Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुणे पदवीधरसाठी ३२ इच्छुकांनी नेले अर्ज

0
0
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३२ इच्छुकांनी तर शिक्षक मतदारसंघात २५ जणांनी उमेदवारी अर्ज नेले. या निवडणुकीसाठी तीन जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या दोन्ही मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत.

डीटीएड प्रवेश प्रक्रिया येत्या सोमवारपासून

0
0
शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मध्ये सुरू होणाऱ्या अध्यापक शिक्षण पदविका (डीटीएड) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया येत्या सोमवारपासून (२ जून) सुरू होत आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या प्रक्रियेबाबत परिषदेतर्फे गुरुवारी माहिती प्रसिद्ध करण्यात आली.

एका रात्रीत तीन फ्लॅट फोडले

0
0
बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील विष्णू विहार सोसायटीमध्ये चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री तीन फ्लॅट फोडल्याचा प्रकार उघडकीस आला. यामध्ये एका विधवेचा फ्लॅट असून तिच्या घरातून सव्वा चार लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. पोलिसांना घटनास्थळाचे ‘सीसीटीव्ही’ फुटेज मिळाले असून त्याआधारे तपास सुरू आहे.

समाविष्ट गावामुळे सुविधांवर ताण वाढणार

0
0
महापालिका हद्दीत नव्याने ३४ गावांचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नवीन भागातील भावी पुणेकरांना रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यासह अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेला संभाळावी लागणार आहे.

पवार काका-पुतणे होते आग्रही

0
0
हद्दीलगतच्या ३४ गावांच्या पुणे महापालिकेतील समावेशाचा मार्ग अखेर गुरुवारी मोकळा झाला. ही गावे समाविष्ट झाल्यानंतरपुण्याचे क्षेत्रफळ मुंबई महापालिकेपेक्षा अधिक होणार आहे. अनेक महिन्यांपासून हा प्रस्ताव सरकार-दरबारी रखडला होता.

शेलार, शेख यांच्या घरावर छापे

0
0
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेचे उपायुक्त रमेश शेलार आणि उपअभियंता (पथ विभाग) मुश्ताक शेख यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी गुरुवारी सकाळी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले.

सायंकाळच्या कोर्टाला थंडा प्रतिसाद

0
0
पुणे जिल्हा न्यायालयात सुरू करण्यात आलेल्या सकाळ आणि सायंकाळच्या न्यायालयात कामकाज करण्यास वकीलवर्ग उदासीन असून, या कोर्टांच्या कामकाजाला सध्या थंड प्रतिसाद मिळतो आहे.

हवाई उड्डाण प्रशिक्षणासाठी सिम्युलेटर

0
0
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात ‘‘एनडीए’’च्या हवाई दलाच्या छात्रांना आता उड्डाणाचे प्राथमिक धडे सिम्युलेटरवर गिरवता येणार आहेत. ‘एनडीए’च्या हवाई दल प्रशिक्षण केंद्रात बसविण्यात आलेल्या दोन सिम्युलेटर्सच्या माध्यमातून छात्रांना कोणत्याही वेळी कोणत्याही प्रकारच्या हवामानात आभासी उड्डाणाचा अनुभव घेता येणार आहे.

पेपर तपासणीची बिले थकली

0
0
पुणे विद्यापीठासाठी परीक्षांची कामे करणाऱ्या प्राध्यापकांना यंदा आपल्या मानधनापासून वंचितच रहावे लागले आहे. विद्यापीठासाठी पहिल्या सत्राचे पेपर सेट करणाऱ्या प्राध्यापकांना दुसऱ्या सत्राच्या परीक्षांसाठीची तपासणी अंतिम टप्प्यामध्ये आल्यानंतरही पहिल्या सत्रासाठीचे मानधन मिळाले नसल्याची ओरड करण्यात येत आहे.

शिक्षक मतदारांसाठी द्राविडी प्राणायाम

0
0
लोकसभा निवडणुकीच्या मतदारयादीतील ‘गायब’ मतदारांमुळे तोंड पोळलेले जिल्हा प्रशासन आता पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयादीबाबतही सावधानता बाळगत आहे. शिक्षक मतदारयादीतून वगळलेल्या मतदारांना नोटीस पाठवून त्यांच्या नावांची खात्री करून घेतली जात आहे.

लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांची खाबुगिरी पुन्हा उघड

0
0
बेकायदा मालमत्ता जमविल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईत पालिकेच्या उपायुक्तासह उपअभियं‌त्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे महापालिकेतील पालिका अधिकाऱ्यांची ‘खाबुगिरी’ पुन्हा एकदा उघड झाली आहे.

'त्या' अत्याचारामध्ये पुण्यातील आणखी मुले

0
0
कर्जत येथील शेल्टरहोममध्ये झालेल्या अत्याचारात पुण्यातील आणखी काही मुले-मुली बळी ठरलेल्याचे आता समोर येत आहे. त्यामुळेच, त्यांची पुण्यातील संस्थांमधूनच साक्ष घेऊन या प्रकरणी कारवाईला गती देण्याची मागणी पुढे येत आहे.

‘BMW एक्स५’पेक्षा सचिन भारी

0
0
तो येणार अशी बातमी पसरल्याने शोरूमच्या बाहेर रस्त्यावर प्रचंड गर्दी जमली. भर दुपारच्या उन्हात अगदी डिव्हायडरवर चढूनही काही जण त्याची वाट पाहात होते. अखेर त्याची एंट्री झाली, आणि शोरूममध्येच नव्हे तर रस्त्यावरूनही मोबाइल कॅमेराचा क्लिकक्लिकाट सुरू झाला.

महापालिका उपायुक्तांवर गुन्हा

0
0
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेचे उपायुक्त रमेश शेलार आणि उपअभियंता (पथ विभाग) मुश्ताक शेख यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी गुरुवारी सकाळी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले.

मतदारांचे हाल कायमच

0
0
पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मतदार यादीतील नावनोंदणीसाठी गेलेल्या नागरिकांना गुरुवारी मनस्तापच सहन करावा लागला. बहुतांश कार्यालयांमध्ये नावनोंदणीसाठीचे अर्जच उपलब्ध नव्हते, तर काही ठिकाणी त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग नेमण्यात आला नव्हता.

बारावीचा निकाल येत्या सोमवारी

0
0
राज्यात मार्च- एप्रिल २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी (२ जून) दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रके त्यांच्या कॉलेज-शाळांमध्ये दहा जून रोजी मिळतील.

पुणे होणार मुंबईहून मोठे

0
0
गेल्या अनेक दिवसांपासून केवळ चर्चेच्या फेऱ्यांत अडकलेल्या ३४ गावांच्या पुणे महापालिकेतील समावेशाचा मार्ग अखेर गुरुवारी मोकळा झाला. गावांच्या समावेशाची अधिसूचना सरकारने प्रसिद्ध केली त्यावर हरकती-सूचना मागविण्यात येणार आहे.

सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या

0
0
इन्फोसिस कंपनीत काम करणा-या वरुण सुभाष शेट्टी (३४) या सॉफ्टवेअर इंजिनिअरची गुरुवारी रात्री उशिरा हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह हिंजवडी-मारुंजी रस्त्यावर बेवारस अवस्थेत पडला होता.

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

0
0
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे सहा जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने पाच जून रोजी युवराज छत्रपती संभाजी महाराज रायगड चढणार असून, त्यांच्याबरोबर अनेक शिवभक्त या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

अखेर वारसाहक्क मिळाला

0
0
पुणे कँटोन्मेंटच्या हद्दीतील निवासासह व्यापारी तत्त्वावर असलेल्या १९६२ पूर्वीच्याच मालमत्तांवर वारसांची नावे लावण्याचा निर्णय बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा मालमत्तांच्या मालकीहक्काचा प्रश्न मार्गी लागला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images