Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तीन हजार उमेदवारांना पोलिस भरतीसाठी बोलावणे

$
0
0
पुणे पोलिस दलात सुरू असलेल्या पोलिस भरतीसाठी तीन हजार ​उमेदवारांना एक जुलैपासून बोलवण्यात आले आहे. ज्या उमेदवारांना त्यांच्या शेड्यूलविषयी मोबाइलवर ‘मेसेज’ मिळाला नसेल त्यांनी पुणे पोलिसांच्या बेवसाइटवरून अथवा पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात लावलेल्या यादीद्वारे माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘माध्यमांच्या गदारोळात मुलांना ‘फोकस्ड’ ठेवणे कठीण’

$
0
0
‘आताच्या काळात यशाची संकल्पना बदलणे आवश्यक आहे. विविध माध्यमांच्या गदारोळात मुलांना ‘फोकस्ड’ ठेवणे कठीण आहे. पूर्वीच्या काळात मर्यादित माध्यमांमुळे संधी मिळत नव्हती. सद्यस्थितीत मुलांना संस्कार देणे महत्त्वाचे आहे. मात्र, ते तितकेच अवघड आहे,’ असे मत अभिनेते सुबोध भावे यांनी मांडले.

कँटोन्मेंटचे चित्र बदलणार तरी केव्हा?

$
0
0
पुणे शहराच्या मध्यभागी येणाऱ्या; पण स्वतंत्र अस्तित्त्व असलेल्या पुणे कँटोन्मेंट बोर्डाने पहिल्यांदाच शहर विकास आराखडा (डीपी) बनविला आहे. सुमारे १९७ वर्षांची परंपरा लाभलेल्या या जुन्या ऐतिहासिक परिसराचा कायापालट करण्यासाठी सुमारे २३८ कोटी रुपयांची गरज भासणार आहे.

हद्दवाढीपेक्षा स्वातंत्र्य महत्त्वाचे

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत देहू, आळंदीसह नव्याने १४ गावे समाविष्ट करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. मात्र, जकात बंद केल्यानंतर महापालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता गावे नव्याने समाविष्ट करण्याऐवजी स्वतंत्र पालिका किंवा नगरपालिकेचा विचार व्हावा, असा पर्याय पुढे येत आहे.

पाणीपुरवठ्याचे डोंगराएवढे आव्हान

$
0
0
महापालिका हद्दीत नव्याने ३४ गावांचा समावेश करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे या नवीन गावातील नागरिकांना आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेवर असणार आहे.

हद्दवाढ, कोर्ट फेऱ्यांमध्ये अडकण्याचा धोका

$
0
0
महापालिका हद्दीत ३४ गावांच्या समावेश करण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेला रविवारी एक महिना पूर्ण झाला असून, आता गावांच्या समावेशाची अंतिम अधिसूचना केव्हा निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी एक धनकवडी-बिबवेवाडी नको

$
0
0
अवघ्या दोन दशकांमध्ये पुणे शहराची पुन्हा हद्दवाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला, तरी नव्या हद्दवाढीमुळे ३४ गावांमध्ये पुन्हा धनकवडी-बिबवेवाडी निर्माण होऊ नये, अशीच अपेक्षा केली जात आहे. तसेच, हद्दवाढीनंतर नियोजनबद्ध रितीने ठराविक मुदतीत गावांचा विकास साधला जावा, अशी मागणी केली जात आहे.

कचऱ्यापासूनच्या विजेचे ‘मोल’ निश्चित

$
0
0
हडपसर येथील ‘रोकेम’ प्रकल्पातून कचऱ्यापासून तयार होणाऱ्या विजेच्या दराचा तिढा सुटला असून, या प्रकल्पातील विजेला प्रतियुनिट ५.८६ रुपये दर राज्य वीज नियामक आयोगाने निश्चित केला आहे.

सरींची नीचांकी सरासरी

$
0
0
यंदाच्या मान्सूनचा पहिला महिना देशासाठी जवळ जवळ कोरडा गेला आहे. देशात सरासरीच्या ४३ टक्के, तर राज्यात ६७ टक्के आणि पुण्यात ८९ टक्के पाऊस कमी झाला आहे.

जिद्दी गणेशच्या पंखात द्या बळ

$
0
0
‘आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं? मला खूप शिकायचं आहे. अकरावी प्रवेशासाठी पैसे जमविण्यासाठी मी सध्या भल्या पहाटे उठून पेपर टाकतो आहे. यापुढे कितीही संकटं आली, तरी मी हार मानणार नाही. दहावीत मला ९१.८० टक्के गुण मिळाले असले, तरी पैशाचं सोंग कसे आणणार..?’

तत्त्वज्ञानाचे लोकदर्शन

$
0
0
संत हे केवळ तत्त्वचिंतक नव्हते, तर ते समाज शिक्षक होते. ते लोक जागले होते. भक्ती, ज्ञान वेदांतविचार, जनलोकांचे अनुभ‌वविश्व, सामाजिक, जागृती, उद्बोधन, प्रबोधन, साहित्य-तत्त्व, विचार, भाषा, भावोत्कटता या गुणवैशिष्ट्यांमुळे संतवाणी ही लोकधनाच्या पदवीला जाऊन बसली आहे.

विविध समाज संघटनांमुळे मिळते शहराला वेगळी ओळख

$
0
0
लेवा पाटीदार सारख्या असंख्य समाज संघटनांमुळेच पिंपरी-चिंचवडची वेगळी ओळख निर्माण झाली आहे, असे मत महापौर मोहिनी लांडे यांनी व्यक्त केले.

रोड रोलरच्या अपघातात दुचाकीस्वार जखमी

$
0
0
कात्रज येथील संतोषनगर येथे रोड रोलरवरील चालकाचा ताबा सुटल्याने रोड रोलरने दोघा दुचाकीस्वारांना उडवून जखमी केले तर चार टपऱ्यांमध्ये घुसून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाहनचोर गजाआड

$
0
0
मुंबई येथून चोरलेली तवेरा कार चोरटे पुण्यात घेऊन येत असताना स्वारगेट पोलिसांनी दाखवलेल्या चाणाक्षपणामुळे जेधे चौकात रविवारी सकाळी अकराच्या सुमारास पकडली. कारला असलेल्या ‘जीपीएस’मुळे पोलिसांना लोकेशन मिळत होते.

‘मुलांसाठी घरात मनमोकळा संवाद हवा’

$
0
0
मुलांनी विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर विचारल्यानंतर त्यांना झिडकारू नये. तसे केल्यास ते अन्य मार्गाने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना चुकीची माहिती मिळते.

विशेष शिक्षकांच्या वेतनाबाबत येत्या गुरुवारी बैठक

$
0
0
गेल्या दोन वर्षांपासून अपंग समावेशीत शिक्षण योजनेअंतर्गत (माध्यमिक स्तर) कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या रखडलेल्या वेतनासंबंधी शिक्षण संचलनालयाकडून राज्य सरकारला यापूर्वीच प्रस्ताव पाठविण्यात आला असून तीन जुलैला दिल्ली येथे त्याबाबत बैठक होणार असल्याचे शिक्षण संचालक (प्राथमिक) महावीर माने यांनी सांगितल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अपंग समावेशित शिक्षण विशेष शिक्षक संघाने दिली.

संग्राम प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

$
0
0
मुळशी तालुक्यातील संग्राम प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण येत्या बुधवारी (दोन जुलै) बारामती येथील सांस्कृतिक भवनात करण्यात येणार आहे.

निवासीकरण भूखंडाबाबत पिंपरी आयुक्तांसमोर सुनावणी

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात चऱ्होली येथील सुमारे २५ एकर क्षेत्रावरील ‘ना विकास विभागा’तील भूखंडाच्या निवासीकरणाला विरोध करणाऱ्या हरकतींवर सोमवारी (३० जून) सुनावणी होणार आहे.

स्वयंसेवक झाले सिद्ध

$
0
0
राज्यात उद्‌भवणाऱ्या कोणत्याही आपत्तीवर मात करण्यासाठी राज्यातील विविध संघटनांनी एकत्रित येऊन आपत्ती व्यवस्थापन महासंघ स्थापन केला असून, त्याचे औपचारिक उद्‍‍घाटन रविवारी (२९ जून) भोसरीत झाले.

मतदारराजा आता तरी जागा हो…

$
0
0
मतदारांची नावे गायब होण्यासंदर्भातील प्रकार लोकशाहीचा पायाच खिळखिळा करणारे होते. कायद्याची पदवीधर म्हणून, आपण आज जे घडले ते पुन्हा घडू नये यासाठी काय करू शकतो आणि त्यावर आम्ही उभयता पतीपत्नीने मतदार यादीतून नाव वगळलेल्यांसाठी एक हेल्पलार्इन सुरू केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images