Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आयटीआय ऑनलाइन प्रवेशात अडचणी

$
0
0
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठीच्या (आयटीआय) ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या सुरुवातीलाच ब्रेक लागला आहे. सलग दुसऱ्या वर्षीही या प्रक्रियेतील अडथळ्यांची शर्यत सुरूच आहे. तांत्रिक अडचणींमुळे आता ही प्रवेशप्रक्रिया पाचऐवजी दहा जुलैला सुरू होणार आहे.

भाजीपाल्याचे भाव कडाडलेलेच

$
0
0
पावसाने दडी मारल्यामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. पालेभाज्यांचे दर तेजीत असून त्यांचे दर वीस रुपयांच्या पुढे गेले आहेत. कांदा, बटाटा, लसूण, हिरवी मिरची, सिमला मिरची, शेवगा आणि कैरीच्या दरामध्ये वाढ झाली असून आले, भेंडी, गवार आणि पावट्याच्या किमतीमध्ये किरकोळ घट झाली आहे.

अपयशाला न जुमानता प्रयत्न करीत रहा

$
0
0
‘कोणतेही काम करताना अपयश येणे स्वाभाविक आहे. मात्र, अपयशाला ‘कॅप्टन’ होऊ न देता पुन्हा पुन्हा प्रयत्न करत त्यावर मात करणेच महत्त्वाचे असते. ज्ञान मिळवण्यासाठी कायम धडपड केली पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवून मोठ्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी कार्यरत राहिल्यानेच यशाचा मार्ग सापडतो,’ अशा शब्दांत यशाचा कानमंत्र माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी शुक्रवारी दिला.

मोडी कागदपत्रे शोधणे होणार सोपे

$
0
0
भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रही असलेल्या लाखो मोडी लिपीतील कागदपत्रांची सूची तयार करण्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे अडीच हजार कागदपत्रांच्या नोंदी असलेल्या पहिल्या खंडाचे काम पूर्ण झाले असून, मंडळाच्या वर्धापनदिनी (७ जुलै) या खंडाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

लष्करात भरतीसाठी ‘दलाली’ अनावश्यक

$
0
0
लष्कराची भरतीप्रक्रिया आता कम्प्युटराइज्ड करण्यात आल्याने त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा वाव आता नाही. तरीही, कोणतीही माहिती न घेता अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून लष्करात नोकरीसाठी लाखो रुपयांचा गंडा घालून घेण्याची आफत नागरिक स्वतःवर ओढवून घेत आहेत.

पटेल हॉस्पिटलच्या बिलांमध्ये गैरव्यवहार

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये नियमबाह्य पद्धतीने वैद्यकीय बिलांत सवलत देण्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर हॉस्पिटलच्या कारभारावर आगामी तीन महिने बोर्डाची करडी नजर राहणार आहे.

साखळीचोरांच्या २ टोळ्या गजाआड

$
0
0
गुन्हे शाखेच्या युनीट तीनने सोनसाखळी हिसकावणाऱ्या दोन टोळ्या गजाआड केल्या असून त्यांनी शहरात १२ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहेत. त्यातील एक टोळी ठाणे येथून तर दुसरी टोळी श्रीरामपूर येथून पुण्यात येत असे. या आरोपींकडून २५० ग्रॅम वजनाचे सुमारे दहा लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

‘सोफोश’च्या नावाने फसवणूक

$
0
0
ससून हॉस्पिटलच्या आवारात लहान मुलांसाठी कार्यरत असलेल्या ‘सोफोश’ सोसायटी ऑफ फ्रेंड्स या संस्थेच्या नावाचा दुरुपयोग एका संस्थेकडून प्रयत्न सुरू आहे. देणगी अथवा वस्तू घेऊन नागरिकांची फसवणूक करीत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

पीएमपी कर्मचाऱ्यांचे ‘अन्न सत्याग्रह’

$
0
0
पीएमपी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार केलेल्या वेतनवाढीमधील थकित असणाऱ्या फरकाची रक्कम तात्काळ देण्यात यावी, यामागणीसाठी महाराष्ट्र कामगार मंचाने पीएमपीच्या मुख्यालयाबाहेर अन्न सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.

‘नर्सिंग’च्या मान्यतेमुळे विद्यार्थ्यांना दिलासा

$
0
0
शैक्षणिक वर्ष २०१२-१३ मध्ये एम.एस्सी. पी.बी.बीएस्सी व बीएस्सी या नर्सिंग अभ्यासक्रमासाठी सामाईक प्रवेश न घेता देण्यात आलेल्या प्रवेशाना प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता देण्य़ास नकार दिला होता. मात्र हायकोर्टाच्या दणक्यानंतर समितीने या प्रवेशास मान्यता दिल्याने राज्यातील नर्सिंगच्या ३९० विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

महिनाभरापुरतेच पाणी

$
0
0
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या एकूण ३० ‘टीएमसी’पैकी सध्या फक्त १.४२ टीएमसी एवढाच उपयुक्त साठा असून, तो आठ ऑगस्टपर्यंतच पुरेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ११ जुलैपर्यंत मान्सून सक्रिय झाला नाही, तर मात्र पाणीबचतीसाठी आणखी तीव्र उपाय योजावे लागणे अपरिहार्य ठरणार आहे.

‘वाजायला लागले की सर्वांच्याच अंगात येते..!’

$
0
0
‘वाजायला लागले, की सर्वांच्याच अंगात येते. त्याप्रमाणेच निवडणुका जवळ आल्याने सर्वांनीच स्वबळाची भाषा सुरू केली आहे. गेल्या पंधरा वर्षांची आघाडी आम्ही तोडणार नाही; पण राष्ट्रवादीला खुमखुमीच असेल, तर आमचीही स्वबळावर लढण्याची तयारी आहे,’ असे राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांनी रविवारी म्हटले आहे.

पौड रोडवर भुयारी मार्ग नको

$
0
0
पौड रोड येथील आनंदनगर चौकात भुयारी मार्ग करण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. या भागात यापूर्वी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल उभारले असून सध्या हे सर्व मार्ग धूळखात पडले आहे.

दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

$
0
0
केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा शहर काँग्रेसच्या वतीने ‘दुचाकी ढकलणे’ आंदोलन करून निषेध करण्यात आला. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय छाजेड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

तेरा लाखांचा दंड वसूल

$
0
0
‘एक्स्प्रेस वे’वर नियम तोडणाऱ्या वाहनांवर कारवाईच्या मोहिमेमध्ये आतापर्यंत महामार्ग पोलिसांनी ११ हजार ९४६ वाहनांकडून १३ लाख ४८ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. जानेवारी ते मे या कालावधीत वाहतूक पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

५ महिन्यांत ४३ अपघात

$
0
0
वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे ‘एक्स्प्रेस वे’वरील अपघातांच्या संख्येत भर पडल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या कालावधीत पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर ४३ अपघात झाले असून, त्यामध्ये १२ जण मृत्यूमुखी पडले आहेत.

अपघात रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज

$
0
0
‘एक्स्प्रेस वे’वर गावे असलेल्या परिसरात सर्व्हिस रोड न केल्याने ग्रामस्थांकडून ‘एक्स्प्रेस वे’वर दुचाकी, ट्रॅक्टर, जनावरे, बैलगाडी आणण्याचे प्रकार केले जातात. या ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्याबरोबरच ‘एक्स्प्रेस वे’ची सुरक्षितता वाढवण्यासाठी एकत्रितरित्या प्रयत्न झाले पाहिजेत, अशी अपेक्षा पोलिस अधीक्षक मनोज लोहिया यांनी व्यक्त केली आहे.

अॅम्ब्युलन्स सेवेला हवा ‘स्पीड’

$
0
0
पुणे-मुंबई ’एक्स्प्रेस वे’वर वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ‘गोल्डन अवर्स’मध्ये जखमींना जीवदान देण्यासाठी कार्यरत ‘इमर्जन्सी’ मेडिकलच्या १०८ या सेवेकडे केवळ तीनच अॅम्ब्युलन्स असून, त्या अपुऱ्या पडत आहेत. पेशंटला वेळेवर उपचार मिळू न शकल्याने त्यांना प्राणांना मुकावे लागत आहे.

प्रवाशांची सुरक्षा ‘राम भरोसे’

$
0
0
महामार्ग पोलिस आणि ग्रामीण पोलिस ठाण्यातील अपुऱ्या मनुष्यबळाअभावी पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा ‘राम भरोसे’ झाली आहे.

सरकारी घोषणा हवेतच

$
0
0
मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर सीसीटीव्ही, एअर अॅम्ब्युलन्स, ट्रॉमा सेंटर, अत्याधुनिक सर्वेलन्स आदी सुविधा पुरविण्याच्या राज्य सरकारच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. या मार्गावर होणारे अपघात, दरोड्यांच्या घटनांकडे राज्य सरकारचे साफ दुर्लक्ष झाले असून, राज्य सरकारच्या अनास्थेबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images