Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बसखरेदीचा प्रस्ताव वाढीव दराचा

0
0
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेतून (जेएनएनयूआरएम) केली जाणारी बसखरेदी प्रकल्प अहवालापेक्षा तब्बल १७ ते २२ लाख रुपये जादा दराने केली जाणार असल्याची कबुली पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या प्रशासनानेच (पीएमपी) दिली आहे.

साहित्य ‘व्यवहारा’बाबत ‘शक’

0
0
अखिल भारतीय साहित्य महामंडळाने घुमान येथे ८८वे संमेलन घेण्याची घोषणा झाल्याने प्रकाशकांमध्ये नाराजी आहे. संमेलनाच्या ठिकाणी मराठी भाषकांचे वास्तव्य नसल्याने ग्रंथविक्री होणार नाही, असे त्यांना वाटते. त्यामुळे संमेलनाला न जाण्याचाच विचार काही प्रकाशक बोलून दाखवत आहेत.

मोबाइल कंपन्यांकडून लूट

0
0
आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाइल दिसतो. मोबाइलचा वापर आता मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मोबाइलमुळे एका क्षणात आपण जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलेल्या व्यक्तीबरोबर लगेच बोलू शकतो.

राज ठाकरेंशी चर्चा करा

0
0
पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याच्या मुद्द्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करणे आवश्यक असल्याचा आग्रह पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी धरला आहे. त्याचा उपयोग आगामी विधानसभा निवडणुकीसाठी होऊ शकेल, असा दावा करण्यात आला.

जागावाटपात भोसरी शिवसेनेचीच

0
0
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात भोसरी मतदारसंघ शिवसेनेलाच राहील. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मागणीचा विचार केला जाणार नाही, असे आश्वासन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला गुरुवारी (तीन जुलै) दिले.

जिल्ह्यातील रुग्ण सेवा कोलमडली

0
0
राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे जिल्ह्यातील रुग्णसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक ठिकाणी शेकडो रुग्ण उपचारांअभावी तळमळत असून, त्यामुळे त्यांच्यासह नातेवाइकांचीही ससेहोलपट होत असल्याचे चित्र आहे.

मंडई होणार अधिक ताजी

0
0
पुण्याच्या ऐतिहासिक वारशांमधील एक महत्त्वाची वास्तू असलेल्या महात्मा फुले मंडईच्या नूतनीकरणाच्या कामाने वेग धरला असून, पुढील सहा महिन्यात उत्कृष्ट वास्तूशास्त्राचा नमूना असलेली मंडई एका नव्या रूपात पुणेकरांच्या भेटीला येणार आहे.

व्हिसाच्या बहाण्याने लाखोंचा गंडा

0
0
दुबई आणि दक्षिण आफ्रिका येथे फिटर आणि वेल्डरच्या नोकरीसाठी व्हिसा मिळवून देण्याच्या बहाण्याने सुमारे अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रंगल्या पंचमदांच्या आठवणी

0
0
‘कुछ ना कहो...कुछ भी ना कहो...’, ‘तेरे बिना जिंदगी से’, ‘नाम गुम जाएगा..’, ‘तुमसे मिलके’ अशा रसिकप्रिय गाण्यांसह उलगडलेल्या आर. डी. बर्मन उर्फ पंचमदांच्या आठवणींची बहारदार मैफील रसिकांनी अनुभवली. निमित्त होते पंचमरत्न पुरस्कार सोहळ्याचे.

‘पीएफ’ बुडवणाऱ्या संस्थांचे भवितव्य टांगणीला

0
0
प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) न भरता कर्मचाऱ्यांचे भविष्य अधांतरी ठेवणाऱ्या देशातील ‘पीएफ’ बुडवणाऱ्या संस्थांचेच भवितव्य एक ऑगस्टपासून टांगणीला लागणार आहे.

‘बदले की आग में’ वाढताहेत सायबर गुन्हे

0
0
देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, सर्वाधिक गुन्हे महाराष्टात नोंदविण्यात आल्याचे समोर झाले आहे. राज्याच्या खालोखाल आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. आरोपींच्या वयोगटानुसार अठरा वर्षाखालील युवकांवर सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.

‘टेमघर’च्या फुटीचा धोका टळणार

0
0
सेकंदाला सहाशे लिटरहून अधिक पाणी गळतीमुळे अत्यंत धोकादायक स्थितीत असलेल्या टेमघर धरणाच्या भिंतीतील भगदाडे बुजविण्याचे काम जलसंपदा खात्याने अखेर सुरू केले आहे. या कामामुळे धरणाच्या मजबुतीबरोबरच पाणी गळती कमी होण्यास मदत होणार आहे.

सामना ब्राझीलमध्ये, ‘लढत’ पुण्यात!

0
0
युरोपीय भूमीवर कट्टर प्रतिस्पर्धी असणारे फ्रान्स-जर्मनी हे देश ब्राझीलमधील वर्ल्डकप फुटबॉलच्या रणभूमीवर आज आमने-सामने येणार आहेत. या सामन्याची कंपने पुण्यातही जाणवणार आहेत!

नॉन क्रिमीलेअर दाखला तीन वर्षांसाठी देणार

0
0
इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना (ओबीसी) प्रवेशासाठी आवश्यक असलेला नॉन क्रिमीलेअर दाखला एकऐवजी तीन वर्षांसाठी मिळणार आहे. त्यामुळे दरवर्षी हा दाखला काढण्याची हजारो विद्यार्थ्यांची कटकट आता वाचणार असून, प्रवेशाच्या काळात दाखले देणाऱ्या यंत्रणेवरील ताणही निम्म्याने कमी होणार आहे.

मतदार नोंदणी उत्साहात!

0
0
जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत पर्वती विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक, म्हणजे तब्बल २७ हजार ३३२ जणांनी मतदार नोंदणीसाठी अर्ज केले आहेत; मात्र त्यामध्ये यापूर्वी वगळण्यात आलेल्या मतदारांपैकी केवळ साडेतेराशे जणांनीच पुन्हा मतदार नोंदणीसाठी अर्ज केल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोण होणार संमेलनाध्यक्ष?

0
0
पंजाबमधील घुमान येथे ८८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर साहित्य वर्तुळात संमेलनाध्यक्ष कोण होणार याचे वेध लागले आहेत. ज्येष्ठ कथाकार भारत सासणे आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांची नावे संमेलनाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

डॉक्टरांच्या पगारावर ‘संक्रांत’

0
0
विविध मागण्यांसाठी संपावर गेलेल्या राज्यातील बारा हजार डॉक्टरांचा संप हा बेकायदा ठरवण्यात आला आहे. संपकाळात डॉक्टरांनी पेशंटला सेवा देण्यात कुचराई केल्यास त्यांना भविष्यात संपकालावधीतील वेतनापासून वंचित ठेवण्यात येईल, असा सज्जड दम आरोग्य विभागाने दिला आहे.

नदीपात्रातील रस्त्यावर आक्षेप

0
0
महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात मुठा नदीच्या ब्ल्यू लाइनमध्ये रस्ते, कालव्याच्या वॉटर बॉडीवर अन्य आरक्षण व नदीपात्रात रस्त्याचे आरक्षण ठेवण्यावर जलसंपदा विभागाने आक्षेप घेतला आहे. ज्ञानेश्वर पादुका चौक येथील पाटबंधारे कर्मचाऱ्यांच्या कॉटेजचे आरक्षण बदलण्यासही आव्हान देण्यात आले आहे.

स्वप्नाला दातृत्वाचे ‘इंधन’

0
0
हाताची बोटे चिघळेपर्यंत दररोज आठ तास धुण्या-भांड्यांची कामे करणारी आई, बिगारीचे काम करणारे वडील, अगदीच तुटपुंजे उत्पन्न, छोटेसे घर... या सर्व प्रतिकूलतेवर मात करून निरंजन राजाराम गडदे याने नेटाने अभ्यास केला आणि दहावीला ९१.६० टक्के गुण मिळविले आहेत.

महिला ब्यूटिशियनही संघटित

0
0
महिलांच्या सौंदर्याशी निगडित समस्या सोडविण्याचे काम करणाऱ्या ‘ब्यूटिशियन’ला सतत अपडेट राहावे लागते, पण त्या तुलनेत या क्षेत्रात माहितीचे स्रोत खूप मर्यादित आहेत, त्यामुळे बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पुण्यातील महिला ब्यूटिशियन एकत्र आल्या आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images