Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बैठकीअभावी निराधारांना ८ महिने अनुदान नाही

$
0
0
अंध, अपंग, निराधार महिला व पुरुष यांना उदरनिर्वाहासाठी लागू असलेली संजय गांधी निराधार अनुदानासाठीच्या समितीची बैठक गेले आठ महिने झालेली नाही. त्यामुळे २५२ लाभार्थी प्रति महिना ६०० रुपयांच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत.

नदीकाठावरील गावांना शुद्ध पाणी

$
0
0
सांडपाण्यामुळे दूषित झालेल्या मुळा-मुठा आणि भीमा या नद्यांच्या काठावर वसलेल्या ८७ गावांतील नागरिकांना आता लवकरच पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. या गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या ठिकाणी ‘रिव्हर्स ऑस्मोसिस’ यंत्रणा (आरओ) बसविण्यात येणार आहे.

‘एकटी’ला मिळाली ‘अभया’ची साथ

$
0
0
पतीने अर्ध्यावर साथ सोडली म्हणून कोणी एकटी.... तर, पतीने दुसरा संसार थाटला म्हणून एकटी..घरात माणसे असूनही केवळ बाई म्हणून दुर्लक्ष केल्यामुळे एखादी एकटी.. चाकोरीबद्ध जगणे नाकारून अविवाहित राहिलेली एखादी एकटी.. या सर्वांमध्ये एकच समान धागा म्हणजे कोणी परि​​स्थितीमुळे, तर कोणी स्वतःहून स्वीकारलेले एकटेपण..अशा एकटेपणाने जगणाऱ्या साऱ्याजणींना सुख दुःख वाटून घेता यावे आणि मैत्रीचा आधार मिळावा यासाठी वंचित विकास संघटनेने ‘अभया’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

एलबीटीला पर्याय उपलब्ध

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेला जकातीऐवजी लागू केलेल्या ‘एलबीटी’च्या माध्यमातून वार्षिक अकराशे कोटी रुपये मूळ विक्रीवर उलाढाल कर लावून संकलित होऊ शकते. किंबहुना, हद्दीत आयात मालावर प्रवेश कर आकारल्यास वार्षिक बाराशे कोटी रुपये मिळू शकते, असा दावा पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रिज, कॉर्मस, सर्व्हिस अँड अँग्रीकल्चरने केला आहे.

टँकर खाली सापडून बालकाचा मृत्यू

$
0
0
रस्ता ओलांडत असलेल्या चिमुकल्याचा पाण्याच्या टँकर खाली सापडल्याने जागीच जीव गमवावा लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी खराडी बायपास रोडवर घडली. भरधाव वेगाने गाडी चालविणाऱ्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

विकासकामांना गती देण्याचा निगडी प्राधिकरणाचा निर्णय

$
0
0
गेल्या अनेक कालावधीपासून प्रलंबित विकासकामांना गती देण्याचे निर्णय पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आले. यामध्ये स्पाइन रोडचा अडथळा दूर करणे, मोकळ्या जागेस सीमाभिंत बांधणे, वाकड येथे प्राधिकरण बझार उभारणे, पोलिस स्टेशनची इमारत बांधणे या कामांचा समावेश आहे.

समाजकंटकांवर ‘नेट सॅव्ही’ ठेवणार लक्ष

$
0
0
फेसबूक, व्हॉटस्अपचा सर्वाधिक वापर करणाऱ्या तरुणाईला पुणे पोलिसांची आपले दूत बनवून समाजकंटकांवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली आहे. शहरातील प्रमुख २३ कॉलेजमध्ये पोलिसांच्यावतीने ‘कॅम्पस अँबेसिडर’ नेमण्यात आले असून, सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक पाऊल उचलले आहे.

तक्रारदाराला पोलिस चौकीत फौजदाराची मारहाण

$
0
0
पोलिस चौकीत सर्वसामान्याला चांगला अनुभव अभावानेच येत असल्याचे आणखी एक उदाहरण पुढे आले आहे. विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आळंदी रोड चौकीत तक्रारदार देण्यास गेलेल्या कार चालकाला सहायक फौजदाराने मारहाण केल्याचा प्रकार घडला होता.

अपंगांच्या मागण्यांसाठी ‘प्रहार’चे आंदोलन

$
0
0
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थसंकल्पाच्या तीन टक्के निधीअंतर्गत अपंगांच्या पुनर्वसनासाठी वापरावा यासाठी हवेली पंचायत समिती समोर प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी गटविकास अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात घेराव घातला.

‘पर्वती जलशुद्धीकरण’चे विस्तारीकरण रखडणार

$
0
0
केंद्र सरकारने जेएनएनयूआरएम योजने अंतर्गत मान्यता दिलेल्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव रखडण्याची शक्तया निर्माण झाली आहे. या प्रकल्पाला सहा महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने मंजुरी दिली असली तरी केंद्रात झालेल्या सत्ताबदलामुळे या प्रकल्पाला पुढील तीन ते चार महिने निधी देणे शक्य नसल्याचे केंद्र सरकारकडून महापालिकेला सांगण्यात आले आहे.

स्वस्तातील धान्यामुळे रेशनकार्डांची संख्या फुगली

$
0
0
अन्नसुरक्षा योजनेचे कवच न मिळालेल्या कुटुंबांना ‘एपीएल’ धान्य योजनेतून लाभ देण्याच्या निर्णयामुळे राज्यातील रेशनकार्डांची संख्या फुगल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आता राज्यात नवीन रेशनकार्ड देण्याबरोबर जुन्या रेशनकार्डांमध्ये बदल व कुटुंबातील युनिटची संख्या दुरूस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

देवभूमी उत्तराखंडचा पर्यटन पूर ओसरला

$
0
0
उत्तराखंडमध्ये गेल्या वर्षी झालेल्या महाप्रलयाची धास्ती आजही कायम असल्याने चारधाम यात्रेत यंदा पर्यटकांची रेलचेल अद्याप दिसलेली नाही. यात्रा सुरू होऊन एक महिना उलटला तरी, दरवर्षीच्या तुलनेत केवळ २५ टक्के भाविकांनीच केदारनाथ, बद्रीनाथला भेट दिली आहे.

पालखीच्या सुरक्षेसाठी पालिकेचे ‘सीसीटीव्ही’

$
0
0
पंढरपूरच्या वारीला जाण्यासाठी शहरात येणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविण्यात‌ येणार आहे. महापालिकेच्या वतीने सुरक्षितेच्या दृष्टिने ही यंत्रणा बसविण्यात येणार असून, याचे नियंत्रण आणि संपूर्ण जबाबदारी शहर पोलिस आणि पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे दिली जाणार आहे. सुमारे २७ सीसीटीव्ही कॅमेरा येथे लावले जाणार आहेत.

विमानाच्या रद्द तिकिटाचे पैसे बुडवून फसवणूक

$
0
0
परदेशी जाण्यासाठी खरेदी केलेली विमान प्रवासाची तिकिटे रद्द केल्यानंतर पैसे परत न देणाऱ्या ट्रॅव्हल्स एजंटविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. विनोदकुमार उर्फ अॅडम (न्यू विंग्ज एअर ट्रॅव्हल्स, पुणे-सातारा रोड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

फेट्याचे पैसे माननीयांच्या मानधनातून

$
0
0
महापालिकेच्या उद्घाटन कार्यक्रमातून गायब होऊन माननीयांच्या घरी गेलेल्या फेट्यांची किंमत सर्व पक्षांच्या नगरसेवकांच्या मानधनातून वसूल करण्यात येणार आहे. सर्व नगरसेवकांच्या मानधनातून हे पैसे वसूल करण्याचे पत्र महापालिका आयुक्त विकास देशमुख यांना देण्यात येणार असल्याचे महापौर चंचला कोद्रे यांनी जाहीर केले.

‘NGO’ना आता ‘सर्टिफिकेशन’

$
0
0
तळागाळातील वंचितांसाठी तळमळीने काम करणाऱ्या, प्रशिक्षित प्रकल्प अधिकाऱ्यांच्या सहभागातून परिणामकारक उपक्रम आणि आर्थिक व्यवहार उत्तम पद्धतीने सांभाळणाऱ्या स्वयंसेवी संस्था शोधण्याची मोहीम सध्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिक्लचरच्या ‘सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी’ या समितीने सुरू केली आहे.

परिवहन समिती नसल्यास कारवाई

$
0
0
पुणे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये शालेय परिवहन समितीची स्थापना करणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, ज्या शाळांकडून या समितीची स्थापना करण्यात येणार नाही, अशा शाळाप्रमुखांच्या विरोधात संबधित व्यवस्थापनाने कारवाई करावी, अशी सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.

नर्स संपावर जाणार

$
0
0
विनंतीशिवाय बदल्या करू नयेत, असे आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतरही राज्यातील एक हजाराहून अधिक परिचारिकांच्या अन्यायकारक बदल्या करण्यात आल्या आहेत. त्या बदल्यांच्या निषेधार्थ येत्या सोमवारपासून राज्यातील परिचारिका संपावर जाणार आहेत.

त्रुटी असल्यास अर्ज प्रलंबित ठेवून कार्यवाही

$
0
0
पासपोर्ट काढण्यासाठी गेलेल्या कोणत्याही नागरिकाला कागदपत्रांतील त्रुटींमुळे पासपोर्ट कार्यालयातून रिकाम्या हाती परत फिरावे लागणार नाही. त्यांचे अर्ज प्रलंबित ठेवून पुढील कार्यवाही करण्यास मुंढवा येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने नुकतीच सुरुवात केली आहे.

हॉटेलचालक, वेटरनीच केली आम्हाला मारहाण

$
0
0
‘खेड-शिवापूर येथील हॉटेलचालक आणि वेटर यांनीच माझ्यासह महिला व मुलांनाही मारहाण केली,’ असा आरोप आमदार वल्लभ बेनके यांचे चिरंजीव अमोल बेनके यांनी शनिवारी केला आहे. बेनके कुटुंबीयांसह खेड-शिवापूर येथील महाराष्ट्र हॉटेलमध्ये भोजनासाठी गेले असताना त्यांची भांडणे झाली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images