Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बाळंतपण होतेय ‘सुरक्षित’

$
0
0
धकाधकीची लाइफस्टाइल, करिअरची स्पर्धा आणि बदलत्या जीवनशैलीमध्ये बाळंगतपण गुंतागुंतीचे, क्लिष्ट होत असतानाच वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ते सुरक्षितदेखील होत आहे. इतकेच नव्हे, तर ‘टेस्ट ट्यूब बेबी’पर्यंतच्या पर्यायांमुळे शारीरिक समस्यांवर मात करीत मातृत्वानुभव घेणेदेखील शक्य होत आहे.

ओएमआर उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मिळणार

$
0
0
परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी यंदा ‘जेईई-मेन’ ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ओएमआर उत्तरपत्रिका आणि ‘कॅल्क्युलेशन शीट’ची फोटोकॉपी देण्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतला आहे.

‘मुद्रांका’ने तिजोरी फुगली

$
0
0
राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावणाऱ्या मुद्रांक व नोंदणी विभागाने यंदा राज्याची तिजोरी तब्बल एक हजार कोटी रुपयांनी फुगविली आहे. यंदा १८ हजार ५४० कोटी रुपयांचा मुद्रांक महसूल देताना राज्याला महसूल मिळवून देणारे दुसऱ्या क्रमांकाचे खाते ठरण्याचा मानही मुद्रांक व नोंदणी विभागाने मिळविला आहे.

सावली सोडणार साथ!

$
0
0
‘सावली कधीच आपली साथ सोडत नाही’ असे वारंवार सांगितले जात असले, तरी येत्या १४ मे रोजी काही मिनिटांसाठी सावली प्रत्येकाची साथ सोडणार आहे. या दिवशी दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांनी सूर्य डोक्यावर आल्यावर सावली दिसेनाशी होणार आहे.

तीन मिलीमीटर पाऊस

$
0
0
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवा आणि पावसाळी वातावरणाची चाहूल देऊनही नुसतीच ‘हूल’ देणाऱ्या पावसाने शुक्रवारी दुपारी पुणेकरांना भिजवले. सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरात ३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. येत्या दोन दिवसांतही शहराच्या काही भागांत वादळी पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

रेल्वे आरक्षण केंद्रांवर CCTV

$
0
0
रेल्वे आरक्षण केंद्रांवर येणाऱ्या अनधिकृत तिकीट एजंटना आळा बसावा, म्हणून रेल्वे प्रशासनाने पुण्यातील सर्व आरक्षण केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे विभागीय व्यवस्थापक सुनीत शर्मा यांनी ‘मटा’ला सांगितले.

राठोडच्या जमिनीचा लिलाव होणार

$
0
0
बेकायदेशीरपणे टेकडी फोडल्याप्रकरणी किसन राठोड याने ८० लाख रुपयांचा दंड न भरल्याबद्दल त्याच्या हवेली तालुक्यातील रहाटवडे येथील जमिनीचा लिलाव पुकारण्याची तयारी महसूल प्रशासनाने केली आहे.

कारवाईची तीव्रता वाढली

$
0
0
शहरातील अनधिकृत बांधकामांसह अतिक्रमणांवरील कारवाईची तीव्रता पालिकेने शुक्रवारी अधिक तीव्र केली असून, दिवसभरात ३२ हजार स्क्वेअर फूट क्षेत्र मोकळे केले गेले. बाणेर-बालेवाडी परिसरात सुमारे २५ ठिकाणी कारवाई केली गेली, तर येरवड्यात ‘ग्रीन बेल्ट’मध्ये येणारे अनधिकृत हॉटेल जमीनदोस्त करण्यात आले.

पुण्यात १५ हजार फेरीवाले

$
0
0
शहरामध्ये सुमारे १५ हजार फेरीवाल्यांचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यातील निम्म्या फेरीवाल्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. नोंदणी झालेल्या फेरीवाल्यांच्या जागांवर ‘मार्किंग’ करण्याचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

रस्त्यांसाठी हवे ३ हजार कोटी

$
0
0
पालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये दळणवळणाच्या किमान सुविधा उपलब्ध होण्यासाठी अद्याप ६० टक्के भागांत रस्त्यांचे जाळे निर्माण करावे लागणार आहे. त्यासाठी, पालिकेला एका वर्षाच्या उत्पन्नाएवढ्या, म्हणजेच तब्बल तीन हजार कोटी रुपये खर्चाची तयारी ठेवावी लागणार आहे

प्रवेशाचे तंत्र बिघडणार?

$
0
0
इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंटसह सर्व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला यंदा उशीर होणार आहे. नव्या तंत्रशिक्षण संस्थांना मान्यता देण्याची प्रक्रिया राबविण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला (एआयसीटीई) महिनाभराची मुदतवाढ मिळाल्याने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पुढे जाईल, असे समजते.

पुणे पोलिसांची नामुष्की

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर गेल्या नऊ महिन्यांत आरोपींचा कोणताही सुगावा न लागल्याने हा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याच्या हायकार्टाच्या ​निर्णयामुळे पुणे पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली आहे.

दाभोलकर केस CBIकडे

$
0
0
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी राज्य सरकारला दिला.

‘मनसे’च्या शहर सचिवांवर गुन्हा

$
0
0
पहिला विवाह झाला असताना घटस्फोटित महिलेशी लग्न करून तिचा छळ व मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव आशिष उर्फ बाबा चिटणीस यांच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भाजपच्या मतदारसंघांतच दलित अत्याचार

$
0
0
राज्यात भाजप-सेनेचे आमदार असलेल्या बहुसंख्य मतदारसंघांमध्येच दलितांवर अत्याचाराचे प्रकार घडल्याचा आरोप जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी शनिवारी केला.

कूळहक्क जमिनीच्या विक्रीला मुभा

$
0
0
कूळवहिवाटीचा हक्क मिळालेली शेतजमीन महसूल आकारणीच्या चाळीस पट नजराणा भरल्यावर विक्रीसाठी ‘मुक्त’ होणार आहे. कुळाच्या जमीन विक्रीला जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीच्या जोखडातून मोकळे केल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, कूळहक्क मान्य होऊन दहा वर्षे झालेल्या जमिनींच्या विक्रीबाबतच ही सवलत मिळणार आहे.

तरुणीच्या खुनाप्रकरणी तिघांना अटक

$
0
0
तळेगाव रेल्वे स्टेशन येथे एका बॅगेत सापडलेल्या अल्पवयीन मुलीच्या खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी तिघांना मुंबई येथून अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.

उलगडतोय पक्ष्यांचा गूढ प्रवास

$
0
0
नागालँडमधून हिवाळ्यात गायब होणारा ‘अमूर फाल्कन’ जातो तरी कुठे, याचा अभ्यास केल्यावर तो कोकण किनारपट्टीमार्गे अरबी समुद्र पार करून थेट दक्षिण आफ्रिकेत गेल्याची धक्कादायक माहिती मिळाली.

कूळहक्क जमिनीच्या विक्रीला मुभा

$
0
0
कूळवहिवाटीचा हक्क मिळालेली शेतजमीन महसूल आकारणीच्या चाळीस पट नजराणा भरल्यावर विक्रीसाठी ‘मुक्त’ होणार आहे. कुळाच्या जमीन विक्रीला जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीच्या जोखडातून मोकळे केल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील विद्यापीठांची नाराजी

$
0
0
राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानातून (रुसा) राज्यातील विद्यापीठांना भरीव निधी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक असलेली राज्य उच्च शिक्षण परिषद अद्यापही स्थापन न झाल्याबाबत राज्यातील विद्यापीठांच्या प्रतिनिधींनी मुंबईत झालेल्या एका बैठकीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images