Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

केमिस्टचा संप सुरूच

$
0
0
‘अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) तीनशे औषध विक्रेत्यांवर केलेली कारवाई तातडीने मागे न घेतल्यास संप सुरूच ठेवू,’ अशी भूमिका ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट’ने (सीएपीडी) घेतली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतही या संपाचे लोण पसरणार आहे.

ट्रेकिंग संस्थांवर सरकारी चाप

$
0
0
पैसे कमावण्यासाठी सरसकट ट्रेक आयोजित करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना चाप लावणारा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने अशा संस्थांसाठी विशेष अध्यादेशाद्वारे नियमावली जाहीर केली आहे.

‘दर्शन’ अद‍्भूत प्रतिभेचे...!

$
0
0
कन्नड नाट्यपदे, लोकसंगीतातून दिलेला अलौकिक स्वरप्रत्यय.. वयाची साठी उलटल्यानंतरही तरुणाईच्याच उत्साहात रंगमंचावर वावरत साकाललेली रंगभाषा... ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा आणि अभिनेत्री ज्योती सुभाष यांच्यासह साधलेला दिलखुलास संवाद.. कन्नड रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी आणि गायिका यांच्या अद‍्भूत प्रतिभेचा प्रत्यय पुणेकरांनी गुरुवारी घेतला.

औषधांसाठी वणवण

$
0
0
औषध विक्रेत्यांनी अचानकपणे पुकारलेला संप दुसऱ्या दिवशीही कायम होता. मोठ्या हॉस्पिटलमधील केमिस्ट वगळता बाकी सर्वत्र मेडिकलची दुकाने बंदच होती. परिणामी, गरजूंना औषधांसाठी वणवण करावी लागली.

मान्सून बरसणार जुलै,ऑगस्टमध्ये

$
0
0
जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतरच पाऊसमान सुधारण्याची शक्यता आहे, अशी माहिती डॉ. मेधा खोले, हवामान विभागाच्या उपमहासंचालिका यांनी दिली.

बांधकाम व्यावसायिकाचे लोणावळ्याजवळ अपहरण

$
0
0
लोणावळ्याजवळील कुसगाब बुद्रुक येथील बांधकाम व्यावसायिक आणि पवनानगर येथील एका ठेकेदाराचे गुन्हेगारांच्या टोळीने चाकूचा धाक दाखवून अपहरण केले. पवनाधरणा लगतच्या अजिवली गावात सुरू असलेल्या बांधकाम साइटवरून या दोघांचे शुक्रवारी दुपारी अपहरण करण्यात आले.

जमिनीच्या दस्तावेजांचे स्कॅनिंग एक ऑगस्टपासून

$
0
0
राज्यात येत्या एक ऑगस्टपासून ई-फेरफार आणि जमिनीच्या दस्तावेजांच्या स्कॅनिंगचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी दिली.

नागरी सल्लागार समितीचे सदस्य अंधारात का?

$
0
0
केंद्र सरकारच्या जवाहरलल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत (जेएनएनयूआरएम) नागरी स्वयंसेवी सल्लागार समितीची स्थापना करूनही त्यांच्या बैठका का घेण्यात आल्या नाहीत, अशी विचारणा आता स्वयंसेवी संस्था आणि समितीवर कागदोपत्री दाखविण्यात आलेल्या तज्ज्ञांकडून केली जात आहे.

पेट्रोल पंपावर महिलेची फसवणूक

$
0
0
पेट्रोल पंपावर कारमध्ये ​डिझेल भरण्यासाठी गेलेल्या महिलेचे लक्ष विचलित करून जादा डिझेल भरल्याचे पैसे मागणाऱ्या पेट्रोल पंपावरील तीन कर्मचाऱ्यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने धैर्य दाखवून तक्रार केल्याने पंपावर गैरप्रकार करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना गजाआड करणे शक्य झाले.

क्युरॉसिटी हॉटेलवर पोलिसांची कारवाई

$
0
0
फर्ग्युसन रोडवरील क्युरॉसिटी या हॉटेलवर डेक्कन पोलिसांनी शनिवारी छापा टाकून हॉटेलमध्ये सुरू असलेली पार्टी उधळली. नागरिकांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून दारू आणि स्पिकर जप्त केले.

केमिस्टच्या मागण्या ‘FDA’कडून मान्य

$
0
0
औषध दुकानांना टाळे ठोकण्यापूर्वी फार्मासिस्ट मालक असल्याची खात्री करूनच दुकानांवर कारवाई करण्यात यावी, अशी महत्त्वाची मागणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मान्य केली.

एका महिलेला अटक

$
0
0
महापालिकेतील बनावट नर्सभरती प्रकरणात ५८ महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी शनिवारी एका महिलेला अटक केली. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार फरार असून, त्यात पालिकेतील काही व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

टॅक्स भरल्याशिवाय टॉवर नाही!

$
0
0
‘महापालिकेचा दहा कोटी रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स भरल्याशिवाय रिलायन्स कंपनीला पालिकेच्या मिळकतीमध्ये ‘फोर ज‌ी’ टॉवर उभारण्याची परवानगी दिली जाणार नाही,’ असे स्थायी समितीचे अध्यक्ष बापूसाहेब कर्णे गुरुजी यांनी सांगितले.

इंजिनीअरिंग प्रवेश तीनच फेऱ्यात

$
0
0
‘राज्यातील इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे प्रवेश लांबू नयेत, यासाठी इंजिनीरिंगच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) चारऐवजी तीनच फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया वेळेत पूर्ण होऊन कॉलेजेस एक ऑगस्टपासून सुरू होणार आहेत.

‘कायम विनाअनुदानित’ बंद व्हावे

$
0
0
राज्यातील उच्चशैक्षणिक गुणवत्तेचा विकास होण्यासाठी कॉलेजांना मान्यता देण्यासाठीचे कायम विनाअनुदानित धोरण पूर्णपणे बंद होण्याची गरज खुद्द राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनाही आता जाणवली आहे.

‘स्वाभिमानी’ला हव्यात ६५ जागा

$
0
0
विधानसभेच्या आगामी निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी पक्षाने महायुतीकडे तब्बल ६५ जागांची मागणी केली आहे. शिवसेना-भाजपने यापूर्वी कधीही न जिंकलेल्या जागा आम्ही लढवू, असे पक्षाचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी सांगितले.

‘कट-ऑफ’ वाढले

$
0
0
शहरातील कॉलेजांमधील अकरावीच्या प्रवेशासाठी शनिवारी जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीत ४८ हजार ९३७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. ऑनलाइन प्रक्रियेत सहभागी झालेल्या एकूण ६० हजार ८२५ विद्यार्थ्यांमधून हे प्रवेश झाले आहेत.

आठवडी बाजारात पुणेकरांची गर्दी

$
0
0
पुणेकरांना रास्त दरामध्ये भाजीपाला मिळावा, म्हणून राज्याचा कृषी विभाग आणि पणन महामंडळातर्फे प्रथमच कोथरूड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आठवडे बाजारा’ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

विधानसभा निवडणुका स्वबळावरच लढवाव्या

$
0
0
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससह आघाडी करून लढल्यानंतर अपयश पदरी पडल्याने आता आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवाव्यात, असा साक्षात्कार प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांना झाला आहे.

चित्रकार विलास कुलकर्णी यांना फ्रान्समधून निमंत्रण

$
0
0
मराठी मातीतील चित्रकलेचा जागतिक स्तरावर गौरव झाला आहे. पुणेकर चित्रकार विलास कुलकर्णी यांना फ्रान्समधील ‘रॉचमेअर बिनाले’ या प्रतिष्ठेच्या महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images