Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तब्बल १६०७ कोटींचा बेहिशेबी व्यवहार

$
0
0
अल्पावधीत कोटींच्या कोटी उड्डाणे घेतलेल्या जळगावच्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेच्या पुण्यातील घोले रोड शाखेने बेनामी खात्यांद्वारे १६०७ कोटी रुपयांचे बेहिशेबी व्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे.

इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट संस्थांचा ‘कॅप’मधील प्रवेश सुकर

$
0
0
विद्यापीठांनी तंत्रशिक्षण संस्थांना अटींच्या अधीन राहून दिलेले संलग्नत्वही तंत्रशिक्षण संचालयाकडून (डीटीई) मान्य होण्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत विद्यापीठेच संचालनालयाना पत्र लिहिणार असल्याचे समजते.

मुंबर्इ बाजार समितीला १२६ कोटींचे नुकसान

$
0
0
मुंबई कृषिउत्पन्न बाजार समितीमधील एफएसआय विक्री प्रकरणात बाजार समितीचे तब्बल १२६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी समितीचे सभापती बाळासाहेब सोळस्कर यांना राज्याच्या पणन संचालकांनी नोटीस बजाविली असून फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे.

राजकीय कुरघोडींसाठी ‘एफएसआय’चा वाद

$
0
0
पुणे महानगरपालिकेच्या जुन्या हद्दीतील बांधकामांविषयी सध्या सुरू असलेला एफएसआयचा वाद हा निरर्थक असून राजकीय कुरघोडी करण्याच्या चुरशीमुळे हा वाद निर्माण झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

व्यावसायिकाचे अपहरण आणि खून

$
0
0
बिबवेवाडी परिसरातून केटरिंग व्यावसायिकाचे अपहरण करत त्याच्याकडे एक कोटी खंडणीची मागणी करणाऱ्या सहा ते आठ आरोपींनी त्याचा बोपदेव घाटात खून केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला

पीएफ थकबाकीदारांमागे ‘ईपीएफओ’चा ससेमिरा

$
0
0
कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड (पीएफ) न भरता फसवणूक करणाऱ्या कंपनी किंवा संस्थांकडून थकबाकी वसुली करण्याचा आदेश एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गेनायझेशनच्या (ईपीएफओ) मुख्यालयाने विभागीय कार्यालयांना दिला आहे.

खरिपासाठी १७ लाख हेक्टर क्षेत्राचे लक्ष्य

$
0
0
पावसाळ्याच्या तोंडावर खरीप हंगामासाठी राज्य सरकारचे नियोजन सुरू असून येत्या हंगामात पुणे विभागात १७ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पिके घेण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पुणे विभागात उसाच्या क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत तब्बल दुपटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे.

मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

$
0
0
मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि परिसरात बुधवारी अंशतः ढगाळ वातावरण होते. शहरात बुधवारी ३९ अंश सेल्सियस इतक्या कमाल तर २१.९ अंश सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.

पावसाळ्यासाठी फायरब्रिगेड सज्ज

$
0
0
मान्सून पूर्व वादळी पावसामुळे शहरात झाडे पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. या पार्श्वभूमीवर अशा घटनांना सामोरे जाण्यासाठी फायरब्रिगेडने पूर्व तयारी केली असून त्यांची टीम सज्ज झाली आहे.

सावकारांविरोधात ४८८ तक्रारी

$
0
0
आर्थिक विपन्नावस्थेतील शेतकऱ्यांना लुटणाऱ्या राज्याभरातील ४८८ सावकारांविरोधात सहकार खात्याकडे तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची चौकशी करून त्यातील १०८ केसेस सोडविण्यात आल्या आहेत. यातील काही सावकारांकडून शेतकऱ्यांच्या बळकाविलेल्या जमिनी परत घेण्यात आल्या आहेत.

मराठी भाषा विद्यापीठ होणार

$
0
0
मराठीचे जतन आणि संवर्धनासाठी स्वतंत्र विद्यापीठ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या भाषा सल्लागार समितीने विद्यापीठाचा प्रस्ताव मान्य करत वेगळ्या विद्यापीठासाठी प्रारूप तयार केले आहे. येत्या चार दिवसांत हे प्रारूप सरकारदरबारी सादर करण्यात येणार आहे.

बोर्डाचे फेसबुक पेज बनावट!

$
0
0
पुणे विद्यापीठापाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (बोर्ड) बारावीच्या निकालाला आता सोशल नेटवर्किंग साइटने ग्रासले आहे. बोर्डाच्या नावाने सुरू झालेल्या दोन बनावट फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून बारावीच्या निकालाविषयीच्या चर्चांना आता ऊत आला आहे.

बारावीचा निकाल २ जूनला

$
0
0
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-२०१४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार, २ जून रोजी जाहीर केला जाणार आहे. या दिवशी दपारी ११ वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येईल..

बिबेवाडीत गॅस सिलिंडरचा स्फोट

$
0
0
बिबवेवाडी येथील ‘पीएमपी’ कॉलनीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होवून फ्लॅटमध्ये असलेली एक महिला गंभीररित्या भाजली तर एका फ्लॅटमधील संसारापयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.

दलितांवरील वाढते अत्याचार लाजिरवाणे

$
0
0
‘महाराष्ट्रात २०१३पर्यंत दलित अत्याचाराची सात हजार १३ प्रकरणे प्रलंबित असून, केवळ साठ केसमध्ये आरोपींना शिक्षा झाल्या आहेत. शिक्षेचे प्रमाण केवळ ०.८५ टक्के इतके असून, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी ही लाजिरवाणी बाब आहे,’ अशी टीका वृंदा कारत यांनी केली.

स्किल्ड मायग्रेशन व्हिसासाठी ‘टोफेल’चा स्कोअर ग्राह्य

$
0
0
ऑस्ट्रेलियाचा स्किल्ड मायग्रेशन व्हिसा मिळविण्यासाठी आता टेस्ट ऑफ इंग्लिश अॅज फॉरेन लँग्वेज (टोफेल) या परीक्षेचा स्कोअर ग्राह्य धरणार आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियात जाऊ इच्छिणाऱ्या कुशल कर्मचाऱ्यांना ‘टोफेल’ देऊन व्हिसासाठी अर्ज करता येऊ शकेल.

‘रायसोनी’ची बेनामी नावे अन् खाती

$
0
0
बोगस खाती उघडून कोट्यवधी रुपयांचे बेनामी व्यवहार करणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी पतसंस्थेच्या घोले रोड शाखेच्या तपासणीत फक्त १७ खातेदारांनी ‘केवायसी’चे निकष पूर्ण केल्याचे आढळून आले आहे.

तंबाखूचा वाढता वापर ठरतोय धोक्याची घंटा

$
0
0
तंबाखूच्या सेवनासह स्मोकिंगमुळे अनेकांना जीव गमविण्याची वेळ आली असून त्यामुळे देशाह जगात यामुळे मरणाच्या दारात जाणारयांची संख्या मोठी असल्याने सध्या ही धोक्याची घंटा असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

शिवाजी मार्केटमुळे समस्यांची जंत्री

$
0
0
आजुबाजूला सततची दुर्गंधी, वाहने लावण्यासाठी वाहनतळाची वानवा, लोकांची वर्दळ, त्यामध्ये हातगाडी, पथारीवाल्यांची भर असे चित्र असलेले शिवाजी मार्केट हे वॉर्ड क्रमांक दोनमधील प्रमुख ठिकाण. त्यामुळे हा वॉर्ड तसा चांगला असला, तरी शिवाजी मार्केटमुळे समस्यांच्या दावणीला बांधला गेला आहे.

डोक्यात दगड घालून खून

$
0
0
पत्नीची छेड काढल्याच्या रागातून मित्रांच्या सहाय्याने सुरक्षारक्षकाचा डोक्यात दगड घालून तसेच कोयत्याने वार करून खून केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. हांडेवाडी रोडवरील ‘सिम्पली सिटी’समोरील टेकडीवर हा प्रकार घडला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images