Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वसंत ढोबळे यांना भैरवनाथ गौरव पुरस्कार

0
0
मुंबई येथे उशीरापर्यंत चालणार्या पार्ट्यांवरील कारवाईफेम सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत ढोबळे यांना त्यांच्या मूळ गावच्या पंचक्रोशितील भैरवनाथ नागरी पतसंस्थेने ‘भैरवनाथ गौरव पुरस्कार’ जाहीर केला आहे. १२ ऑगस्टला आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथील सभागृहात खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पतसंस्थेचे सचिव खंडेराव आढळराव यांनी ही माहिती दिली.

जान्हू बरूआ यांना पुरस्कार

0
0
ईशान्य भारताला मुख्य प्रवाहाशी जोडणार्या व्यक्तींना सरहद संस्थेतर्फे या वर्षीपासून ‘भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार’ देण्यात येणार आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते जान्हू बरूआ यांना या वर्षीचा पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे. ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

धबधब्यात तरुण बुडाला

0
0
उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यातील धबधब्यात एक तरुण वाहून गेल्याची घटना रविवारी घडली. त्याचा मृतदेह मिळाला असून महेश यल्लप्पा बडगिरे (१९) असे त्याचे नाव होते.

सुखोईच्या निर्मात्यांशी हवाई दलाची चर्चा

0
0
सुखोई-३० एमके प्रकारच्या विमानांमधील फ्लाय-बाय-वायर (एफबीडब्ल्यू) यंत्रणेच्या रचनेशी निगडीत काही तांत्रिक मुद्यांवर भारतीय वायू सेनेतर्फे (आयएएफ) या विमानांची निर्मिती करणार्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. पुण्यात वाडे बोल्हाईजवळ सुखोई- ३० च्या अपघाताच्या कारणांची तपासणी करताना हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारे ही चर्चा केली जाणार असल्याची माहिती भारतीय हवाई दल प्रमुख एन. ए. के. ब्राऊन यांनी पुण्यात दिली.

लोहगावच्या विमानतळाचे आधुनिकीकरण नोव्हेंबरपासून

0
0
पुण्यातील लोहगाव हवाई तळाच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया येत्या नोव्हेंबर महिन्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल एन. ए. के. ब्राऊन यांनी शनिवारी पुण्यात दिले. या प्रक्रियेमध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसोबतच लोहगाव विमानतळासाठी स्वयंचलित ‘एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’ही बसविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहितीही त्यांनी दिली.

जखमी मने अन् कोरडी आश्वासने....

0
0
ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक स्वास्थ्य असलेले मावळ गेल्यावर्षी (नऊ ऑगस्ट २०११) पवना नदीच्या पाण्यावरून झालेल्या आंदोलनातील गोळीबारामुळे अस्वस्थ झाले. ही अस्वस्थता अजूनही कायम आहे. या दुर्घटनेमुळे झालेल्या कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय परिणामांचा घेतलेला हा आढावा......

फ्रेंडशिप दिवशीच तीन मित्रांचा अपघाती मृत्यू

0
0
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर कार आणि ट्रेलरच्या अपघातात तळेगाव दाभाडे येथील तीन युवकांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी पहाटे दोनच्या सुमारास सोमाटणे फाटा येथील लडकत पेट्रोल पंपासमोर झाला. फ्रेंडशिप दिवशीच या तीन मित्रांवर कोसळलेल्या या दुर्घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

सीएनजीबाबत रिक्षा संघटना आक्रमक

0
0
पुण्यातील विस्कळीत झालेला ‘सीएनजी’चा पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीवर रिक्षा पंचायतीने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पुरवठा सुरळीत करण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आश्वासन दिशाभूल करणारे ठरल्याचा आरोप पंचायतीने केला आहे. आता पंधरा ऑगस्टपूर्वी आश्वासनाची पूर्तता न झाल्यास रिक्षा बंद आंदोलन पुकरण्याचा इशारा पंचायतीने दिला आहे. त्यामुळे ‘सीएनजी’च्या मुद्यावरून सरकार आणि रिक्षा संघटना यांच्यातील वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

पुणेकरांची एव्हरेस्टची सफर...

0
0
एव्हरेस्टची मोहीम आखण्यापूर्वी केलेली शारीरिक आणि मानसिक तयारी, कुटुंबिय आणि हजारो पुणेकरांकडून मिळालेले प्रोत्साहन, गिर्यारोहण करताना आलेले अविस्मरणीय अनुभव कथन करून एव्हरेस्टवीरांनी शनिवारी पुणेकरांना जणू एव्हरेस्टची सफरच घडविली.

भाज्या निघाल्या स्वस्ताईकडे

0
0
टोमॅटो, काकडी, भेंडीसह कोथिंबीर आणि मेथी या पालेभाज्यांची आवक भरपूर असल्याने बहुतेक भाज्या स्वस्त झाल्या आहेत. टोमॅटोचा भाव निम्म्याने उतरला असून किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या जुडीचा भाव आठ ते १० रुपये आहे. मात्र, कांदापात अजूनही थोडीशी महागच आहे. भेंडी, घेवडा, कोबी, फ्लॉवर, गाजर आणि काकडीचे भाव टिकून आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून पुण्यासह राज्यात समाधानकारक पाऊस होत आहे.

आयुर्वेद शिक्षकांवर बेकारीची कु-हाड?

0
0
अभ्यासक्रमाच्या रचनेत बदल करून शिक्षकांची संख्या कमी करण्याचा फतवा आयुर्वेद शिक्षणाचे नियमन करणार्या ‘आयुष’ या केंद्रीय विभागाने काढला आहे. परिणामी, देशातील २३५ आयुर्वेद कॉलेजांमधील सुमारे तीन हजार शिक्षकांवर बेकारीची कुर्हाड कोसळणार असून हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

कृत्रिम पावसाचा फसलेला प्रयोग

0
0
राज्यातील काही भागांतील दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली असली, तरी कृत्रिम पावसाचा पूर्वी फायदा न झाल्याने आता राज्यात परत कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार नसल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केले.

उत्सवात बॉक्स कमानींना मनाई

0
0
जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी स्फोटांच्या पार्श्वभूमीवर यंदा उत्सवांमध्ये बॉक्स कमानी उभारू नयेत, असे महापालिका आणि पोलिस यंत्रणेने म्हटले आहे. पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ आणि महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी रविवारी याबाबत आपली भूमिका मांडली आणि मंडळांना सहकार्याचे आवाहन केले.

फ्रेंडशिप दिनी ३ मित्रांचा मृत्यू

0
0
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर कार आणि ट्रेलरच्या अपघातात तळेगाव दाभाडे येथील तीन युवकांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी पहाटे दोनच्या सुमारास सोमाटणे फाटा येथील लडकत पेट्रोल पंपासमोर झाला. फ्रेंडशिप दिनीच या तीन मित्रांवर कोसळलेल्या या दुर्घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोटच्या पोरीला आईनेच फेकून दिले

0
0
केइएम हॉस्पिटलसमोरून पळविलेल्या चिमुरडीच्या प्रकरणाची उकल झाली असून, दुर्धर आजाराने ग्रासलेल्या पोटच्या गोळयाला आईनेच फेकून दिले असल्याचा हा प्रकार असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी चिमुरडीच्या आईला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पंचगंगा प्रदूषणमुक्तीला प्राधान्य

0
0
जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांना चालना देतानाच मराठी चित्रपटसृष्टीचा अविभाज्य भाग असलेल्या चित्रनंगरीसह पंचगंगा नदीच्या प्रदुषणमुक्तीला प्राधान्य देणार असल्याचे नुतन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आपण प्रोफेशनल अॅडमिनेस्टर असल्याचा दावाही त्यांनी केला.

'ते' ११४ अर्ज अपात्र

0
0
नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘बोर्ड ऑफ स्टडीज’च्या पदवी, पदव्युत्तरच्या एकूण ३६ जागांसाठी झालेल्या अर्ज छाननीत ११४ अर्जदार अपात्र ठरले. स्थानिक मासिकांमध्ये संशोधन प्रसिद्ध करून त्याच्या संदर्भाची ‘मात्रा’ शिक्षकांना फारशी उपयोगी न पडल्याने त्यांचेही अर्ज बाद ठरले आहेत.

शाळेत विद्यार्थीनीचा विनयभंग

0
0
बंडगार्डन परिसरातील एका कॉन्व्हेंट शाळेच्या मुख्याध्यापिकेने आपल्याच विद्यार्थिनीचा युनिफॉर्म उतरविण्याची शिक्षा केली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेवर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पुणे स्फोटःमहत्त्वाचे पुरावे सापडले

0
0
पुण्यातील साखळी बॉम्बस्फोटांसंदर्भात ‘सीसीटीव्ही’ कॅमे-यांमधून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. या कॅमे-यांनी आरोपीची छबी टिपली असून, दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) या आरोपीची ओळख पटली आहे. त्यामुळे त्याच्या शोधाच्या दिशेने तपासाची सूत्रे केंद्रित करण्यात येत आहेत.

स्वस्त घरकुल प्रकल्पातील लाभार्थ्यांना दिलासा

0
0
केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम प्रकल्पांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणा-या स्वस्त घरकुल प्रकल्पातील लाभार्थ्यांकडून आकारले जाणारे मुद्रांक शुल्क माफ करण्यात येणार असून, त्यांच्याकडून केवळ शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून घेतले जाईल, असे महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी मंगळवारी सांगितले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images