Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बोगस डॉक्टरांविरोधात हेल्पलाइन

0
0
शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. त्यामुळे अन्य भागांतही बोगस डॉक्टर असण्याची दाट शक्यता गृहीत धरून महापालिकेच्या आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरसंदर्भातील तक्रारींसाठी हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे.

प्रॉपर्टीविषयक गुन्ह्यांसाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक

0
0
पुण्याची वाढती लोकसंख्या, हद्दवाढ आणि वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनी गुन्हे शाखेची पुर्नरचना केली आहे. प्रॉपर्टी संदर्भातील गुन्ह्यांसाठी स्वतंत्र पथक, सदोष मनुष्यबधाचे गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र पथक याच्यासह एक स्वतंत्र युनीट सुरू करून गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

आरक्षित फ्लॅटचे कापलेले पैसे परत देण्याचे आदेश

0
0
फ्लॅट आरक्षित केल्यानंतर उर्वरित रक्कम देणे शक्य झाले नाही म्हणून आरक्षण करण्यासाठी भरलेली रक्कम परत देताना ५० हजार रुपये कापल्याप्रकरणी तक्रारदाराला कापलेली रक्कम परत देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे.

‘एनजीओ’कडून कार्पोरेट कंपन्यांची फसवणूक

0
0
‘कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी’ या नव्या नियमांतर्गत कार्पोरेट कंपन्यांकडून स्वयंसेवी संस्थांना मदत करण्यास आत्ता कुठे सुरुवात केली असताना कर्जतमधील प्रसिद्ध स्वयंसेवी संस्थेने गरीब मुलांच्या दयनीय अवस्थेचे भांडवल करून काही प्रसिद्ध कंपन्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची माहिती उघडकीस आली आहे. या संस्थेत मुलांवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे कळाल्यानंतर कार्पोरेट कंपन्यांमध्ये कोणत्या स्वयंसेवी संस्थेवर विश्वास ठेवायचा, याबद्दल सध्या संभ्रम निर्माण झाला आहे.

‘डीपी’च्या हरकतींची सुनावणी

0
0
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावर (डीपी) आतापर्यंत अडीच हजार हरकतींची सुनावणी पूर्ण झाली आहे. बुधवारपासून पुन्हा सुनावणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, जुलैअखेरपर्यंत सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

भेसळयुक्त गूळ नष्ट

0
0
भेसळीच्या संशयावरून जप्त केलेल्या एकूण गुळापैकी सुमारे सव्वादोन लाखांचा गूळ हा भेसळयुक्त असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून आढळले. त्यामुळे हा गूळ नष्ट करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

एलबीटी नव्हे, कोणताच कर नको

0
0
‘स्थानिक संस्था करासह (एलबीटी) मूल्यवर्धित कर (व्हॅट), जकात, प्रवेश कर अशा कोणत्याही स्वरूपात कर भरण्याचा पर्याय आम्हाला मान्य नाही,’ अशी भूमिका व्यापाऱ्यांनी गुरुवारी महापौरांसमवेत झालेल्या बैठकीत घेतल्याने ‘एलबीटी’बाबतचा गुंता अधिकच वाढला आहे. स्वायत्तता टिकवित विकासकामे करण्यासाठी थेट निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे ‘एलबीटी’चा चेंडू पुन्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कोर्टात ढकलण्यात आला आहे.

इस्टेट एजंटवर गोळिबार

0
0
बावधन येथे आपल्या मुलासह ​कारमध्ये बसण्याचा प्रयत्नात असताना एका रिअल इस्टेट एजंटवर गोळीबार झाल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडला. राजेंद्र भगवान बांदल (वय ४५) असे गोळिबार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्थानिकांनी त्यांचा पाठलाग केला तरी, ते दुचाकीवर असलेले हल्लेखोर तरी ते बावधन गावाच्या दिशेने पसार झाले. पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’च्या आधारे एका गुन्हेगारावर संशय व्यक्त केला असून, त्याचा शोध घेण्यात आहे.

‘माननीयां’नी फेटे नेले घरी

0
0
पुणे महापालिकेच्या नूतनीकरण केलेल्या सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी भाड्याने आणलेले फेटे घरी थेट नेण्याचा ‘प्रताप’ महापालिकेतील ‘माननीयांनी’ केला आहे. परिणामी, पालिकेला ५० हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नसून हा फेटा घोटाळा गुंडाळून संबधित ठेकेदाराला उर्वरित फेट्यांचे भाडे आणि घरी नेलेल्या फेट्यांची रक्कम म्हणून ९० हजार रूपये देण्याचा प्रस्ताव गुपचूप स्थायी समितीच्या बैठकीत नुकताच मंजूर देखील करण्यात आला!

९५ टक्के पुणेकर तरुण फेसबुकवर

0
0
सध्याचे टीनएजर्स सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असून त्यांनी फेसबुकला ‘लाइक’ केले आहे. देशभरातील ८५.९७ टक्के टीनएजर्सचे तर पुण्यातील तब्बल ९४.१६ टक्के टीनएजर्सचे फेसबुकवर अकाउंट आहे. पुण्यातील २६.९३ टक्के मुले-मुली दररोज फेसबुकचा वापर करून त्यावर पोस्ट करतात. आठवड्यातून तीन वेळा फेसबुक वापरणाऱ्यांची (पोस्ट टाकणाऱ्यांची) संख्या पुण्यात ३४.३४ टक्के तर देशात २५.६८ टक्के इतकी आहे.

‘एक मुक्त’वर गुगलची मोहोर

0
0
कम्प्युटरवर सुबोध देवनागरी लेखनासाठी उपयुक्त ठरणारा ‘एक मुक्त’ हा युनिकोड मराठी फॉन्ट मराठी तरुणांच्या अथक प्रयत्नांतून आकाराला आला आहे. विशेष म्हणजे, मराठी लिहिण्यासाठी सर्वगुणसंपन्न असलेल्या या फॉन्टवर गुगलच्या मान्यतेचीही मोहोर उमटली असून, गुगलवरून तो विनामूल्य डाउनलोड करता येईल.

साता-याजवळ अपघात, ११ ठार

0
0
पुणे-बेंगळुरू हायवेवर साता-यानजिक पेरले गावाजवळ क्रूझर गाडीला झालेल्या अपघातात अकराजण ठार आणि चौदाजण जखमी झाले. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जखमींपैकी चारजणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.

सिंहगड ‘रोप-वे’चा मार्ग सुकर

0
0
सिंहगड ‘रोप-वे’च्या उभारणीमध्ये अडथळा ठरत असलेली आतकरवाडीमधील जागा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने महसूल खात्याने पावले उचलली असून, त्यासाठी आतकरवाडीला गावठाणाचा दर्जा देण्यात येणार आहे. तसा प्रस्तावही महसूल खात्याने तयार केला आहे. हा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

‘भीमाशंकर’ला शेकरूंची विशेष पसंती

0
0
महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरूला भीमाशंकरचे अभयारण्य विशेष पसंत पडल्याचे संकेत मिळाले आहेत. या अभयारण्यात करण्यात आलेल्या प्रगणनेमध्ये शेकरू आणि त्यांच्या घरट्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढल्याचे दिसून आले आहे.

पालखी मार्गावर होणार वारकऱ्यांची आरोग्य तपासणी

0
0
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. पालखी मार्गावर ठिकठिकाणी उपचार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार देशमुख यांनी दिली.

विद्यार्थ्यांसाठी मोफत पास; अर्जवाटप सुरू

0
0
‘पीएमपीएमएल’च्या माध्यमात‌ून राबवल्या जाणाऱ्या मोफत पास योजनेचे अर्ज शाळांना उपलब्ध करून देण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारपासून हे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून, शहरातील शाळांना जवळच्या पीएमपी डेपोमध्ये हे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

प्रॉपर्टीविषयक गुन्ह्यांसाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक

0
0
पुण्याची वाढती लोकसंख्या, हद्दवाढ आणि वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलिस आयुक्त सतीश माथुर यांनी गुन्हे शाखेची पुनर्रचना केली आहे. प्रॉपर्टी संदर्भातील गुन्ह्यांसाठी स्वतंत्र पथक, सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र पथक याच्यासह एक स्वतंत्र युन‌िट सुरू करून गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

‘हडपसरमधील दंगल राजकीय स्वार्थासाठी’

0
0
‘विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय स्वार्थ साधण्यासाठीच हडपसर येथे दोन समाजांत दंगल घडवायचा प्रयत्न केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही,’ असे सूचक उद्गार सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी शुक्रवारी काढले. ‘हडपसर येथे घडलेली घटना पूर्वनियोजित होती,’ असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

उपवर मुलींसाठी सरकारचा ‘आहेर’

0
0
राज्यातील आर्थिक अडचणीत असलेल्या पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या उपवर मुलींच्या विवाहासाठी सहा कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पतसंस्थांना हा निधी कर्जरूपाने दिला जाणार असून, उपवर मुली असलेल्या ठेवीदारांना कमाल एक लाख रुपये परत देण्यात येणार आहेत.

जिद्दीने अपंगत्वावर मात

0
0
सध्या स्पर्धेच्या युगात अनेकजण आपल्या अपयशाने खचून जाऊन नशिबाला दोष देतात; परंतु जन्मजात दोन्ही हात नसलेल्या कृष्णा कुचेकर या विद्यार्थ्याने खचून न जाता बारावीची परीक्षा पायाने लिहून यश प्राप्त केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images