Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हायवे लूट : कातकरी टोळी जेरबंद

$
0
0
एक्स्प्रेस-वे आणि पुणे-मुंबई जुन्या हायवेवर लुटमारीचे दोन गुन्हे करणाऱ्या कातकरी टोळीतील आठ गुन्हेगारांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून चोरीतील काही रक्कम जप्त करण्यात आली असली तरी टोळीचा मुख्य सूत्रधार फरार असून, पोलिस त्याचा माग काढत आहेत.

औषध विक्रेत्यांचा बेमुदत बंद

$
0
0
सामान्य औषध विक्रेत्यांच्याविरोधात होत असलेल्या अनावश्यक कारवाईचा सकाळी मोर्चा काढून निषेध नोंदविण्याऱ्या केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टच्या (सीएपीडी) पदाधिकाऱ्यांच्या दुकानांवरच अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दुपारी कारवाई केली.

फॅमिली कोर्टाचे स्थलांतर अद्याप नाहीच

$
0
0
फॅमिली कोर्टासाठी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाजवळ नवीन इमारतीची उभारणी करण्यात येत असून फॅमिली कोर्टाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या मुहूर्तावर नवीन इमारतीत स्थलांतर व्हावे अशी मागणी वकिलांकडून करण्यात येते आहे.

पिंपरीतही पाणीकपातीचा इशारा

$
0
0
पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्येही पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा निर्णय आज, शुक्रवारी (२७ जून) घेण्यात येईल, असे महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी सांगितले.

आपत्कालीन कृषी आराखडा तयार

$
0
0
पावसाने ओढ दिल्याने राज्याच्या विविध भागांमधील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अशा काळात कृषी विभागाने पुणे जिल्ह्यासाठी आपत्कालीन कृषी आराखडा तयार केला असून, पाऊस वेळेवर न झाल्यास पर्यायी पिके घेण्याचा सल्ला कृषी विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर पालखी सोहळा वाल्हे मुक्कामी

$
0
0
श्री क्षेत्र पंढरपूरच्या ओढीने व्याकूळ झालेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णव गुरुवारी दुपारी दीड वाजता वाल्मिकींच्या वाल्हे मुक्कामी पालखी तळावर विराजमान झाला. दरम्यान, सोन्याच्या जेजुरीतील मुक्काम सकाळी साडेसहा वाजता आटोपत पालखी सोहळा दौंडज खिंडीत न्याहारीसाठी साडेआठ वाजता विसावला.

एलबीटी कार्यालय शनिवार-रविवारी सुरू

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरणाऱ्या सर्व व्यावसायिकांना २०१३-१४ चे वार्षिक विवरणपत्र (रिटर्न) दाखल करण्यासाठी वेळ मिळावा, याकरिता शनिवार-रविवारच्या (२८ व २९ जून) सुट्टीच्या दिवशी एलबीटी कार्यालय सुरू राहणार आहे.

तक्रारींचे निवारण क्षेत्रीय स्तरावर करा

$
0
0
छोट्या छोट्या तक्रारींसाठी नागरिकांना पालिकेच्या मुख्य इमारतीचे उंबरे झिजवावे लागू नयेत यासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना केली. मात्र नागरिकांच्या तक्रारींचे निवारण या कार्यालयाकडून होत नसल्याने लोकशाहीदिनी पालिका आयुक्तांकडे येणाऱ्या तक्रारी वाढल्या आहेत.

‘पाहुणचार’ झोडणाऱ्याऱ्यांची चौकशी करा

$
0
0
महापालिका प्रशासनाने ‘लाइट मेट्रो रेल्वे’ प्रकल्पाचा नकारात्मक अभिप्राय दिलेला असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी शहरात हा प्रकल्प राबविण्यास मंजुरी दिली आहे.

स्थगिती उठविण्याचे संकेत

$
0
0
राज्यातील नगराध्यक्षांच्या निवडीला देण्यात आलेली स्थगिती उठविण्याचे संकेत राज्य सरकारच्या वतीने गुरुवारी हायकोर्टात देण्यात आले.

पासच्या दरात ३५ रुपयांची वाढ

$
0
0
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने उपनगरीय रेल्वे भाडे कमी केल्यानंतर त्यांच्या पासच्या दरामध्ये बदल झाला आहे. नव्या दरानुसार पुणे ते लोणावळा प्रवासाच्या सेकंड क्लासच्या पाससाठी २७० रुपये तर फर्स्ट क्लासच्या पाससाठी १०४५ रुपये मोजावे लागणार आहेत.

‘एक्स्प्रेस वे’वर ओव्हरलोड

$
0
0
एक्स्प्रेस वरुन ये-जा करणाऱ्या ओव्हरलोड जड वाहनांमुळे या रस्त्यावरील वाहतूक समस्येमध्ये भर पडत असल्याचे समोर आले आहे. ओव्हरलोड असणाऱ्या वाहनांवर सातत्याने कारवाई करण्याची मागणी रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येत असली तरी अपुऱ्या मनुष्यबळाअभावी आरटीओकडून या कामामध्ये सातत्य राहात नसल्याने या रस्त्यावरील वाहतूक समस्येत भर पडत आहे.

लढा द्या; मात्र ‘एलबीटी’ भरा

$
0
0
स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात व्यापारी महासंघाचा लढा सुरू असला तरी हा कायदा अस्तित्वात असल्यामुळे व्यापाऱ्यांनी हा कर आणि वार्षिक विवरण पत्र ३० जूनपर्यंत भरावे, असे आवाहन दि फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन्स ऑफ पुणेचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी केले आहे.

मराठा आरक्षणावर संमिश्र प्रतिक्रिया

$
0
0
गेली अनेक वर्षे मराठा आरक्षणाबाबत जोरदार मागणी करण्यात येत होती. मात्र त्यावर निर्णय घेतला जात नव्हता. बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मंजूर करण्यात आले.

सिंचनाची गती संथ

$
0
0
उपसा योजनांच्या सिंचन निर्मितीची गती अत्यंत संथ असून, प्रत्यक्ष सिंचनाचा लाभही कमी प्रमाणात मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही योजना चालविण्यासाठी खर्चाची तोंडमिळवणी समाधानकारक नाही.

‘शब्दमोहिनी’च्या काव्याला दाद

$
0
0
‘माहेर’ कवितेतून उलगडलेले स्त्रीमन, ‘पदभरून’ कवितेतून उलगडलेला पावसाचा ओलावा, ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या काव्याची मोहिनी आणि रसिकांची दाद अशा वातावरणात ‘रंगबावरी’ ही कवितांची मैफल मंगळवारी रंगली.

‘वपुं’चे साहित्य इंग्रजीत

$
0
0
‘कुठलेही हिशेब न ठेवता गणिताप्रमाणे नेमकेपणा देते ती मैत्री,’ असे जगण्याविषयीचे तत्त्वज्ञान रंजक पद्धतीने सांगणारे साहित्यिक व. पु. काळे यांचे निवडक साहित्य आता इंग्रजी वाचकांपर्यंत पोहोचणार आहे.

इथे नाटके हाउसफुल्ल…

$
0
0
सातारा रोडवरील नुकत्याच सुरू झालेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकावर प्रेक्षक खूश आहेत. या नाट्यगृहामुळे या परिसरातील नागरिकांची सांस्कृतिक भूक भागत आहे. गेल्या महिन्याभरात झालेल्या नाटकांना नाट्यप्रेमींनी उत्तम प्रतिसाद दिला असून, अलीकडच्या काळात दुर्मिळ झालेला ‘हाउसफुल्ल’चा बोर्डही या नाट्यगृहात लावावा लागतो आहे.

बांधकाम व्यावसायिक, भंगार विक्रेत्यांना नोटिसा

$
0
0
पाणी साठवून डेंगीच्या डासांची पैदास करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या शहरातील बांधकाम व्यावसायिक, सोसायट्या, भंगार, टायर विक्रेत्यांसह २५० जणांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटिसा पाठवून कारवाई करण्यात आली आहे.

औषध विक्रेत्यांचा बेमुदत बंद

$
0
0
सामान्य औषध विक्रेत्यांच्याविरोधात होत असलेल्या अनावश्यक कारवाईचा सकाळी मोर्चा काढून निषेध नोंदविण्याऱ्या केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टच्या (सीएपीडी) पदाधिकाऱ्यांच्या दुकानांवरच अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दुपारी कारवाई केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images