायदा आकारलेला ६८ कोटी रुपयांचा करमणूक कर वसूल करण्यासाठी शहरातील सहा मल्टिप्लेक्स मालकांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
↧
स्मरणचिन्हांद्वारे करणार वैभवशाली परंपरेचे जतन
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक असलेला वासुदेव, कडकलक्ष्मी, शुभचिन्ह असलेले तुळशीवृंदावन.. मराठी नववर्षाचे द्योतक गुढी… पिढ्यानपिढ्या वापरली गेलेली तांब्या-पितळेची भांडी इथपासून ते वारी पंरपरेतील अनेक पैलू उलगडणाऱ्या वस्तूंचे जतन आता स्मरणचिन्हांच्या माध्यमातून होणार आहे.
↧
मालवाहतूक १५ जुलैपासून बंद ठेवणार
राज्यातील जकात रद्द करण्यात आली असली तरी एस्कॉर्टच्या (रहदारी फी) नावाखाली होत असणारी वसुली तत्काळ बंद करावी, या मागणीसाठी १५ जुलैपासून मालवाहतूक करणारी वाहने राज्यभर बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स बस वाहतूक महासंघातर्फे घेण्यात आला आहे.
↧
पालक-शिक्षक संघ बंधनकारकच
राज्यात लागू झालेल्या शुल्क नियंत्रण कायद्यातील तरतुदींनुसार शाळांनी येत्या १६ जुलैपर्यंत काळात पालक- शिक्षक संघाची स्थापना करणे बंधनकारकच असल्याचे राज्याचे शिक्षण आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले.
↧
↧
बोर्डाच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर नाही
दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीची वेळापत्रके शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच जाहीर करण्याच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (बोर्ड) पायंड्यामध्ये यंदा खंड पडला आहे.
↧
क्लासचे जड झाले ओझे
‘जेईई-मेन’च्या अभ्यासाचे जोखड आठवी-नववीपासूनच विद्यार्थ्यांच्या मानुगटीवर ठेवण्याच्या ट्रेंडबाबत मुख्याध्यापकांकडूनही नाराजीचा सूर उमटतो आहे. विद्यार्थ्यांवर अशा प्रकारचा दबाव टाकल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे कोमेजून जाते, याचे अनुभवही काहींनी ‘मटा’बरोबर शेअर केले.
↧
अवघ्या १.५ टक्के गरिबांना मोफत आरोग्य सेवा
दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) वर्गातील गरिबांना राष्ट्रीय स्वास्थ बिमा योजनेचे ११ टक्के गरिबांनाच ‘स्मार्ट कार्ड’ देण्यात आले असले तरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या पेशंटपैकी अवघ्या दीड टक्के पेशंटलाच प्रत्यक्षात मोफत आरोग्य सेवा मिळाल्याची माहिती पुढे आली आहे.
↧
सुभाष माने यांना अखेर पोलिस संरक्षण
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा आणि संचालकांविरूद्ध फौजदारी कारवाईचा आदेश देणारे राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांना अखेर पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.
↧
↧
बँकेत पैसे भरायला जाणाऱ्या मॅनेजरला लुटले
कल्याणीनगर येथील मॉलमध्ये पार्किंगचे जमा झालेले पाच लाख रुपये बँकेत भरण्यासाठी घेवून जात असताना लुटल्याचा प्रकार सोमवारी दुपारी घडला. कारमधून पैसे घेवून जात असताना चालकाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून ही लुटमार करण्यात आली आहे.
↧
पावसामुळे ४० लाख रोपे वेटिंगवर
वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी राज्य सरकारने निश्चित केलेल्या दरवर्षी कोट्यवधी झाडे लावायच्या धोरणाला यंदा जुलै सुरु झाला तरी अद्याप मुहुर्त मिळालेला नाही. एरवी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणारा वृक्षारोपणाचा कार्यक्रम यंदा पावसाअभावी लांबला आहे.
↧
‘एक्स्प्रेस-वे’ वरील वाहनांची ‘आरटीओ’द्वारा झाडाझडती
एक्स्प्रेस-वे वरून ये-जा करणाऱ्या वाहनांच्या तपासणीची मोहीम प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
↧