Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

साखळीचोरीच्या १० टोळ्यांचा राज्यभर धुमाकूळ

$
0
0
दिवसाढवळ्या आणि भरवस्तीत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे हिसकावणाऱ्या १० इराणी टोळ्या राज्यभर कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. गुन्हा केल्यानंतर हायस्पीड दुचाकींवर पोलिसांना गुंगारा देत गायब होणाऱ्या या दहापैकी दोन टोळ्यांना पुणे पोलिसांना गजाआड केले आहे.

बॅगमध्ये सापडला तरुणीचा मृतदेह

$
0
0
तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर आढळलेल्या लाल रंगाच्या बेवारस बॅगमध्ये एका १५ ते १८ वयोगटातील तरुणीचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तळेगाव रेल्वे स्टेशनवर उघडकीस आला.

BSNL देणार ई-बिलासाठी ‘दहा लॉयल्टी’

$
0
0
भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) लँडलाइन आणि ब्रॉडबँड ग्राहकांनी कागदी बिलांऐवजी ई-मेलवरून बिल घेतल्यास त्यांना दहा लॉयल्टी देण्यात येणार आहे. या योजनेचा ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन बीएसएनएलकडून करण्यात आले आहे.

अँड्रॉइड अॅप करणार थॅलेसेमियाचे निदान

$
0
0
रक्तक्षयाचा एक भाग असलेल्या थॅलेसेमिया या विकाराचे निदान करणे आता अगदीच सोपे झाले आहे. रक्तक्षयातील तज्ज्ञ आणि क्लिनिकल हेमेटॉलॉजिस्ट डॉ. विजय राजानन यांनी ‘अॅनिमिया डायग्नोसिस’ या अॅप्लिकेशनची निर्मिती केली असून, या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून थॅलेसेमियाचे प्राथमिक निदान करता येते.

महापौर अंधारात!

$
0
0
पुणे महानगरपालिका परिसरातील वीज बुधवारी सकाळपासूनच गायब झाल्याने त्याचा फटका शहराच्या प्रथम नागरिक महापौर चंचला कोद्रे यांना बसला. पालिकेच्या मुख्य इमारतीमधील वीज पुरवठा संपूर्ण दिवस खंडीत झाल्याने कामाचा खोळंबा झाला.

जखमींवर १०८ सेवेमुळे उपचार

$
0
0
दिवा- सावंतवाडी पॅसेंजरचे डबे घसरल्याने झालेल्या दुर्घटनेतील पंधरा गंभीर जखमींना १०८ या ‘इमर्जन्सी’ मेडिकल सर्व्हिसेसच्या (ईएमएस) सेवेमुळे ‘गोल्डन आवर’मध्ये वैद्यकीय उपचारांची मदत वेळेवर मिळू शकली. अवघ्या वीस मिनिटांत घटनास्थळी अॅम्ब्युलन्स पोहोचल्याने जखमींना वेळेत हॉस्पिटलमध्ये नेता येणे शक्यही झाले.

...मग परीक्षा द्यायची तरी कशी?

$
0
0
पुढच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यावरही मागच्या परीक्षेच्या निकालासह इतर कोणत्याही बाबीचा तपास नसल्याने, पुणे विद्यापीठाच्या एमईचे विद्यार्थी चांगलेच वैतागले आहेत. ‘मागचा निकाल नाही, पुनर्मूल्यांकन आणि फोटोकॉपीचे अर्ज नाहीत, परीक्षेचे अर्ज नाहीत, हॉलतिकीटही नाही, तर येत्या १७ मेपासून आयोजित परीक्षा द्यायची तरी कशी,’ असा सवाल एमईचे विद्यार्थी सध्या विचारत आहेत.

...अन्यथा अविश्वास ठराव

$
0
0
कुंड्या खरेदीपासून ते प्रयोगशाळेतील साहित्याच्या खरेदीपर्यंत, दर आठवड्याला शिक्षण मंडळातील गैरव्यवहार समोर येत असल्याने अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मंडळाच्या सदस्यांनीच केली आहे. राजीनामा न दिल्यास अविश्वास ठराव दाखल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

बैलगाडा शर्यतींना लगाम

$
0
0
गावातील ‘माननीयां’साठी प्रतिष्ठेचा विषय बनलेल्या ‘बैलगाडा’ शर्यतीला सुप्रीम कोर्टाने अखेर बुधवारी लगाम लावला. शर्यतीच्या नावाखाली बैलांचा होणारा छळ लक्षात घेऊन कोर्टाने देशभरातील बैलगाडी शर्यतीवर कायमस्वरूपी बंदीचा निर्णय जाहीर केला.

पक्ष्यांचा मार्ग शोधणार ‘रिंगिंग’द्वारे

$
0
0
वेगवेगळ्या देशातून, राज्यातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमार्फत संसर्गजन्य आजार पसरविले जातात का, सार्वजनिक आरोग्यावर या पक्ष्यांच्या आजारांचा काही परिणाम होतो काय… यासंदर्भात माहिती घेण्यासाठी इला फाउंडेशन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थांनी भिगवणमधील पक्ष्यांना नुकतेच ‘टॅग’ केले.

‘सिंहगडचा घाट’ आता चकाचक

$
0
0
मुसळधार पाऊस असो, कडाक्याची थंडी किंवा कडक ऊन पुणेकरांसाठी नेहमीच हक्काचे ठिकाण ठरणारा सिंहगड आता सर करणे सोपे झाले आहे. सिंहगडाचा घाटरस्ता आता चकाचक झाला आहे.

शाळेसाठीच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह

$
0
0
सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या इंदापूर तालुक्यातील शाळेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारत बांधली आहे. मात्र, त्या इमारतीच्या बांधकामावर सामाजिक न्याय विभागाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, बांधकाम अपूर्ण असतानाही ते हस्तांतरित करण्याचा तगादा बांधकाम विभागाकडून लावला जात असल्याचे म्हटले आहे.

‘जलयुक्त गाव’ अभियानाची कूर्मगती

$
0
0
दुष्काळात होरपळलेल्या गावांत ‘जलयुक्त गाव’ अभियान राबविल्याने उन्हाळा सुसह्य झाल्याचे चित्र पुणे विभागात असताना या अभियानासाठी यंदा सुमारे २०० कोटी रुपये उपलब्ध करूनही पाणी अडविण्याची फारशी कामे सुरू झालेली नाहीत. ‘जलयुक्त गाव’ अभियानातील ही कामे तातडीने सुरू करून हा निधी जूनअखेर खर्च करण्याची सूचना करण्यात आली आहे.

केशरी कार्डधारकांनाही रेशनचे धान्य

$
0
0
अन्नसुरक्षा योजनेच्या पात्रता यादीत आता दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी रंगाच्या रेशनकार्डधारकांचा समावेश करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दराने तूर्त तांदूळ वितरित करण्यात येणार असून या महिन्यापासूनच हे धान्य ‘एपीएल’ कार्डधारकांना मिळणार आहे.

नाट्यगृहांतील गैरसोयींची आता करा वहीत नोंद

$
0
0
नाट्यगृहांतील असुविधांसंदर्भात माहिती घेण्यासाठी महापालिकेतर्फे नाट्यगृहांमध्ये नोंदवही ठेवली जाणार आहे. प्रेक्षकांनी त्या नोंदवहीमध्ये त्यांचा अभिप्राय लिहिल्यास त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, नाट्यनिर्माता संघासह मासिक बैठक घेण्याचाही निर्णय घेण्यात आला.

पुस्तक खरेदीवर डझनभर आंबे मोफत

$
0
0
आंबे आणि पुस्तके यांचा चवीने एकाच वेळी आस्वाद घेण्यासाठी दुर्मिळ संधी साहित्यप्रेमींना मिळणार आहे. साहित्य दरबार या संस्थेने आयोजित केलेल्या शब्दनाद या पुस्तक प्रदर्शनात १५०० रुपयांची पुस्तक खरेदी केल्यावर डझनभर देवगड हापूस आंबे मोफत देण्याची अनोखी योजना राबविण्यात येत आहे.

सिंगल स्क्रीनचे करमणूक शुल्क लवकरच रद्द

$
0
0
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अंशतः शिथिल झाल्यानंतर राज्यातील ग्रामपंचायती आणि लहान शहरांमधील सिंगल स्क्रीन थिएटर्सना करमणूक शुल्कातून संपूर्ण माफी देण्याच्या कामाला पुन्हा गती आली आहे. आचारसंहितेमुळे या कामास ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

केबलचालकांची करचुकवेगिरी रोखणार

$
0
0
केबलचालक करमणूक कर चुकवित असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केबल नियंत्रक कक्षांकडून (एमएसओ) करमणूक कराच्या तिप्पट अनामत रक्कम (सिक्युरिटी डिपॉझिट) घेण्यात येणार आहे. त्यामुळे केबल चालकांकडून करमणूक कर वसुलीची जबाबदारी एमएसओंवर येणार आहे.

आगे हत्याप्रकरणाचा जन-अदालत संस्थेतर्फे निषेध

$
0
0
नगर जिल्ह्यातील नितीन आगे हत्या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी जन-अदालत संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. या हत्येचा निषेध करून महाराष्ट्रात यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी जातीय सलोखा समित्या स्थापन कराव्यात, अशी मागणी संस्थेने केली.

पीएमपी कंडक्टरला मारहाण; प्रवाशाला अटक

$
0
0
चालत्या बसमधून पाठीमागील दरवाजातून उतरणाऱ्या प्रवाशाला जाब विचारल्याच्या कारणावरून त्याने पीएमपी कंडक्टरलाच मारहाण केल्याचा प्रकार पुणे-सातारा रोडवर नातूबाग बसस्टॉपवर घडला. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी प्रवाशाला अटक केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images