Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

माजी आमदार मोझे काँग्रेसमध्ये

0
0
निवडणुकीच्या तोंडावर शहरात पक्षांतराची लाट सुरू झाली आहे. बोपोडीचे माजी आमदार आणि शरद पवार यांचे जुने सहकारी रामभाऊ मोझे यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मोझे यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर हे महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून इच्छुक आहेत.

लोहगावमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

0
0
लोहगाव येथील कलवड खाणीत आर्मी बॉइज हॉस्टेलमधील दोन तरुण बुडाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या दोघांपैकी एक जण मृत्युमुखी पडला आहे, तर दुसऱ्याला बाहेर काढण्यात आल्याने तो सुखरूप असल्याची माहिती विमाननगर पोलिसांनी दिली.

शनी-मंगळाच्या धास्तीने संपविले कुटुंब

0
0
दोन्ही मुलांसह पत्नीला झोपेच्या गोळ्या खाण्यास घालून त्यांचा खून करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न अरुण काशिनाथ पालकर (वय ४२) यांनी केला. धायरी येथील समर्थ वंदन सोसायटीत रविवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला. आपल्या कुंडलीत शनी-मंगळ असल्याने संसार आणि व्यवसायात अनेक अडचणी निर्माण झाल्याने हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सुसाइड नोटमध्ये नमूद केले आहे.

विष घेऊन एकाची हॉटेलात आत्महत्या

0
0
तुळजापूर येथील एका ३५ वषीर्य व्यक्तीने पुणे स्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये विष घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आज उत्तरपत्रिकेची तपासणी

0
0
निवडणुकीतील उमेदवार निवडीसाठी काँग्रेसच्या निवड समितीची आज (सोमवार) बैठक होणार आहे. इच्छुकांची प्रचंड संख्या आणि समर्थकांना तिकिटे मिळवून देण्यासाठी आग्रहशील नेत्यांमुळे या बैठकीत घमासान होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

इच्छुक माननीय पुन्हा गॅसवर

0
0
महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना जातवैधतेचा दाखला देणे बंधनकारकच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, केवळ दाखल्यासाठी अर्ज केल्याची पावती जोडून अर्ज भरता येईल, अशा संभ्रमात असलेल्या माननीयांना धक्का बसला आहे.

'झेडपी'साठी डेडलाईन

0
0
संभाव्य बंडखोरांना रोखण्यासाठी राजकीय पक्षांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीतील उमेदवारांची यादी लांबणीवर टाकली आहे. काही इच्छुकांना प्रचाराचा बार उडविण्याचे फर्मान श्रेष्ठींनी सोडले आहे. त्यामुळे अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून, तोपर्यत इच्छुकांना आता 'गॅस'वर राहावे लागेल.

अंत्यविधीच्या खर्चाची चेकद्वारे तरतूद

0
0
पत्नी आणि दोन मुलांचा खून करून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणा-या अरुण पालकर यांनी स्वत:च्या आणि कुटुंबाच्या अंत्यविधीच्या खर्चाचीही तरतूद केली होती. मुलांना आणि पत्नीला झोपेच्या गोळ्या खायला घातल्यानंतर त्यांनी शांतपणे पाच सुसाइड नोट लिहिल्या आणि नंतर स्वत:ही गोळ्या प्राशन केल्या, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

भारतकुमार राऊत अपघातात जखमी

0
0
शिवसेनेचे राज्यसभा खासदार, ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांच्या कारला रविवारी मुंबईहून पुण्याला जाताना एक्स्प्रेस-वेवर अपघात झाला. अपघातात राऊत यांच्या डोक्याला आणि खांद्याला इजा झाली असून त्यांना निगडी येथील लोकमान्य हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे.

ज्योती जाधव काँग्रेसमध्ये डेरेदाखल

0
0
राष्ट्रवादीमध्ये आपली घुसमट होत होती, असा गौप्यस्फोट जि.प. अध्यक्षा ज्योती जाधव यांनी केला. रविवारी ज्योती जाधव काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाल्या.

सेफ्टी ऑडिट करा

0
0
दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या एक्सप्रेस वे वर होणा-या अपघातांना आळा बसावा, म्हणून या रस्त्याचे रोड सेफ्टी ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी महामार्ग पोलिस सरकारकडे करणार असल्याचे पुणे महामार्ग पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी सांगितले. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीमध्ये महामार्ग पोलिसांना सदस्य म्हणून घेण्यात यावे, यासाठी जिल्हाधिका-यांकडे पाठपुरवठा सुरू असल्याचे ते म्हणाले.

चिनी मांजामुळे पक्ष्यांवर 'संक्रांत'

0
0
'संक्रांती'चा आनंद लुटण्यासाठी आयोजिण्यात येणारे 'पतंग उत्सव' सध्या पक्ष्यांसाठी जीवघेणे ठरत आहेत. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणा-या चिनी मांजामुळे पक्ष्यांना धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या पतंग उत्सवांमुळे सात पांढ-या पाठीच्या गिधाडांनी प्राण गमावले असून, आठ गंभीर जखमी आहेत. एवढेच नव्हे स्थलांतर करून महाराष्ट्रात येणारे २० चित्रबलाक, कबुतरे, घारी आणि करकोचेही मोठ्या संख्येने याला बळी पडले आहेत.

खूनप्रकरणी ७ वर्षांची सक्तमजुरी

0
0
छोट्या भावाच्या सदोष मनुष्यवधप्रकरणी मोठ्या भावाला सात वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. भावजयबरोबर अनैतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या प्रकारातून ही घटना घडली होती.

काँग्रेसमध्ये खडाजंगी

0
0
उमेदवार निवडीसाठी बसलेल्या काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत कलमाडी गट आणि निष्ठावंत गटात सोमवारी खडाजंगी झाली. तसेच आपापल्या समर्थकांना उमेदवारी देण्याचे विषय सर्वांनीच लावून धरल्याने या बैठकीत वादाचे बरेच फटाके फुटले आणि बैठकीतून निघून जाण्याचे इशारेही अनेकदा झडले.

राष्ट्रवादीची पहिली यादी रविवारी

0
0
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगेसच्या कमीत कमी दोन टप्प्यांत आणि जास्तीत जास्त तीन टप्प्यांत याद्या जाहीर केल्या जाणार असून, पहिली यादी येत्या रविवारी प्रसिद्ध केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कोयना एक्सप्रेसमध्ये 'फायटिंग'

0
0
कोल्हापूर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या कोयना एक्स्प्रेसच्या प्रवासी डब्यात फिरत्या विक्रेत्याच्या प्रवाशाबरोबर पैशांवरून झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसन अखेर तुंबळ हाणामारीत झाल्याने 'फायटिंग ट्रेन'चा थरार प्रवाशांना अनुभवण्यास आला

अप्पा लोंढेला दणका

0
0
वाळूचा लिलाव घेताना ठरविण्यात आलेली संपूर्ण रक्कम दिलेल्या मुदतीत न भरल्याने जिल्हा प्रशासनाने कुख्यात गुंड अप्पा लोंढेचे ठेके रद्द केले आहेत. तसेच त्याने त्यासाठी भरलेले ५६ लाख रूपयेही जप्त केले आहेत. शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस आणि दौंड तालुक्यातील दोन अशा एकूण तीन वाळूच्या ठेक्यांचा यात समावेश आहे.

'९ महिन्यानंतर एवढे मोठे अपत्य बाहेर...'

0
0
साधारणत: नऊ महिन्यांनी अपत्य बाहेर येत असते; पण नऊ महिन्यांनी एवढे मोठे अपत्य बाहेर आले आहे, असे वक्तव्यकरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुरेश कलमाडी यांची सोमवारी खिल्ली उडविली.

कुलगुरू निवड आणखी लांबणीवर

0
0
पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडसमितीवर घेण्यात आलेल्या आक्षेपांवर भूमिका मांडण्यास राज्य सरकारने सोमवारी आणखी दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे. परिणामी, मुंबई हायकोर्टात या संदर्भातील जनहित याचिकेवर आज, सोमवारी कोणतीही सुनावणी झाली नाही. परिणामी, प्रजासत्ताकदिनापूर्वी विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळण्याची उरलीसुरली आशाही यामुळे मावळली आहे.

सोनसाखळी चोरीच्या प्रकारांत वाढ

0
0
शहराच्या उपनगरांत सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार वाढत आहेत. शनिवारी चार घटनांमध्ये सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. कोथरूड, कवेर्नगर, औंध आणि काळेवाडी भागात या घटना घडल्या आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images