Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘रायसोनी’ पतसंस्थेच्या गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण

$
0
0
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या बेनामी व्यवहारांची प्राथमिक चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पूर्ण केली आहे.

‘बीआरटी’पाठोपाठ ‘सेफ्टी ऑडिट’ही वादात

$
0
0
अपघाती क्षेत्र म्हणून धडकी भरवणाऱ्या ‘बीआरटी’चे ‘रोड सेफ्टी ऑडिट’ करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेला सल्लागारच निलंबित करण्याची वेळ पुणे महापालिकेवर आली आहे.

गणवेशांना उशीर; यंदा खापर आचारसंहितेवर

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका पालिकेच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना बसणार आहे. आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया राबवण्यात झालेल्या विलंबामुळे शालेय गणवेशासाठी विद्यार्थ्यांना आणखी किमान दोन महिन्यांची तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

स्थायी समिती अध्यक्षांना कार्यपद्धतीबद्दल घरचा आहेर

$
0
0
‘प्रभागातील कामे करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीच्या वर्गीकरणाचे प्रस्ताव स्थायी समितीत एक महिना पुढे ढकलले जातात. स्थायी समितीला हा अधिकार कुणी दिला,’ असा सवाल नगरसेवकांनी सर्वसाधारण उपस्थित केला.

नातेसंबंधांवर लिहिले १२ वर्षांच्या मुलीने

$
0
0
खेळण्या-बागण्याच्या वयात एखाद्या मुलाने नातेसंबंधांवर भाष्य करणारी कादंबरी लिहिल्याचे उदाहरण विरळाच. मात्र, अमेरिकेतील सॅन होजेमध्ये राहणाऱ्या रेवा प्रभुणे या बारा वर्षीय मुलीने लिहिलेल्या ‘मिथिक्रम मिथिक्रोल्स द मर्निंग फॅमिली’ या कादंबरीचा समावेश ‘मोअर टेल्स फ्रॉम द हाउस ऑफ ऑसम’ या संग्रहात समाविष्ट असून, हा संग्रह ‘अॅमेझॉन डॉट कॉम’वर उपलब्ध आहे.

व्हॅटमधून मिळालेली रक्कम पुण्याच्या विकासासाठी द्यावी

$
0
0
‘व्हॅटमधून पुणे विभागाला मिळालेले उत्पन्न १० हजार कोटी रुपयांच्या घरात गेले आहे. त्यापैकी २० टक्के रक्कम राज्य सरकारने पुण्याच्या विकासासाठी द्यावी,’ अशी मागणी पुणे गूळ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजित सेटिया यांनी केली आहे.

वेगळे टर्मिनस हवेच

$
0
0
पुण्याहून लोणावळ्याला जाणाऱ्या लोकलच्या प्रवाशांसाठी वेगळे टर्मिनस उभारण्याच्या योजनेवर पाणी पडले असले तरीही वाढणाऱ्या प्रवासी संख्येचा विचार करून लोकलसाठी वेगळे टर्मिनस उभारण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे.

आम्ही नक्षलवादी नाहीत

$
0
0
‘कबीर कला मंचचे कार्यकर्ते नक्षलवादी नाहीत. आम्हाला लोकशाही मान्य आहे. शासन व्यवस्थेवर आमचा अजूनही विश्वास आहे. मात्र, आम्ही कलेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला जर कोणी नक्षलवाद म्हणत असेल, तर आहोत आम्ही नक्षलवादी,’ अशा भावना मंचाचे कार्यकर्ते दीपक ढेंगळे आणि ज्योती जगताप यांनी बुधवारी व्यक्त केली.

रक्ताची दरवाढ कायमच

$
0
0
राज्यातील रक्तपेढ्यांना रक्ताचे दर राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने (एनबीटीसी) निश्चित केलेल्या दरानुसारच आकारावे लागणार असल्याचे आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे रक्ताच्या मूळ पिशवीला १४५० रुपये, तर ‘प्रोसेसिंग’ केल्यानंतर २२३० रुपये मोजावे लागणार आहेत. रक्ताच्या या दरवाढीवर राज्य सरकारने अखेर शिक्कामोर्तब केले आहे.

नव्या गावांत जादा एलबीटी

$
0
0
महापालिका हद्दीत नव्याने ३४ गावांचा समावेश करण्याच्या प्रक्रियेवरील हरकती देण्याची मुदत २९ जूनला संपुष्टात येणार आहे. त्या तारखेनंतर या गावांतील खरेदी-विक्री व्यवहारांवर एक टक्का जादा एलबीटी (स्थानिक संस्था कर) आकारण्याचा विचार केला जात आहे.

राजमाची नाइट ट्रेकचा ‘कडेलोट’?

$
0
0
लोणावळ्याजवळील राजमाची किल्ल्यावर रात्रीच्या वेळी ट्रेकिंग करण्यास बंदी घालण्याचा विचार पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे. या परिसरात गुंड प्रवृत्तींकडून ट्रेकर्सला लुटणे, ट्रेकर तरुणींची छेडछाड काढण्याचे प्रकार घडल्याने पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून बंदी घालण्याचा विचार सुरू केला आहे.

‘एम क्लब हॉलिडेज’ला ग्राहक मंचाचा दणका

$
0
0
हॉलिडे होम रिसॉर्टची सुविधा घेण्यासाठी पैसे भरून सदस्यत्व घेतलेल्या ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी, संबंधित कंपनीने तक्रारदाराला सर्वच्या सर्व ९१,६७० रुपये रक्कम परत द्यावी, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने नुकताच दिला आहे.

प्रवेश घेताना फसवणूक टाळा

$
0
0
परीक्षांचे निकाल लागले की विद्यार्थी आणि पालकांना वेध लागतात चांगल्या आणि नावाजलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचे. मात्र अनेकदा प्रवेशप्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्यामुळे प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली अनोळखी लोकांकडून विश्वास संपादन करून लाखोरुपयांपर्यंत फसवणूक केली जाते.

प्रत्येक दिंडीस दहा अनुदानित सिलिंडर

$
0
0
देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालखी सोहळ्यातील प्रत्येक दिंडीला जिल्हा प्रशासनाच्या वतीने दहा गॅस सिलिंडर्स अनुदानित दरात देण्यात येणार आहेत. तसेच, पालखीच्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना रॉकेलही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

उंच पताका झळकती, टाळ-मृदुंग वाजती

$
0
0
‘धन्य क्षेत्रवासी लोक ते दैवाचे, उच्चारिती वाचे नामघोष’ या भावनेने टाळ, मृदंगाच्या गजरात आणि ऊन-सावलीच्या खेळात जगद‍्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने देहूतून पंढरपूरकडे गुरुवारी (१९ जून) प्रस्थान ठेवले.

रात्रभर सुरू राहणारे भाजी मार्केट

$
0
0
चंदननगरमधील शिवाजी चौकातील श्री काळ भैरवनाथ भाजी मार्केट गेल्या ३५ वर्षांपासून अखंडपणे सेवेत असून, पूर्व पुण्यात व्यवसाय करणाऱ्या व्यापारी आणि ग्राहकांसाठी सोयीचे मार्केट म्हणून त्याची ओळख आहे.

सांस्कृतिक कोट्याच्या अडचणी कायम

$
0
0
अकरावीच्या केंद्रीय प्रवेशात सांस्कृतिक कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या नाट्यकर्मी विद्यार्थ्यांच्या अडचणी अद्यापही कायमच आहेत. बालनाट्य आणि नाट्य विभागातून राज्य कला संचालनालयाची अधिकृत प्रमाणपत्रे मिळविणाऱ्यांची माहिती केंद्रीय प्रवेश समितीकडे उपलब्ध नसल्याने, ‘आम्ही आरक्षित जागांवर प्रवेश घ्यायचा तरी कसा,’ असा सवाल हे विद्यार्थी उपस्थित करत आहेत.

इतिहासाच्या नेटविषयी ‘काफिला’चा आक्षेप

$
0
0
विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (यूजीसी) इतिहास विषयासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नेट’ परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपावर ‘काफिला’ या ऑनलाइन ब्लॉगवरून आक्षेप घेण्यात आले आहेत.

अतिरिक्त प्रवेश दिल्यास कारवाई

$
0
0
अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान कॉलेजांनी कोणत्याही परिस्थितीत व्यवस्थापन कोट्याच्या निश्चित प्रवेश संख्येपेक्षा अतिरिक्त प्रवेश देऊ नयेत, असे प्रवेश दिल्याचे आढळून आल्यास कॉलेजांवर कडक कारवाई करण्याचा इशारा समितीकडून बुधवारी देण्यात आला.

पाणीकपातीबाबत निर्णय नाही

$
0
0
‘पावसाने ओढ दिली असली तरी राज्य सरकारने अद्याप पाणीकपातीबात कोणताही निर्णय घेतलेला नाही,’ असे राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images