Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पेपर फोडणा-यांना एक लाख दंड

$
0
0
दहावी, बारावीसह कॉलेज परीक्षेदरम्यान पेपरसेटर, सुपरवायझर यांच्याकडून पेपर फुटल्यास त्यांना तब्बल पन्नास हजार रुपये ते एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची शिफारस करण्यात आली आहे.

जे. एम. रोड पुन्हा गजबजला

$
0
0
साखळी बॉम्बस्फोटाचे हादरे सहन केल्यानंतर पुणेकरांचे दैनंदिन जीवनक्रम गुरुवारी सकाळपासून सुरळीत झाले. धावपळ, बसथांब्यावरील गर्दी, तुडुंब भरलेल्या बस आणि दुचाकी-चारचाकी वाहनांची वर्दळ असे नेहमीचे दृश्य जंगली महाराज रस्त्यावर पहायला मिळत होते.

पुणे रेल्वे स्टेशन सुरक्षेविनाच!

$
0
0
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुणे स्टेशनवर ३०पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असतानाच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अन्य स्टेशनवर एकही कॅमेरा नसल्याचे समोर आले आहे.

संशयीतांचे रेखाचित्र तयार?

$
0
0
पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी वापरलेल्या सायकली ज्या दुकानातून घेतल्या त्या दुकानदाराला आणि तेथे काम करणा-यांनी दिलेल्या माहितीवरून संशयीतांची रेखाचित्रे तयार करण्यात आल्याचे समजते. लवकरच ती रेखाचित्र मीडियासमोर आणली जातील अशीही माहिती मिळते. मात्र पोलिसांनी यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.

पाच वर्षाचा मुलगा कुत्र्यांची शिकार

$
0
0
सातारा शहरातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थाना पाठीमागे असलेल्या देवी कॉलनी येथील जन्मताच माता-पित्यांचे छत्र हरपलेल्या रमाकांत राजेंद्र दळवी या पाच वर्षाच्या बालकाचा परिसरातील सुमारे दहा-पंधरा मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवून शरीराचे अक्षरश: लचके तोडून कोथळा बाहेर काढला.

गोंधळेवाडीतील हातबॉम्बचे गूढ

$
0
0
जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथे सापडलेले दोन हातबॉम्ब तपासणीसाठी खडकी येथे पाठविण्यात आले आहेत. पुणे येथील स्फोटाशी याचा काहीही संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या छोट्याशा गावात हे हातबॉम्ब आले कोठून हे कोडे अद्याप सुटलेले नाही.

पाटीलला पुणे पोलिसांची 'क्लीनचिट'

$
0
0
पुण्यातील साखळी स्फोटांप्रकरणी संशयित असलेला जखमी दयानंद पाटील याला पुणे पोलिसांनी शुक्रवारी 'क्लीनचिट' दिली. पाटीलच्या तपासातून ठोस काही हाती लागलेले नाही. त्याच्या पासपोर्टबाबत पासपोर्ट ऑफिसशी संपर्क साधण्यात आला आहे.

जोधपूर एक्स्प्रेस दरोडा; आणखी एक अटकेत

$
0
0
जोधपूर एक्सप्रेसवर दरोडा टाकल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. त्याला रेल्वे कोर्टात हजर करण्यात आले असता, सहा ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पीठ गिरणी भरडतेय संकटांच्या जात्यात

$
0
0
विजेची दरवाढ, मनुष्यबळाची समस्या, घरगुती गिरणी उपकरणे घेण्याकडे नागरिकांचा वाढलेला कल यामुळे सामान्यांच्या रोजच्या गरजेचा पीठ गिरणी व्यवसाय संकटांच्या फेर्यात अडकला आहे. वाढत्या महागाईमुळे दळणाच्या दरात पुन्हा वाढ होणार असून, प्रति किलोस पाच रुपये असा दळणाचा नवा दर होणार आहे. सोमवारपासून (दि. ५) ही दरवाढ लागू केली जाणार आहे.

लोणावळा-खंडाळ्यात रस्त्यांची दुर्दशा

$
0
0
रस्त्यांच्या निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरासह मावळातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांसह रस्त्यांवरून चालणार्या नागरिकांनाही रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागत आहे.

अनधिकृत बांधकामप्रश्नी तोडगा काढा

$
0
0
अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेचे पडसाद पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटले. कारवाईच्या हट्टापायी अधिकारी अन्य कामांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सदस्यांनी यावेळी केला आणि या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी आग्रही मागणी केली.

कायदा सल्लागार नियुक्त

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कायदा सल्लागाराच्या नियुक्तीसाठी त्यांनी सादर केलेल्या अटी मान्य करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने नुकताच मंजुर केला आहे. हे महत्त्वाचे पद जास्त काळ रिक्त राहू नये, यादृष्टीने निर्णय घेतल्याचा दावा समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी केला आहे.

नगरसेविका फुगे यांच्यावर गुन्हा

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी जातीचे बोगस प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सीमा फुगे यांच्यावर अखेर भोसरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

पीठ गिरणी संकटात

$
0
0
विजेची दरवाढ, मनुष्यबळाची समस्या, घरगुती गिरणी उपकरणे घेण्याकडे नागरिकांचा वाढलेला कल यामुळे सामान्यांच्या रोजच्या गरजेचा पीठ गिरणी व्यवसाय संकटांच्या फेर्यात अडकला आहे. वाढत्या महागाईमुळे दळणाच्या दरात पुन्हा वाढ होणार असून, प्रति किलोस पाच रुपये असा दळणाचा नवा दर होणार आहे. सोमवारपासून (दि. ५) ही दरवाढ लागू केली जाणार आहे.

‘चास कमान’लाही पर्यटकांचा धिंगाणा

$
0
0
राजगुरुनगर-भीमाशंकर रस्त्यावरील खेड तालुक्यातील चास कमान धरण पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. काही अतिउत्साही पर्यटकांकडून भिंतीलगत तसेच भिंतीच्या आत पाण्याच्या कडेलाच बसून मद्यपान केले जाते. त्यांच्याकडून धिंगाणाही घातला जात आहे. प्रकल्प कर्मचार्यांकडून या पर्यटकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केल्यास दमदाटी व शिवीगाळ केली जात असल्याचे चित्र आहे.

हवाई दलप्रमुखांची लोहगाव स्टेशनला भेट

$
0
0
हवाईदल प्रमुख एन. ए. के ब्राऊन हे तीन दिवसांच्या पुणे दौ-यावर असून, गुरुवारी त्यांनी लोहगाव एअरफोर्स स्टेशनला भेट दिली. एअरफोर्स स्टेशनचे प्रमुख एअर कमोडोर व्ही. आर. चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले.

प्रभाग समिती अध्यक्षांची निवडणूक नऊ ऑगस्टला

$
0
0
पुणे महापालिकेच्या पंधरा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका येत्या नऊ ऑगस्ट रोजी होणार आहेत. पालिकेच्या निवडणुकीत प्रभागांची फेररचना करण्यात आली. त्यामुळे निवडणुकीत प्रभागांची संख्या वाढली आहे.

‘राज्य शिक्षण संस्था’चे येत्या गुरुवारी आंदोलन

$
0
0
सर्व शिक्षा अभियानाचे अनुदान व सुविधा खासगी शाळांनाही मिळाव्यात, खासगी शिक्षण संस्थांना पूर्वीप्रमाणेच १२ टक्के थकबाकीसह वेतनेतर अनुदान देण्यात यावे आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळातर्फे नऊ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.

नवीन होर्डिंग पॉलिसी मंजूर करण्याची मागणी

$
0
0
पुणे महापालिकेने राज्य सरकारकडे पाठविलेली होर्डिंग पॉलिसी मंजूर करण्याची मागणी काँगे्रसचे नगरसेवक आबा बागुल आणि माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी केली आहे.

टिमविच्या लॉच्या अधिष्ठातापदी अॅड.निंबाळकर

$
0
0
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला यंदाच्या वर्षी नवीन लॉ कॉलेज सुरू करण्यास बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून नुकतीच परवानगी मिळाली आहे. या कॉलेजचे अधिष्ठाता म्हणून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images