Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अकरावी प्रवेशप्रकरणी पालक कोर्टात

$
0
0
गेल्या शैक्षणिक वर्षात अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्तेकडे झालेल्या दुर्लक्षाबाबत पालकांनी मंगळवारी कोर्टाचे दरवाजे ठोठावले.

‘मल्टिप्लेक्स’ना ६८ कोटींचा दणका

$
0
0
करमाफी असताना प्रेक्षकांकडून ६८.६५ कोटी रुपयांचा बेकायदा करमणूक कर आकारणाऱ्या शहरातील सहा मल्टिप्लेक्सला विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दणका दिला आहे.

‘सुपर पेसर’ उद्या पुण्यात

$
0
0
कोण ठरणार ‘सुपर पेसर’… याची उत्सुकता वाढत चालली असून, ‘सुपर पेसर’ मोहिमेंतर्गत बुधवारी कोल्हापुरात, तर गुरुवारी पुण्यात टॅलेंट हंट होणार आहे. देशाला ‘सुपर पेसर’ मिळावा, यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ही मोहीम आखली आहे.

पुण्याच्या मानचिन्हासाठीची लढत अंतिम टप्प्यात

$
0
0
लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नागरिकांमधील कुतूहल वाढत असताना पुण्याच्या ‘मानचिन्हा’चा किताब कोण पटकावणार याकडे प्राणिप्रेमींचे लक्ष लागले आहे. त्याकरिताचे मतदान येत्या १० मेपर्यंत सुरू राहणार असून, पुढील आठवड्यात अधिकृतरीत्या पुणे जिल्ह्यातील विविध गटांतील वीस मानचिन्हे जाहीर होणार आहेत. यासाठी शहरातील सुमारे पंधरा हजार लोकांनी आतापर्यंत मतदान केले आहे.

आंबा विक्रेत्यांकडे होणार तपासणी

$
0
0
आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर करण्यास मनाई असल्याने मार्केट यार्डातील व्यापाऱ्यानंतर आता पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आंबा विक्रेत्यांकडे तपासणी करण्यात येणार आहे. कॅल्शियमयुक्त आंबा आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्याचे धोरण अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आखले आहे.

बनावट कागदपत्रे; तरुणाला अटक

$
0
0
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी नववी पास असल्याचे बनावट मार्कशीट आणि ​शाळेचा दाखला तयार केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. आरटीओ कार्यालयात ही कागदपत्रे सादर केल्यानंतर हा बनाव उघडकीस आला.

शिवाजीनगर कोर्टातील लिफ्ट बदलण्याची मागणी

$
0
0
शिवाजीनगर कोर्टातील नवीन इमारतीतील लिफ्ट अचानक बंद पडत असल्यामुळे कोर्टात येणारे पक्षकार आणि वकील लिफ्टमध्ये अडकून पडण्याच्या घटना सध्या वाढल्या आहेत. लिफ्ट दुरुस्त करण्याची मागणी वारंवार करण्यात येत असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते आहे.

मशिनमध्ये हात अडकल्याने कामगार महिलेचा मृत्यू

$
0
0
पंख्याच्या वाऱ्यामुळे मशिनमध्ये अडकलेला पदर काढण्याच्या प्रयत्नात महिलेचे दोन्ही हात मशिनमध्ये अडकले. मात्र, रक्तस्रावामुळे या कामगार महिलेचा बुधवारी (७ मे) मृत्यू झाला.

मावळ, लोणावळ्यात जोरदार पाऊस

$
0
0
अवेळी आलेल्या जोरदार पावसामुळे मावळासह लोणावळ्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. विद्युत पुरवठा करणारे खांब कोसळल्याने व तारा तुटल्याने रात्री उशिरापर्यंत या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

गंगानगरमध्ये विहिरीत बुडालेल्या युवकाचा शोध सुरू

$
0
0
मित्रांसोबत वि‌िहरीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या युवक बुडाला असून, त्याचा शोध गेल्या दोन दिवसांपासून हडपसर पोलिस व अग्निशामक दलाच्या मदतीने घेतला जात आहे. मात्र, त्याचा शोध लागत नसल्याने बुधवारी सायंकाळी पाणबुडी मागविण्यात आली आहे, अशी माहिती हडपसर पोलिसांनी दिली.

कोसळलेल्या भिंतीमुळे अपघाताला निमंत्रण

$
0
0
कात्रज चौकातील सावंत कॉर्नरसमोरील बीआरटी थांब्यालगतची कोसळलेली भिंत प्रवाशांसाठी धोकादायक आहे. याच ठिकाणापासून जवळच धनकवडी सहायुक्त कार्यालय असूनही, याकडे होणारे दुर्लक्ष अपघाताला निमंत्रण देत आहे.

मराठीच्या संवर्धनाकडे महापालिकेचे दुर्लक्ष

$
0
0
मोठा गाजावाजा करून महापालिकेने स्थापन केलेल्या मराठी भाषा संवर्धन समितीने केलेल्या ठरावांची अंमलबजावणी महापालिकेकडून होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या समितीच्या माध्यमातून भाषेचे संवर्धन साधणार कसे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

सोनसाखळीचोर इराणी टोळीला अटक

$
0
0
गुन्हे शाखेच्या युनिट तीनने सोनसाखळी हिसकावणाऱ्या आणखी एका इराणी टोळीला अटक केली असून, त्यांच्याकडून २१ लाख रुपये किमतीचे सुमारे साडेसहाशे ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या टोळीने शहरात सोनसाखळी हिसकावण्याचे २२ गुन्हे केले असल्याचे उघड झाले आहे.

‘बैलगाडा शर्यतबंदीच्या विरोधात चळवळ उभारणार’

$
0
0
बैलगाडा शर्यतबंदीच्या विरोधात चळवळ उभारण्याचा निर्धार राजकीय नेतेमंडळींसह ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. तसेच, जनावरांचा छळ करणाऱ्या काही मोजक्याच घटकांमुळे संपूर्ण शर्यतीला बदनाम करणे गैर असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

ढगांच्या पांघरुणाने उन्हापासून वाचवले

$
0
0
मंगळवारी तापमानाने पुन्हा चाळिशी गाठल्यानंतर बुधवारी मात्र तापमानात घट झाली आणि शहराच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. शहरात फारसा पाऊस झाला नसला, तरी लोहगाव येथे मात्र सात मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

साहित्य वाटपासाठीही ‘वाईवरून कोल्हापूर’

$
0
0
मतदारयाद्यांचा कागद, डीटीपी व छपाईसाठी द्राविडी प्राणायाम करणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची साहित्यखरेदी आणि त्याच्या वाटपासाठी संपूर्ण यंत्रणेला वेठीस धरल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज मेडिकलची सीईटी

$
0
0
मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाकरिता होणाऱ्या राज्याच्या ‘एमएच-सीईटी’साठी तब्बल एक लाख ५३ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा आज (गुरुवारी) होणार आहे.

अल्पसंख्याक अनुदानित शाळांनाही ‘आरटीई’ प्रवेशातून सूट

$
0
0
सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या एका निकालानुसार आता अल्पसंख्याक अनुदानित शाळांनाही शिक्षणहक्क कायद्यातील २५ टक्के आरक्षणाच्या तरतुदीतून सूट मिळाली आहे. अल्पसंख्याक विनाअनुदानित शाळांना या तरतुदीतून सूट देण्यापाठोपाठ अल्पसंख्याक अनुदानित शाळांनाही सूट दिल्याने, शहरातील जवळपास १५ हून अधिक अल्पसंख्याक अनुदानित शाळांमध्ये पूर्णपणे स्वतंत्र प्रवेशप्रक्रिया शक्य होणार आहे.

कला संचालनालय देणार अधिकृत माहिती

$
0
0
अकरावीच्या केंद्रीय प्रवेशांसाठी कला संचालनालयाकडून प्रमाणपत्रे मिळविण्यात विद्यार्थ्यांना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी संचालनालयाकडील अधिकृत माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीला उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

पुण्यात कोण ठरणार तेजतर्रार?

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’च्या सुपर पेसर मोहिमेंतर्गत नागपुरात झालेल्या टॅलेंट हंटमध्ये रोनितसिंहने ताशी १३३ किमी वेगाने चेंडू टाकला... कोल्हापुरात अजित मुकुंद बागडीने ताशी १२७ किमी वेगाने चेंडू टाकला... आता गुरुवारी पुण्यात किती वेगाने चेंडू पडणार आणि कोण सर्वांत तेजतर्रार ठरणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोचली आहे. डेक्कन जिमखाना क्लबच्या मैदानावर हे टॅलेंट हंट होणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images