Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘लँड रेकॉर्ड्‍स’ प्रकल्प राबविणार

$
0
0
राज्यातील १९३० पासूनच्या सुमारे २६ कोटी भूमी अभिलेखांचे (लँड रेकॉर्ड्‍स) स्कॅनिंग करण्यासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून पुढील महिन्यात त्याचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले आहे.

सीएनजी किटसाठी अनुदान

$
0
0
शहरातील प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी यंदाही तीन चाकी रिक्षांना सीएनजी किटसाठी अनुदान दिले जाणार असून, त्याचा लाभ सुमारे दोन हजारांहून अधिक रिक्षांना होणार आहे. रिक्षांना सीएनजी कीट बसविण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा काही भाग पालिकेतर्फे उचलण्यात येत असून, यंदा त्यासाठी दोन कोटी ६० लाख रुपयांची तरतूद केली गेली होती.

रोखले विशेष शिक्षकांचे वेतन

$
0
0
अपंग समावेशीत शिक्षण योजनेअंतर्गत (माध्यमिक स्तर) कार्यरत असलेल्या शिक्षकांचे वेतन गेल्या दोन वर्षांपासून रोखले असून अपंग विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी देण्यात येणारे सेवा सुविधा अनुदानाचे पाच वर्षांपासून वाटप करण्यात आलेले नाही.

विद्यापीठाच्या आवारात बेकायदा वृक्षतोड

$
0
0
वृक्षसंवर्धन अधिनियमानुसार, झाडाची फांदी छाटायची असो किंवा वृक्षतोड यासाठी उद्यान विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असताना पुणे विद्यापीठाच्या आवारात बेकायदेशीररीत्या मोठ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे.

‘मुंबई कृषी’चे संचालक बरखास्त

$
0
0
सुमारे १३८ कोटी रुपयांच्या एफएसआय घोटाळ्याप्रकरणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ गुरुवारी बरखास्त करण्यात आले. दरम्यान, सर्व २३ संचालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

कर थकवणाऱ्या कंपनीला पायघड्या

$
0
0
महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स थकवून पालिकेला कोर्टात खेचणाऱ्या रिलायन्स लिमिटेड या कंपनीला महापालिकेनेच पायघड्या घातल्या आहेत. रिलायन्स जिओ इन्फोकॉम या मोबाइल कंपनीला महापालिकेच्या मालकीच्या जागेत फोर जी सेवेचा टॉवर उभाण्यासाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नुकतीच मंजुरी दिली आहे.

मराठी रंगभूमी जगात सर्वश्रेष्ठ

$
0
0
‘नाटकाने रसिकांचे प्रेम मिळवून देतानाच आयुष्य समृद्ध केले, म्हणूनच मराठी रंगभूमी ही जगातील सर्वश्रेष्ठ रंगभूमी आहे,’ अशा शब्दांत जेष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांनी रंगभूमीशी असणारे बंध उलगडले.

पावणेसहाशे बस बंद

$
0
0
‘पीएमपी’च्या तिजोरीत पुरेसा निधी नसल्यामुळे ताफ्यात असणाऱ्या पावणेसहाशे गाड्या बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. ‘पीएमपी’च्या बंद बसमुळे पुणेकरांना त्रास सहन करावा लागत आहे.

‘रायसोनी’ची शाखा निगडीत सुरू

$
0
0
कोट्यवधी रुपयांच्या बेनामी व्यवहारांमुळे चौकशीच्या कचाट्यात सापडलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेने अचानक बंद केलेल्या शाखा पुन्हा उघडण्यास सुरुवात केली आहे.

घरभाडेकरार पुरावा म्हणून चालणार

$
0
0
पासपोर्टसाठी आता घरभाड्याचा करार पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचा निर्णय पासपोर्ट विभागाने घेतला आहे. त्यामुळेच, नोकरी अथवा शिक्षणानिमित्त शहरात आलेल्या स्थलांतरित नागरिकांना पासपोर्ट काढताना भेडसावणाऱ्या समस्यांपासून सुटका होणार आहे.

डीएनए चाचणी पुण्यात करता येणार

$
0
0
बॉम्बस्फोट, खून, बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांबरोबरच मातृत्व, पितृत्वाची खात्री पटवण्यासाठी करण्यात येणारी डीएनए चाचणी पुण्यात सुरू होत आहे. औंध रोडवरील प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळेत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून ही चाचणी सुरू होणार.

नव्या गावांच्या सॅटेलाइट इमेज

$
0
0
महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट होणाऱ्या ३४ गावांचे उपग्रह नकाशे (सॅटेलाइट इमेज) तयार करण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. हद्दीत समाविष्ट होणाऱ्या नवीन गावांमधील बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.

पिण्याचे पाणी वाया घालवाल तर…!

$
0
0
पिण्याच्या पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. वॉशिंग सेंटर, बांधकाम, तसेच इतर कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करताना आढळल्यास संबंधित व्यावसायिकावर कारवाई करण्याच्या सूचना महापौर चंचला कोद्रे यांनी पालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

मान्सून बरसणार जुलै, ऑगस्टमध्ये

$
0
0
राज्यात मान्सूनच्या आगमनाला झालेल्या उशिरानंतरही पावसाने दडीच मारल्याने राज्यात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. राज्यात आतापर्यंत जून महिन्याच्या सरासरीपेक्षा तब्बल ६० टक्क्यांहूनही कमी पावसाची नोंद झाली आहे.

बोअरवेलची क्षमता वाढली

$
0
0
सौर ऊर्जेचा परिणामकारक वापर करण्यासाठी सुरुवातीला घराच्या गच्चीवर सोलर वॉटर हीटर बसवले…त्याचा चांगला उपयोग झाल्यानंतर हळूहळू घरातला आणि बागेतला कचराही त्यांनी बागेत जिरवण्यास सुरुवात केली.

यूपीएससीच्या परीक्षा पुण्यातही

$
0
0
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षांसाठी पुण्यासह ठाणे आणि नवी मुंबई येथे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीचे एक केंद्र म्हणून उदयाला आलेल्या पुण्यात यूपीएससीचे केंद्र होत असल्याने पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांची सोय होणार आहे.

औषधाविना रुग्णांची गैरसोय

$
0
0
अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईच्या विरोधात विक्रेत्यांनी गुरुवारी दुपारनंतर अचानक औषध दुकाने बंद केली. यामुळे मधुमेहापासून हृदयविकाराच्या रुग्णांपर्यंत अनेकांची पंचाईत झाली. आपल्या औषधांसाठी ते केमिस्टचा शोध घेत होते.

उद्यापासून एकदाच पाणी

$
0
0
पाऊस नसल्याने आणि धरणांतील पाणीसाठा आटल्याने पुण्याला शनिवारपासून (२८ जून) दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आहे. जलसंपदा खात्याकडून पुण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पाण्यात सर्वसाधारण १२ टक्के कपात करण्यात येणार आहे.

आजपासून एक वेळ पाणी

$
0
0
पावसाने ओढ दिल्याने धरणसाठ्यात कमालीची घट झाली असताना खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून पुण्यात पाणीकपात करण्यात येत आहे. १०-२० टक्के कपातीपेक्षा एकवेळच पुरवठा करून पाणीबचत केली जाणार आहे. त्यामुळे, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठा ३१ जुलैपर्यंत पुरविणे शक्य होईल.

दूध खरेदीचा दर एक रुपयाने घटला

$
0
0
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरचे दर उतरल्यामुळे खासगी दूध व्यावसायिकांनी दूध खरेदीचा दर एक रुपयाने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images