Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बारामतीत ‘बंद’ कायमचे बंद

0
0
वेगवेगळ्या कारणांच्या, घटनांच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी बंद पाळला जातो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक वेठीस धरले जातात आणि व्यापाऱ्यांचे, तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ते टाळण्यासाठी व अशा समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी बारामतीत बंद हा प्रकार कायमचा बंद करण्याचे ठरवण्यात आले आहे.

केटरिंग व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी आरोपीला कोठडी

0
0
एक कोटीच्या खंडणीसाठी केटरिंग व्यावसायिकाचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी अटक केलेल्या एकाला १५ जूनपर्यंत कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली. जफर उर्फ बंडा अब्दुल कैय्युम हकीम (वय ४१, रा. गफार बेग स्ट्रीट भीमपुरा गल्ली) असे आरोपीचे नाव आहे.

१६ जणांना फूस लावणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात

0
0
टाटा कम्युनिकेशन कंपनीत नोकरी लावण्याचे अामिष दाखून सोळा जणांना फूस लावून प्रत्येकाकडून युनिफॉर्मसाठी तीन हजार रुपये घेऊन पसार झालेल्या चोरट्याला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. विकास मनोहर साळुंखे (वय ३१, रा. गणेश नगर,चव्हाण बिल्डींग, गणेश नगर, बोपखेल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

समाजकल्याण विभागाची टोल फ्री हेल्पलाइन पुन्हा सेवेत

0
0
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या समाज कल्याण संचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे आणि त्यासंदर्भातील त्यांच्या तक्रारी, समस्या व गाऱ्हाणी ऐकून घेऊन त्यांचे निरसन करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘समता वाहिनी’ ही टोल फ्री हेल्पलाइन पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली आहे.

सिंहगडावर आता ‘लिमिटेड’ प्रवेश

0
0
पावसाळ्याची चाहूल लागताच सिंहगडावरील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी येणाऱ्या हजारो पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाने कंबर कसली आहे. जून महिन्यापासून गडावर वाढणारी पर्यटकांची संख्या आणि त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी यापुढे मर्यादित पर्यटकांनाच गडावर प्रवेश मिळणार आहे.

सीमाभिंतीमुळे वन्यजीव पाण्यासाठी व्याकुळ

0
0
मुळशी धरणालाच चहूबाजूंनी सीमाभिंत बांधण्याचे काम टाटा कंपनीतर्फे चालू असल्यामुळे जलाशयापर्यंत पोहचण्यासाठी रानवाटा बंद होत आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्याचे दुर्भिक्ष्य होऊन, वणवण भटकंतीची वेळ त्यांच्यावर येणार आहे.

केमिस्टांचाही घुमणार विधिमंडळात आवाज

0
0
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांचे विश्वासू सहकारी औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांना आमदारकी दिली आहे. त्यामुळे केमिस्टांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याची ही उत्तम संधी असल्याने विधिमंडळात केमिस्टांचा आवाज घुमणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘एलबीटी बचाव’साठी पिंपरी पालिकेत आंदोलन

0
0
राज्यातील महापालिकांमधील एलबीटी रद्द करण्याच्या संभाव्य निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी काम बंद न करता आंदोलन करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने सोमवारी (नऊ जून) घेतला.

एसटीला होणार टोलमुक्तीचा फायदा

0
0
राज्य सरकारने एसटीला टोलमधून सूट दिल्यामुळे दर वर्षी टोलपोटी खर्च होणारी करोडो रुपयांच्या रकमेची बचत होणार आहे. एसटीच्या पुणे विभागाला दर वर्षी टोलपोटी १४ कोटी रुपये खर्च करावे लागतात.

हडपसर खून प्रकरणातील आरोपींच्या कोठडीत वाढ

0
0
फेसबुकवर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे निर्माण झालेल्या तणावातून हडपसर येथे झालेल्या खूनप्रकरणी हडपसर पोलिसांनी अटक केलेल्या हिंदू राष्ट्र सेनेच्या १९ जणांच्या पोलिस कोठडीत १२ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

मंत्र्यांना वेळ नसल्याने रखडले चित्रपट पुरस्कार

0
0
लोकसभा निवडणूक आणि आचारसंहितेचा फटका राज्य सरकारच्या चित्रपट पुरस्कारांनाही बसला आहे. निवडणुकीच्या धामधुमीत महिन्याभराने पुढे ढकलल्या गेलेल्या या पुरस्कारांच्या नामांकनांची यादी तयार झाली आहे. मात्र, मंत्री महोदयांना वेळ नसल्याने हे पुरस्कारांची घोषणा रखडले आहेत.

अग्निशमन यंत्रणा वाऱ्यावर

0
0
मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेच्या मुख्य इमारतीत उभारण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा वाऱ्यावर पडण्याची शक्यता आहे. ही यंत्रणा संभाळण्याची जबाबदारी अग्निशमन दलाने घ्यावी, असे पत्र भवन विभागाने अग्निशामक दलाला पाठविले आहे.

इंजिनीअरिंग प्रवेशांसाठी पात्रतेचा निकष शिथिल करा

0
0
बारावी सायन्सला ‘पीसीएम’मध्ये ४५ टक्के (राखीव प्रवर्गांसाठी ४० टक्के) गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग शाखेच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरवावे, अशी मागणी प्रवेश प्रक्रिया फोरम या संस्थेने केली आहे.

५० हजार विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेशासाठी क्लिक

0
0
दहावीच्या निकालाच्या तारखेबाबतचा संभ्रम कायम असतानाच अकरावी ऑनलाइन प्रक्रिया मात्र वेगाने सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ५४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म भरून ते कन्फर्म करून घेतले आहेत, तर आयसीएसई आणि सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्याने त्यांनी ऑप्शन फॉर्मदेखील भरले आहेत.

प्रवेशाच्या ‘इंजिनीअरिंग’साठी अद्याप प्रतीक्षाच

0
0
इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठीच्या प्रक्रियेबाबतची प्राथमिक माहिती या आठवडाअखेर जाहीर केली जाणार आहे. नव्या तंत्रशिक्षण संस्थांच्या मान्यतेची प्रक्रिया संपत नाही, तोवर केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (कॅप) सुरू करणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पालिकेची स्कॉलरशिप योजना होणार ऑनलाइन

0
0
महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपच्या योजनेत होणारा गोंधळ लक्षात घेऊन या योजनांमध्ये अधिक सुसूत्रता यावी, यासाठी ऑनलाइन पद्धती‌ने ही योजना राबवण्याचा विचार केला जात आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून ही योजना ऑनलाइन पद्धतीने राबवल‌ी जाणार असून, त्याची चाचणी नुकतीच घेण्यात आली.

मोठ्या निविदा काढण्यास शिक्षण मंडळाला मनाई

0
0
वह्या-पुस्तकांपासून ते अगदी कम्प्युटर आणि कुंड्यांच्या खरेदीवरूनही अडचणीत सापडणाऱ्या शिक्षण मंडळाला यापुढे मोठ्या रकमेच्या निविदा काढण्यास मुंबई हायकोर्टाने मनाई केली आहे. मंडळाच्या सदस्यांना दैनंदिन कामकाज करण्यास मुभा दिली असली, तरी २३ जूनला याबाबत पुन्हा सुनावणी होणार आहे.

भांडून घरातून पळालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0
0
पालकांशी झालेल्या भांडणामुळे घरातून पळालेल्या पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा प्रकार सोमवारी पहाटे उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दोघा आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाऊ कदम यांना नगरकर पुरस्कार

0
0
राम नगरकर कला अकादमीतर्फे ‘राम नगरकर कलागौरव पुरस्कार’ अभिनेते भालचंद्र ऊर्फ भाऊ कदम यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते शुक्रवारी (१३ जून) यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

प्रवाशांच्या सर्वाधिक तक्रारी शिवनेरी सेवेबाबत

0
0
अडचणी सोडवण्यासाठी एसटी प्रशासनाने सुरू केलेल्या प्रवासी दिनाकडे प्रवासी पाठ फिरवत असले, तरी पत्राद्वारे तक्रारी नोंदवण्याचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले आहे. एसटीकडे येणाऱ्या लेखी तक्रारींमध्ये शिवनेरी बस सेवेबाबतच्या तक्रारींची संख्या ७० टक्क्यांपर्यंत गेली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images