Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एक कोटींचे सीसीटीव्ही धूळ खात

0
0
चार वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेसाठी घेण्यात आलेले एक कोटी रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे बालेवाडी येथील स्टेडियममध्ये धूळ खात पडून आहेत.

संशयावरून पत्नी व मुलींची हत्या

0
0
पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन पतीने, संतापाच्या भरात पत्नीसह आपल्या दोन लहानग्यांची कुऱ्हाडीचे घाव घालून निघृण हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाही

0
0
पुण्यामध्ये घडलेले स्फोट हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश नसल्याचे प्रमाणपत्र केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिले आहे. पंढरपूर येथे विठ्ठलदर्शनासाठी आलेल्या शिंदेंनी पत्रकारांशी बोलताना, या प्रकरणाचा तपास देश तसेच विदेशाच सुरू असल्याने यावर अधिक कोणतेही भाष्य करता येणार नसल्याचे सांगितले.

दरोड्याच्या तयारीतील ५ जणांना कोंढव्यात अटक

0
0
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना शुक्रवारी रात्री कोंढवा पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून तीन दुचाकी गाड्या, एक परदेशी बनावटीची पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे असा सुमारे ९१ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. कोंढव्यातील मिठानगरमध्ये शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता पोलिसांनी ही कारवाई केली.

बाँबस्फोटांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांचे ‘नो कॉमेंट’

0
0
‘पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर झालेले साखळी बाँबस्फोट कोणी घडविले आणि का केले, याबाबतचा तपास जोमाने सुरू आहे,’ असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांकडून विचारण्यात आलेल्या सर्वच प्रश्नांना बगल देत ‘नो कॉमेंट’ एवढेच पालुपद लावून बाँबस्फोटाबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.

येरवडा-कल्याणीनगरातील अनधिकृत बांधकामे पाडली

0
0
महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम सुरूच असून, शनिवारी येरवडा-कल्याणीनगरमधील हॉटेल आणि दुकानांवर कारवाई करण्यात आली. या परिसरातील अनेक हॉटेल आणि दुकानदारांनी फ्रंट मार्जिनमध्ये बांधकामे केली आहेत. कारवाईत तीन हॉटेल आणि तीन दुकानदारांनी बांधलेल्या पत्र्याच्या शेड पाडण्यात आल्या.

जखमी पाटीलचा ससूनमध्येच मुक्काम

0
0
जंगल महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोटातील जखमी दयानंद पाटील याच्यावर ससून हॉस्पिटलच्या वॉर्ड क्रमांक दोनमध्येच पोलिसांच्या खड्या पहार्यात अद्यापही उपचार सुरू आहेत. मात्र त्याला डिस्चार्ज देण्यात आले नसल्याचे हॉस्पिटलमधील सूत्रांनी सांगितले.

कर्वेनगरमध्ये सतराशे रुपयांचा गुटखा जप्त

0
0
कर्वेनगरच्या बालाजी सुपर मार्केट या किराणा दुकानात विविध कंपन्यांच्या गुटख्याची चोरून विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. अन्न व औषधी द्रव्य प्रशासनाच्या (एफडीए) अधिकार्यांनी कारवाई करून सतराशे रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे.

दहशतवादी हल्ल्याची शक्यता फेटाळता येणार नाही

0
0
शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट हे दहशतवादी हल्ले होते, अशी शक्यता फेटाळता येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी स्पष्ट केले. या घटनेची केंद्र सरकारने अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांमार्फत समन्वयाने तपास सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मोटरसायकलस्वाराचा दांडेकर पुलावर मृत्यू

0
0
ट्रकच्या चाकाखाली अडकून मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दांडेकर पूल येथील मांगीरबाबा चौकात घडली. या प्रकरणी ट्रकचालकाला दत्तावाडी पोलिसांनी ताब्या घेतले आहे.

माजी नगरसेवकाला मारण्यासाठी आलेल्याला अटक

0
0
काँग्रेसचे माजी नगरसेवक अनिल जाधव यांना ठार मारण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी सापळा रचून अटक केली असून, त्याच्याकडून पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. खडक पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली.

‘एएफएमसी’वरील टपाल तिकिटाचे प्रकाशन

0
0
लष्कराच्या आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये (एएफएमसी) पदवी शाखेच्या सुवर्णमहोत्सवी सांगतेनिमित्त कॉलेजतर्फे शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल एन. ए. के. ब्राऊन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये कॉलेजविषयीच्या एका खास टपाल तिकीटाचेही प्रकाशन करण्यात आले.

पक्षाला एकाहून अधिक अजेंड्यांची गरज

0
0
‘राजकीय पक्ष काढण्याचा देशात कुणालाही अधिकार आहे. मात्र, केवळ भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन पक्ष चालविणे कठीण असून, ‘टीम अण्णा’ला दहशतवाद, माओवाद, काश्मीर प्रश्न, देशाची अर्थव्यवस्था या पर्यांयावरही विचार करावाच लागेल,’ असे मत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी शनिवारी व्यक्त केले. तसेच, ‘टीम अण्णा’ला लोकशाहीतील संसदेचे महत्त्व कळले हे चांगले झाले, अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली.

डॉ. नीलम गो-हे यांनी विचारले ४७ प्रश्न

0
0
पुण्यातील भांडारकर प्राच्य विद्या संस्थेतील आर्थिक नियमिततेची चौकशी, नोंदणीविना सुरू असलेली हॉस्पिटल, राज्यातील नद्यांची स्वच्छता, रस्त्यांच्या दुर्दशेमुळे झालेले अपघात, पर्यावरणाचे परिणाम यासारख्या विविध ४७ प्रश्न आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केले होते.

सहा प्रभाग समित्या बिनविरोध

0
0
पुणे महापालिकेच्या सहा प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून, या सहापैकी चार अध्यक्षपदे मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली आहे. काँग्रेस आणि भाजपच्या वाट्यास प्रत्येकी एका समितीचे अध्यक्षपद आले आहे. दरम्यान, या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि मनसे यांचा पॅटर्न तयार होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

रस्त्यावर कचरा फेकताय? मग दंड भरा...

0
0
सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कचरा फेकणारे तसेच, कचर्याचे वर्गीकरण न करणार्यांना या पूर्वी कोणत्याही प्रकारच्या दंडाची तरतूद नव्हती. आता यापुढे रस्त्यावर कचरा फेकून घाण करणार्यांना मात्र, चांगलाच दंड सहन करावा लागणार आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाने या बाबत प्रस्ताव तयार केला आहे.

पुरावे देण्यात पोलिस अपयशी

0
0
‘आरोपीला धडा शिकविण्याइतपत पुरावे पोलिस यंत्रणेच्या हाती लागत नाहीत. सबळ पुरावे कोर्टासमोर येत नसल्याने आरोपी सुटतात. मग निकालानंतर न्यायव्यवस्थेच्या नावाने का बोटे मोडली जातात,’ असा प्रश्न उपस्थित करीत सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार यांनी शनिवारी पोलिस यंत्रणेलाच आरोपीच्या पिंजर्यात उभे केले.

शिक्षण मंडळावर प्रभारी प्रशासन अधिकारी

0
0
शिक्षण मंडळाच्या प्रभारी प्रशासन अधिकारीपदी शनिवारी माध्यमिक विभागाचे शिक्षणअधिकारी विष्णू जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. नियमबाह्य पद्धतीने शैक्षणिक साहित्य खरेदी केल्याच्या प्रकरणावरुन अडचणीत आलेले शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बाळासाहेब ओव्हाळ यांची अखेर शुक्रवारी बदली करण्यात आली.

कात्रज: विहिरीत मुलगा बुडाला

0
0
कात्रजमधील शेलारमळा भागात विहिरीत पोहण्यासाठी उतरलेला एक मुलगा बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी घडली. बिरामणे यांच्या विहिरीमध्ये तीन मुले पोहण्यासाठी उतरली होती. त्यापैकी किरण परमेश्वर सागरे (१३, रा. महादेवनगर, शेलारमळा) हा मुलगा पोहता येत नसल्यामुळे बुडाला.

महिन्याच्या चिमुरडीचे अपहरण

0
0
उपचारासाठी आणलेल्या २९ दिवसांच्या चिमुरडीला तिच्या आईच्या कुशीतून पळवून नेल्याची घटना रास्ता पेठेतील केईएम हॉस्पिटलसमोर घडली. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. समर्थ पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या घटनेचा छडा लावण्यासाठी पथके रवाना होऊनही रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या काहीही लागले नव्हते. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images