Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सीसीटीव्ही यंत्रणेसाठी पाच ऑगस्टला बैठक

0
0
जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि आमदार निधीतून शहरात लावण्यात येणार्या सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या यंत्रणेबाबत पाच ऑगस्ट रोजी पोलिस आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले.

राजकीय-सामाजिक अनास्थेत सीसीटीव्ही ‘कैद’

0
0
‘फेस डिटेक्शन’सारख्या अत्याधुनिक सिस्टिमसह कॅमेरा सुरू आहे का नाही, का त्याची वायर तुटली आहे, का त्याची कनेक्टिव्हिटी गेली आहे यापासून ते संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंगचे तंत्रज्ञान देशातील कंपन्यांकडे उपलब्ध आहे. मात्र, राजकीय आणि सरकारी इच्छाशक्तीच्या अभावामुळेच सार्वजनिक सुरक्षितेकडे दुर्लक्ष होत आहे.

वांग-मराठवाडी धरणग्रस्त आंदोलन मागे

0
0
सरकारने पुनर्वसानाच्या प्रश्नावर तातडीने बैठक बोलावून उपाययोजना करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना दिल्याने गुरुवारी रात्री उशिरा वांग-मराठवाडी धरणग्रस्त आंदोलकांनी तब्बल महिन्यानंतर आंदोलन मागे घेतले.

काँग्रेस-राष्ट्रवादी नेभळट : मनोहर जोशी

0
0
‘राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे हे नेभळट सरकार आहे. या सरकारने आतापर्यंत कोणत्याही अतिरेकी हल्ल्याला प्रतिउत्तर न दिल्यानेच अतिरेकी संघटनांचा आत्मविश्वास वाढल्याने हल्ले होत आहेत,’ अशी टीका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी केली.

शहरातील कचरापेट्यांची तातडीने स्वच्छता

0
0
जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी स्फोटांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कचरापेट्या गुरूवारी तातडीने साफ करण्यात आल्या. दरम्यान, शहरातील जलकेंद्रांची सुरक्षा वाढविण्याची सूचना राज्य गुप्तवार्ता विभागाने (एसआयडी) केली असून, त्या दृष्टीने महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

वीस ते तीस रुपयांनी एसटी महागली

0
0
आठवडाभरापूर्वी वाढलेल्या डिझेलच्या दरामुळे एसटीने बसभाड्यात वाढ केली आहे. नव्याने करण्यात आलेली भाडेवाढ ६.२५ टक्के असून, येत्या रविवारपासून (दि. पाच ऑगस्ट) ती लागू करण्यात येणार आहे.

शिक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढावी

0
0
‘शिक्षणपद्धतीतील सुधारणांबाबत अनेक समित्या नेमण्यात आल्या, त्यांचे अहवाल सादर झाले. या अहवालांवरही समित्या नेमण्यात आल्या. मात्र, अजूनही या बाबतीत कोणतीही ठोस भूमिका सरकारने घेतलेली नाही. या पार्श्वभूमीवर सरकारने शिक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढावी,’ अशी मागणी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांनी शुक्रवारी केली.

अपघाती मृत्यूप्रकरणी पीएमपी चालकाला कैद

0
0
भरधाव आणि बेशिस्तपणे पीएमपी बस चालवून एका दुचाकीस्वाराच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल पीएमपी चालकाला सहा महिने साधी कैद आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. शेख यांनी हा निकाल दिला.

महापालिकांनी थकवले पीएमपीचे १११ कोटी

0
0
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा दर्जा सुधारण्यासाठी आग्रही असणार्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांकडे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपी) सेवेचे तब्बल १११ कोटी रुपये थकित आहेत.

एनडीए अधिका-याच्या चौकशीला परवानगी

0
0
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) नोकर भरती घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कर्नल कुलबीरसिंग आणि अनिलकुमारसिंग यांच्यासह आणखी दोघांकडे येरवडा जेलमध्ये जाऊन तपास करण्यची कोर्टाने सीबीआयला शुक्रवारी परवानगी दिली.

‘यूपीएससी’ परीक्षेत ‘यशदा’चे यश

0
0
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) मे महिन्यात झालेल्या पूर्व परीक्षांचा (प्रीलिम) निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात यशदाच्या ३१ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

पुणे-लोणावळा लोकल आता ५.१० वाजता

0
0
पुणे-लोणावळा लोकलच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. ही गाडी आता पाच वाजून १० मिनिटांनी सुटणार आहे.

आबांच्या गृहखात्याला राणेंची ‘क्लीन चीट’

0
0
‘पुण्यासह राज्याला सुरक्षा देण्यासाठी गृहखाते सक्षम आहे,’ या शब्दांत कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या गृहखात्याला ‘क्लीन चीट’ दिली.

रेल्वेची सुरक्षा ‘ट्रॅक’वर एसटी मात्र रामभरोसे

0
0
जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने स्टेशनवरील सुरक्षा वाढवली असली, तरी दुसर्या बाजूला एसटी स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था ‘जैसे थे’ असल्याचे समोर आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून सस्थानकावरील सुरक्षा वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

सिंडगडावर जाणा-या पुणेकरांचा त्रास होणार कमी

0
0
सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी जाणार्या पर्यटकांना गड चढताना होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी गडावर जाणार्या रस्त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. रस्त्याचे रखडलेले तीन किलोमीटरचे कामही पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती वनमंत्री पतंगराव कदम यांनी शुक्रवारी दिली.

भटक्या कुत्र्यांनी घेतला मुलाचा जीव

0
0
भटक्या कुत्र्यांनी अक्षरक्षः लचके तोडून एका पाच वर्षाच्या मुलाला ठार मारल्याची भीषण घटना शहरातील देवी कॉलनी येथे शुक्रवारी घडली. रमाकांत राजेंद्र दळवी असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याने शहरात कमालीचा संताप व्यक्त होत आहे.

पुणे महापालिकेचे अजब इतिहासप्रेम

0
0
पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंची दुरवस्था होत असताना, पुणे महापालिकेच्या प्रशासनाला त्यांची दुरुस्ती करण्याऐवजी ‘हेरिटेज इकॉनॉमिक्स’ या विषयावरील चर्चासत्रामध्ये जास्त रस आहे. त्यामुळे हे चर्चासत्र पुण्यात घेण्यासाठी पाच लाख रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीकडे मांडला आहे.

'टीम अण्णा'ला पाठिंबा... फिफ्टी-५०!

0
0
जनलोकपाल विधेयकासाठी टीम अण्णाने राजकारणात उतरावे का, या बाबत पुण्याचील कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र सूर ऐकायला मिळाले. या बाबत इंडिया अगेन्स्ट करप्शनतर्फे निवारा वृद्धाश्रमाच्या सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

मध्य पुण्याचे रूपडे बदलणार

0
0
पुण्याच्या उपनगरांमध्ये नियोजनबद्ध विकास होत असताना, मध्यवर्ती पेठांचा भाग अजूनही गजबजलेला आहे. शहराचे हे चित्र बदलण्यासाठी गावठाणांतील बिल्डिंगची उंची आणि हेरिटेजलगत मिळकतींवरील मर्यादा उठविण्याचे पुणे महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात सुचविण्यात आले आहे.

राज्यात पक्ष्यांच्या २६६ जाती

0
0
विविध प्रकारची भौगोलिक रचना, हवामान आणि वसतिस्थानांमध्येही वैविध्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये तब्बल २६६ प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती वास्तव्यास आहेत. एवढेच नव्हे तर यातील १ लाख ३० हजार ४०० पक्ष्यांची नोंद महाराष्ट्र पक्षिमित्र संस्थेने घेतलेल्या पक्ष्यांच्या महागणनेमध्ये झाली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images