Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘बॅचलर ऑफ व्होकेशनल’साठी मुदतवाढ

$
0
0
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये या वर्षीपासून बॅचलर ऑफ व्होकेशन हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. याअंतर्गत ‘द मीडिया कम्युनिकेशन प्रोग्रॉम’ आणि ‘द डिजिटल आर्ट अॅण्ड अॅनिमेशन’ हे दोन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.

म‌हिला पोलिसांसाठी विश्रांती कक्ष

$
0
0
महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस ठाण्यात विश्रांती करण्यासाठी ‘रेस्ट हाउस’ सुरू करण्याचा अभिनव उपक्रम कोंढवा पोलिस ठाण्यात सुरू करण्यात आला आहे. रोटरी क्लब, ‘एनआयबीएम’ रोड आणि कोंढवा पोलिसांनी हा उपक्रम सुरू केला आहे.

बस रस्त्यातच बंद पडल्याने कात्रजमध्ये प्रवाशांचे हाल

$
0
0
कात्रज आगारातील जुन्या बस बंद पडण्याचे प्रमाण वाढल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. गेल्या महिनाभरात दररोज विविध मार्गांवर बस बंद पडण्याच्या घटना घडूनही ‘पीएमपी’ प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

बळीराजाचे डोळे आभाळाकडे

$
0
0
मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा उलटल्यानंतरही पाऊस सुरू न झाल्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे ठप्प आहेत. यामुळे पेरण्याही रखडलेल्या आहेत. खेड तालुक्यातील शेतकरी चिंतातूर झाला असून, तो पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे.

‘एक्स्प्रेस वे’वरील सुरक्षा पुन्हा ऐरणीवर

$
0
0
तुटलेली कुंपणे, सीसीटीव्ही यंत्रणेचा अभाव, पोलिस पेट्रोलिंगचा अभाव, देखभालीसाठी अपुरे मनुष्यबळ अशा समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या ‘पुणे-मुंबई एक्स्प्रेस’वे वरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पार्किंगच्या वादातून महिलेवर हल्ला

$
0
0
सोसायटीच्या रस्त्यात कार पार्क केल्यामुळे झालेल्या वादातून महिलेला मारहाण करून विनयभंग करणाऱ्या चौघांवर शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला कोर्टाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

रेल्वेकडून ८ हजार रुपयाचा दंड वसूल

$
0
0
पुणे स्टेशनच्या परिसरात घाण करणाऱ्या ८८ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून आठ हजार ८०० रुपयांच्या दंडाची वसुली केली. सात ते २१ जून या कालावधीत ही मोहीम राबवण्यात आली होती.

पालिकेच्या प्रकल्पांना आडकाठी नाही

$
0
0
केंद्रात सत्ताबदल झाल्याने केंद्रपुरस्कृत योजनांमध्ये काही बदल होण्याची शक्यता असली, तरी पालिकेच्या सर्व प्रकल्पांना ३१ मार्चपूर्वीच मंजुरी मिळाली असल्याने त्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे पालिका आयुक्त विकास देशमुख यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

नवीन आरोग्य केंद्र, हॉस्पिटलला मान्यता

$
0
0
राज्यात २००१ मध्ये असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या बृहत आराखड्यात आणखी साठ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण हॉस्पिटलच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण हॉस्पिटलच्या खाटांच्या क्षमतेत वाढ करण्यात आली आहे.

पुण्यातील दूध केंद्रांना ‘आरे’चा पुरवठा नाही

$
0
0
पुण्यातील ग्राहक आरे दुधापासून ग्राहक वंचित राहावे लागत असून दूध केंद्र चालकांना पुरवठा होत नसल्याची कैफियत आरे दूध सरिता पूर्ण वेळ दूध केंद्रचालक संघटनेने केली आहे.

मुलाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणार

$
0
0
मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्याच्या आई-वडिलांनी एका फाउंडेशनची स्थापना करून त्यामार्फत सामाजिक कार्य करण्याचे व्रत पुण्यात हाती घेतले आहे. त्याद्वारे ते अनाथाश्रम, वृद्धाश्रम सुरू करणार असून मरणोत्तर अवयव दान करण्याविषयी जनजागृती करणार आहेत.

‘सरकारच्या धोरणाविरोधात लढत’

$
0
0
‘शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात आमची उमेदवारी असून शिक्षक मतदारांनी आमच्या बाजूने उभे राहावे,’ असे आवाहन आमदार कपिल पाटील आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील शिक्षक भारतीचे उमेदवार शिवाजी खांडेकर यांनी मंगळवारी केले.

‘एका कँटोन्मेंटमध्ये रिपब्लिकनला संधी द्या’

$
0
0
पुणे जिल्ह्यातील तीनपैकी एका कँटोन्मेंटमध्ये नामनिर्देशित सदस्यपदी महायुतीच्या वतीने रिपब्लिकन पक्षाला संधी द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी केली आहे.

‘पदवीधर-शिक्षक’चा प्रचार थंडावला

$
0
0
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाळी बुधवारी सायंकाळी थंडावली. या निवडणुकीसाठी उद्या (शुक्रवारी) मतदान होणार आहे. विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक या मतदारसंघांच्या निवडणुकीत यंदा प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.

तपास सीबीआयकडे सोपवा

$
0
0
सिंचन घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाला बळी पडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठीशी घातले. आता चितळे समितीने समोर आणलेल्या अनियमिततांचा तपास मुख्यमंत्र्यांनी सीबीआयकडे सोपवावा, अन्यथा या मागणीसाठी आपण कोर्टात जाऊ, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

भाजप प्रदेशाध्यक्षांकडून माननीयांची ‘हजेरी’

$
0
0
खुद्द प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारासाठी बोलाविलेल्या बैठकीला भारतीय जनता पक्षाच्या काही नगरसेवकांनी बुधवारी दांडी मारली. बैठकीत घेण्यात आलेल्या लेखी हजेरीत ही बाब उघडकीस आल्यानंतर फडणवीस यांनी दांडीबहाद्दरांची खरडपट्टी काढली असून या प्रकाराबद्दल माहिती मागविली आहे.

मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञांची ‘व्हिडिओ लेक्चर्स’

$
0
0
राज्यातील सर्व मेडिकल कॉलेजांमधील विद्यार्थ्यांना कॉलेजच्या माध्यमातून संबंधित विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांची व्हिडिओ लेक्चर्स पाहता येणार आहेत. पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व मेडिकल कॉलेजांमध्ये सकाळी एक तास हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

वाघाची शिकार करणाऱ्या ३ आरोपींना शिक्षा

$
0
0
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघाची शिकार करणाऱ्या तीन आरोपींना कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावल्याने, गेल्या वर्षभरापासून लढणाऱ्या वनाधिकाऱ्यांसाठी बुधवार हा आनंदाचा दिवस ठरला.

साखळीचोरांचा उच्छाद शहरात पुन्हा सुरू

$
0
0
शहर पोलिसांकडून करण्यात येत असलेले ‘स्ट्रीट पेट्रोलिंग’ बंद पडल्याने सोनसाखळी चोरांनी पुन्हा उच्छाद मांडण्यास सुरुवात केली आहे. या चोरांनी बुधवारी दुपारी चार तासांत भारती विद्यापीठ, कोंढवा आणि कोथरूड परिसरात सोनसाखळी हिसकावण्याचे तीन गुन्हे केले आहेत. त्यात साडेबारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.

कूलकॅबमधील प्रवाशांनी चालकाला लुटले

$
0
0
कल्याण रेल्वे स्टेशनवरून भाड्याने कूलकॅबमधून येत असलेल्या एका महिलेसह तिघांनी कॅब चालकाला लुटल्याचा प्रकार हडपसर येथे उघडकीस आला आहे. हा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला. या प्रकरणी जावेद जोरादार मिर्झा (वय ३७, रा. ठाणे) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images