Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विमानतळाचे ‘टेक ऑफ’ रखडले

$
0
0
खेड विमानतळाच्या जागेची निश्चिती झाल्यानंतरही विमानतळाच्या ‘टेक ऑफ’साठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. या विमानतळाच्या उभारणीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध सुरू केल्यामुळे या कामाला खो बसण्याबरोबरच, सरकारनेही भूसंपादनासाठी कोणतीही कार्यवाही सुरू न केल्याने विमानतळाचा ‘टेक ऑफ’ लांबण्याची चिन्हे आहेत.

जलतरण तलावात बुडालेल्या महिलेचा मृत्यू

$
0
0
नाना पेठेतील यंग मेन्स ख्राइस्ट असोसिएशनच्या (वायएमसीए) क्वार्टर गेट येथील जलतरण तलावात बुडालेल्या महिलेचा एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या संदर्भात समर्थ पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे.

नगरसेवकाच्या मुलासह तिघांना अटक

$
0
0
भंगार व्यावसायिकाकडे शहरातील कुख्यात गुन्हेगाराच्या नावाने पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलासह त्याच्या दोन साथीदारांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने शनिवारी मध्यरात्री अटक केली.

‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांना लुबाडले

$
0
0
महावितरण कंपनीच्या नीलायम टॉकीज येथील कार्यालयात वीजबील भरणा मशिनमध्ये ग्राहकांनी जमा केलेल्या दोन लाख ३० हजार रुपयांसह ५३ चेक असलेली बॅग कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून चोरट्यांनी हिसकावून नेली. शुक्रवारी सायंकाळी ही घटना कार्यालयाजवळच घडली.

‘मनसे’च्या शहर सचिवांवर कौटुंबिक छळाचा गुन्हा

$
0
0
पहिला विवाह झाला असताना घटस्फोटित महिलेशी लग्न करून तिचा छळ व मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव आशिष उर्फ बाबा चिटणीस यांच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चिटणीस यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

इंजिनीअरिंगच्या पेपरमध्ये प्रश्नच हुकला

$
0
0
इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाच्या ‘हीट ट्रान्स्फर’ या विषयाच्या पेपरला एक प्रश्नच छापून न आल्याने गडबड झाली. शुक्रवारी झालेल्या या पेपरमध्ये नेहमीप्रमाणे बारा प्रश्नांऐवजी, केवळ अकराच प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका मिळाल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यापीठाने वेगळ्या कागदावर एक प्रश्न पाठवून परीक्षेचा सोपस्कार पूर्ण केला.

मातृत्वासाठी लाखोंचे पॅकेज

$
0
0
वैद्यकीय उपचार महागडे होत असतानासुद्धा केवळ मातृत्वाच्या आनंदासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीकरिता जाण्याचा सर्वाधिक ओढा आहे. त्यामुळेच सुरक्षित मातृत्वासाठी लाखो रुपयांचे ‘पॅकेज’ खरेदी करायला दाम्पत्य तयार होत आहेत.

दुसऱ्या अपत्याच्या इच्छेस मुरड

$
0
0
बाळाच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत लागणारी आवश्यक आर्थिक तरतूद आणि नोकरीच्या अनियमित वेळांमुळे घरासाठी मिळणारा अपुरा वेळ आणि घरात सांभाळणार कोण… या आणि अशा अनेक कारणांमुळे इच्छा असूनही अनेक पालक आज एका मुलानंतर दुसऱ्या अपत्याचे धाडस करण्यास तयार नाहीत.

शिवाजी पुतळा रस्ता एकेरी

$
0
0
पालिकेतर्फे स. गो. बर्वे चौकात उभारण्यात येणाऱ्या ‘ग्रेड सेपरेटर’च्या मॉडर्न कॅफेसमोरील कामास सुरुवात केली जाणार असल्याने येथील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण होईपर्यंत बर्वे चौक ते शिवाजी पुतळा चौक हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

मतदार नोंदणी; ‘आप’ची मोहीम

$
0
0
मतदार यादीतून नाव गायब झाल्याने मतदानापासून वंचित राहिलेल्या नागरिकांसाठी आम आदमी पार्टीतर्फे विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. १२ ते १८ मे दरम्यान दिवसभर शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांबाहेर नोंदणीसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.

बीआरटी मार्गच नको

$
0
0
सातारा रोडवर ठिकठिकाणी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांमुळे बीआरटीचा मार्ग ‘काठावर पास’ होण्याएवढाच राहिला असेल, तर हे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत ‘बीआरटी’साठीचा स्वतंत्र मार्गच बंद करा, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.

महाराष्ट्र मात्र ‘शॉकप्रूफ’

$
0
0
वीज स्वस्ताईचे गोडवे गाणाऱ्या गुजरातमध्ये लोकसभा निवडणुका पार पडताच वीज दरवाढीला सामोरे जावे लागले आहे. इतकेच नव्हे, तर गुजरातसह मध्य प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांमुळे थोपवून धरलेल्या वीज दरवाढीने पुन्हा डोके वर काढले आहे.

खेड तालुक्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली

$
0
0
खेड तालुक्याच्या पश्चिम व पूर्व भागातील पिण्याच्या पाण्याची दाहकता वाढत असून सध्या तीव्र पाणी टंचाई असलेली तीन गावठाणे व ५३ वाडया-वस्त्यांवरील साडेबारा हजार लोकांना पंचायत समितीमार्फत तीन टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

दलित वस्तीतील नागरिकांच्या नशिबी नरक यातना

$
0
0
एकीकडे बारामतीचा चकाचक विकास होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वचछतेचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. रस्त्याच्या बाजूने जाताना कचरा निदर्शनास आल्यास लगेचच त्याच जागेवर गाड्यांचा ताफा थांबून प्रशासनाची कानउघाडणी करतात हा आजपर्यंतचा बारामतीकरांचा अनुभव आहे.

आरोग्य विद्यापीठाला ‘ISO’ प्रमाणपत्र

$
0
0
नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास टी.यू. व्ही. इंडिया प्रा. लि. संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘आयएसओ’ ९००१ ः२००८ प्रमाणिकरण करण्यात आले आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्र विद्यापीठालाही प्राप्त झाले आहे.

रंगला पुरुषोत्तमीयन्सचा स्नेहमेळा

$
0
0
'रुपाली' हॉटेलध्ये जाऊन महेश एलकुंचवार यांच्याकडून एकांकिकेच्या सादरीकरणाची घेतलेली परवानगी... पुरुषोत्तमने आयुष्यात दिलेले मैत्र आणि प्रेम...नाटक हेच अभिव्यक्तीचे माध्यम असल्याची जाणीव...खेळ आणि राजकारणात दंग असलेला युवक लेखन, अभिनयात झालेला 'प्रवीण'...अशा अनेक आठवणींच्या स्मरणरंजनात शनिवारी 'पुरुषोत्तमीयन्स'चा मेळा पुन्हा रंगला.

सुरतच्या मराठी आमदाराने उलगडला प्रवास

$
0
0
संधीची आणि मदतीची अपेक्षा न करता महिलांनी बेधडक पुढे आले पाहिजे, आपल्यात क्षमता निर्माण करा आणि स्वत:ला सिध्द करा, असे अवाहन गुजरातमधील सुरत शहरातील लिंबायत विधानसभा मतदार संघाच्या पहिल्या मराठी महिला आमदार संगीता पाटील यांनी केले.

समतेचा विचार फुलेंनी पोहोचवलाः बापट

$
0
0
'महात्मा फुले यांनी माणूस हा केंद्रबिंदू मानून परिवर्तनाचे काम केले. सर्वांपर्यंत त्यांनी समतेचा विचार पोहोचवला. त्यांचा जयजयकार करणे सोपे असले, तरी त्यांचे अनुकरण करणे अवघड आहे,' असे मत आमदार गिरीश बापट यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

फळभाज्या महाग, पालेभाज्याही तेजीत

$
0
0
सतत वाढणारा उकाडा आणि अवेळी झालेल्या पावसाचा फटका बसल्याने बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटली आहे.

महुडे खोऱ्यात तीव्र पाणीटंचाई

$
0
0
डोंगराच्या पायथ्याशी आणि भरपूर पावसाच्या परीसरांत असलेल्या भोर तालुक्यातील महुडे बुद्रुक, महुडे खुर्द आणि त्यांच्या बारा वाड्यावस्त्यामध्ये गेल्या दोन महीण्यापासून तीव्र पाणी टंचाई असून नागरिकांचे पिण्याचे पाणी उपलब्ध करून घेण्यासाठी वणवण सुरू आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images