Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आक्षेपार्ह मजकूर टाकण्याविरोधात गुन्हा

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर, संताबद्दल आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर टाकल्याबद्दल विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दुचाकीस्वाराला बाणेरमध्ये लुटले

$
0
0
दुचाकीस्वाराला अडवून मारहाण करून त्याच्याकडील अडीच तोळे वजनाची सोन्याची साखळी हिसकावून नेल्याचा प्रकार बाणेर येथे घडला. या प्रकरणी दुचाकीवरील दोघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

‘होमिओपॅथ’ना अॅलोपॅथीचा मार्ग मोकळा

$
0
0
होमिओपॅथीच्या डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी आता कायद्याचे संरक्षण मिळाल्यामुळे त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, फारमॅकॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची अट अद्यापही राज्य सरकारने कायम ठेवली असून, त्यानंतरच होमिओपॅथना अॅलोपॅथीच्या औषधांचे प्रिस्क्रिप्शन लिहिता येणार आहे.

महामार्ग प्राधिकरणाने नोटिशीबाबत केले हात वर

$
0
0
शिंदेवाडी येथे महामार्गालगत खोदण्यात येणाऱ्या पावसाळी गटारांच्या कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) जबाबदार धरण्याच्या नोटिशीबाबत प्राधिकरणाने हात वर केले आहेत. महामार्गाच्या कामाचे कंत्राट पीएस टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदार कंपनीकडे असल्याने त्यांच्यावर याची जबाबदारी असल्याचे पत्र प्राधिकरणाने हवेली प्रांत अधिकाऱ्यांना दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांशी ‘एलबीटी’बाबत चर्चा करणार

$
0
0
‘शहरातील स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करा, अशी मागणी सर्वच व्यापाऱ्यांची नाही. ‘एलबीटी’तील त्रुटी दूर करा, अशी बहुतांश व्यापाऱ्यांची‌ मागणी आहे. शहराच्या विकासासाठी पालिकेला उत्पन्न मिळालेच पा‌हिजे.

भारती हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप

$
0
0
धनकवडी परिसरातील एका नगरसेवकाच्या कार्यकर्त्याने केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ भारती हॉस्पिटलच्या निवासी वैद्यकीय अधिकाऱी डॉक्टरांनी मंगळवारी सकाळपासून संप पुकारला होता. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात डॉक्टरांनी तक्रार दाखल केली.

‘फेट्यांचे पैसे पालिकेच्या तिजोरीतून देणार नाही’

$
0
0
महापालिकेच्या उद्घाटन कार्यक्रमातून गायब होऊन ‘माननीयां’च्या घरी गेलेल्या फेट्यांची रक्कम पालिकेच्या तिजोरीतून न देण्यावर मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. ‘फेट्यांची किंमत संबंधित ठेकेदाराला देण्याची व्यवस्था आम्ही करू,’ असे स्थायी समितीचे अध्यक्ष बापूसाहेब कर्णे गुरुजी ‌यांनी सांगितले.

कामगार नसल्याने पूल रखडला

$
0
0
सातारा रोडवरील उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाबाबत इतर संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर कारभारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनाही जाग आली आहे. या पुलाच्या कामाला येत्या १५ दिवसांत गती मिळाली नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वडगावशेरी, खराडीचा पाणीप्रश्न सुटणार

$
0
0
भामा आसखेड धरणातून अडीच टीएमसी पाणी आणण्यासाठी आवश्यक असलेली पाइपलाइन टाकणे, पंप हाउस, तसेच कर्मचाऱ्यांची घरे बांधणे या कामांसाठी ६० कोटी रुपयांच्या टेंडरला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समितीचे अध्यक्ष बापूसाहेब कर्णे गुरुजी यांनी ही माहिती दिली.

खासगी ‘ITI’चेही ऑनलाइन प्रवेश

$
0
0
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) प्रवेशांसाठी मागील वर्षी ऑनलाइन प्रक्रिया राबवल्यानंतर आता खासगी ‘आयटीआय’चेही प्रवेश याच माध्यमातून होणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच खासगी ‘आयटीआय’च्या प्रवेशांवर शासनाचे थेट नियंत्रण राहणार असून, खासगी ‘आयटीआय’मधील डोनेशन आणि बोगस प्रवेशाचे प्रकार टळू शकणार आहेत.

स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू

$
0
0
स्वाइन फ्लूच्या संसर्गामुळे रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना एका ४३ वर्षाच्या महिलेचा सोमवारी मृत्यू झाला. प्रतिमा शुक्ला (रा. प्लॉट नं. ५५२, माऊली स्टोन क्रशर, भावडी, लोणीकंद, जि. पुणे) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

सायबर पोलिस ठाण्याची प्रतीक्षाच

$
0
0
फेसबुक, व्हॉट्स अॅपद्वारे सहजपणे तणाव निर्माण करून पुणे शहरात कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करता येऊ शकतो, हे स्पष्ट झाल्यानंतरही राज्य सरकार पुणे पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे.

६ सल्लागार २ वर्षांसाठी निलंबित

$
0
0
रस्त्यांच्या कामांमध्ये चुकीची दरपत्रके तयार करून जादा दराने बिले काढल्याने पालिकेच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवून सहा सल्लागारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पालिकेच्या अंतर्गत लेखापरीक्षणातून ही बाब उघडकीस आल्याने ९८ लाख रुपयांचे नुकसान टळले आहे.

दहावीचाही उच्चांकी निकाल

$
0
0
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पावलावर पाऊल ठेवत राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांनीही उच्चांकी निकाल नोंदविण्याचा विक्रम यंदा केला आहे.

वडिलोवडिली निर्धारी, चालविली पंढरीची वारी

$
0
0
‘तुझ्या वडिलोवडिली निर्धारी, चालविली पंढरीची वारी’ अशी मातोश्रींची आज्ञा शिरसावंद्य मानून संत तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभरबाबा दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला पंढरीला जात असत. हीच परंपरा संत तुकाराम महाराजांनी नेटाने चालविली.

संत निंदा प्रतिबंधक कायद्याची गरज

$
0
0
संत आणि महापुरुष निंदा प्रतिबंधक कायदा अस्तित्त्वात यावा, अशी मागणी संत तुकाराम महाराजांचे वंशज संभाजी मोरे यांनी केली आहे. या माध्यमातून समाजातील विकृतीला आळा बसेल आणि सार्वजनिक संपत्तीचे होणारे नुकसान टळण्यास मदत होईल, असे मोरे यांनी म्हटले आहे.

वारकरी आणि पालिकेतील सुसंवादासाठी ‘मोबाइल अॅप’

$
0
0
पंढरपूरला जाण्यासाठी शहरात येत असलेल्या वारकऱ्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्याची व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी विविध कंपन्यांचे स्वयंसेवक कार्यरत राहणार असून महापालिका प्रशासन आणि वारकरी यांच्यातील सुसंवाद वाढविण्यासाठी, काम करणाऱ्या स्वयंसेवकांसाठी पालिकेने ‘स्वतंत्र वेबसाइट’ आणि ‘मोबाइल अॅप’ तयार केले आहे.

वारकऱ्यांनाही मिळणार ‘इमर्जन्सी’ मेडिकल सेवा

$
0
0
पुणे, सातारा, आणि सोलापूर जिल्ह्यात श्री संत ज्ञानेश्वर आणि जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना वेळेवर तातडीचे वैद्यकीय उपचार देण्यासाठी आता १०८ सेवेची ‘इमर्जन्सी’ मेडिकल अॅम्ब्युलन्स उपलब्ध होणार आहे.

पालखींसाठी वाहतूक नियोजनात बदल

$
0
0
श्री क्षेत्र देहू आणि आळंदी येथून निघणाऱ्या पालखीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्ताचे आयोजन केले आहे. चाकण ते देहूगाव, तळवडे ते देहूगाव, देहूरोड सेंट्रल मार्ग ते निगडी तसेच पुणे ते आळंदी, चाकण ते आळंदी, वडगाव घेनंद ते आळंदी आणि मरकळ ते आळंदी हे मार्ग आज (गुरुवार) आणि उद्या (शुक्रवारी) रोजी बंद राहणार आहेत.

तुकोबारायांच्या पालखीचे आज प्रस्थान

$
0
0
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा गुरुवारी (१९ जून) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यानिमित्त श्री क्षेत्र देहू येथे वैष्णवांचा मेळा जमला असून, ते संतभेटीचा अनुपम्य सोहळा अनुभवण्यासाठी आतुर आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images