Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पालखी सोहळ्यात सोनसाखळी हिसकावली

0
0
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वृत्तांकन करणाऱ्या वृत्त वाहिनीची ओबीव्हॅन पाठीमागे घेणाऱ्या तरुणाच्या गळ्यातील सुमारे तीन तोळ्याची साखळी हिसकावल्याचा प्रकार दिघी मॅगझिन चौकात शनिवारी सकाळी घडला. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

‘समाज परिवर्तनासाठी आषाढी वारी उपयुक्त’

0
0
शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनासाठीच्या विविध उपक्रमांसाठी आषाढी वारी हे एक चांगले व्यासपीठ आहे. त्यामुळेच या उपक्रमाकडे केवळ वारीच्या दृष्टिकोनातून न पाहता सामाजिक जबाबदारी अनुभविण्याचे आवाहन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी केले.

संत सोपान महाराजांच्या पालखीचे २४ला प्रस्थान

0
0
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाण्यासाठी संत सोपान महाराज पालखी सोहळा २४ जून, मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता समाधी मंदिरातून प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती सोपानदेव समाधी ट्रस्टचे अध्यक्ष गोपाळ गोसावी यांनी पत्रकार बैठकीत दिली. पालखी सोहळा प्रमुख श्रीकांत गोसावी हे या वेळी उपस्थित होते.

वैष्णवांचा महामेळा पंढरीच्या दिशेने

0
0
विठू नामाचा जप करत दाखल झालेला लाखो वैष्णवांचा महामेळा सोमवारी पुण्यनगरीचा निरोप घेत पंढरीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. सकाळी सहा वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि सात वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान करणार आहे.

तरुणीसह तिघांच्या अपहरणाचा प्रयत्न

0
0
पुणे स्टेशन बसस्थानकावरून चाकुच्या धाकाने तरुणीसह तिघांचे अपहरण करून रिक्षात घेवून चाललेल्या रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. अपहरण करून घेवून जात असताना स्वारगेट पोलिसांनी रिक्षा चालकाला दांडेकरपूल येथे हटकले असता हा प्रकार उघडकीस आला.

मुख्यमंत्री बदलाबाबत राष्ट्रवादीचा दबाव नाही

0
0
राज्यातील नेतृत्व बदलाबाबत होत असलेली मागणी हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्याचे नमूद करून याबाबत राष्ट्रवादीकडून काँग्रेसवर कोणताही दबाव नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी स्पष्ट केले.

पित्यानेच केला पोटच्या पोरीचा लैंगिक छळ

0
0
गेल्या एक वर्षापासून ११ वर्षांच्या पोटच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी सिंहगड रोडवरील आनंदनगर येथे राहणाऱ्या एका पित्याला अटक केली. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.

‘कन्व्हेअन्स डीड’साठी ‘कम्प्लिशन’ची गरज नाही

0
0
‘सोसायटीचे कन्व्हेअन्स डीड करणे ही काळाची गरज आहे. सहकारी सोसायट्यांना मदत करण्याची सहकार खात्याची भूमिका असून, कन्व्हेअन्स डीड करण्यासाठी आता बांधकामाच्या ‘कम्प्लिशन सर्टिफिकेट’ची गरज नाही,’ असे जिल्हा उपनिबंधक किरण सोनवणे यांनी स्पष्ट केले.

गोपीनाथ मुंडे यांची वारसदार पंकजाच

0
0
‘दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जागा केवळ त्यांच्या कन्या पंकजा मुंडे याच घेऊ शकतात,’ असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नमूद केले. तर, मुंडे यांनी भाजपला दिलेला बहुजन चेहेरा यापुढेही कायम ठेवणे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीकडून डागडुजी सुरू

0
0
लोकसभा निवडणुकीत दाणादाण उडाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता पक्षाची डागडुजी सुरू केली आहे. अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या मदतीला दोन नवीन कार्याध्यक्ष नेमण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

स्कायवॉकची आता पुण्यात आवश्यकता

0
0
‘वाढता विकास आणि प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी होणारी घाई यांमुळे वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्याला सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी महत्त्वाच्या रस्त्यांवर स्कायवॉक उभारणे गरजेचे झाले आहे,’ असे उपुमख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

‘रेल्वे दरवाढ अन्यायकारकच’

0
0
‘संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने प्रस्तावित केलेली रेल्वेची दरवाढ मोदी सरकारने मान्य करीत ती जाहीर केली. मात्र, ही रेल्वेची दरवाढ अन्यायकारक आहे,’ अशी टीका भाजप सरकारमधील सहकारी पक्ष असलेल्या रिपब्लिन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी रविवारी केली.

‘CCTV’बाबत प्रशासनाला जाग

0
0
‘पुणे-पिंपरी चिंचवड शहरातील मोक्याच्या ठिकाणी येत्या १५ ऑगस्टपर्यंत सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत,’ अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली.

प्रवेशात नियमांचे उल्लंघन?

0
0
अल्पसंख्याक दर्जाच्या ज्युनिअर कॉलेजांमधून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनाच अकरावीचे प्रवेश नाकारण्यात येत असल्याची तक्रार रविवारी पालकांकडून करण्यात आली. संबंधित कॉलेज ‘इनहाउस’ आणि ‘अल्पसंख्याक’ कोट्यांसाठीचे प्रवेशाचे नियम डावलून प्रवेश करत असल्याची तक्रार केंद्रीय प्रवेश समितीकडे करण्यात आल्याचेही पालकांकडून सांगण्यात आले.

महामार्गावरील सुरक्षाही रामभरोसे

0
0
महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षितेतसाठी महामार्ग पोलिसांकडून होत असणारी चौक्यांची संख्या वाढवून देण्याची मागणी अद्याप पूर्ण होत नसल्याचे समोर आले आहे. महामार्ग पोलिसांकडून होत असणाऱ्या या मागणीची पूर्तता होत नसल्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गणेश मंडळे बसविणार CCTV

0
0
फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुराचे उमटणारे गंभीर पडसाद आटोक्यात ठेवण्यासाठी गणेशोत्सव मंडळे सरसावली आहेत. गणेशोत्सवाच्या काळात अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या उद्देशाने प्रबोधनाचे कार्यक्रम आणि सीसीटीव्ही बसविण्यासाठी मंडळे पुढाकार घेणार असून, त्यासाठी इतर खर्च कमी करण्याचीही मंडळांची तयारी आहे.

‘CCTV’ बसविण्याचे नक्की काय झाले?

0
0
शहराला असलेला दहशतवादाचा धोका ओळखून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे (सीसीटीव्ही) बसविण्याची प्रक्रिया अद्यापही पूर्ण होऊ शकलेली नाही.

पोलिसांची जरब कोठे गेली?

0
0
हिंजवडी येथे सॉफ्टवेअर इंजिनीअरचा झालेला खून... दुचाकीस्वार आरोपींकडून सुरू असलेली लूटमार... सोनसाखळी चोरांचा उच्छाद... टोळी युद्धातून झालेली खुनाची घटना... आ​णि किरकोळ कारणावरून शहरात उसळलेली दंगल...

आता तरी सांगा स्कॉलरशिपची यत्ता कंची?

0
0
चौथी आणि सातवीऐवजी पाचवी आणि आठवी इयत्तेला स्कॉलरशिप परीक्षा घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कधीपासून होणार याविषयी स्पष्टता नसताना गाइड-पुस्तकांसह चौथी-सातवी स्कॉलरशिपच्या अभ्यासाचे साहित्य बाजारपेठेत खपविण्यात येत आहे.

फर्स्ट एसीच्या दरात विमान प्रवास

0
0
तुम्ही जर दोन महिन्यांनी रेल्वेच्या सेकंड एसीने पुण्याहून बेंगळुरूला जाण्याचे नियोजन करत असाल तर त्या भाड्याच्या रकमेत सुमारे ४०० ते ५०० रुपयांची भर घातली तर तुम्हाला हा प्रवास विमानाने करता येऊ शकतो, इतकेच नाही तर तुमच्या वेळेचीही बचत होऊ शकते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images