Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मार्केट यार्डातील वाहतूक बेशिस्त

$
0
0
मुख्य प्रवेशद्वारावरच लागलेल्या ट्रकच्या रांगा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी असलेली वाहने, वाहनांची बाहेर पडण्यासाठी सुरू असणारी घाई आणि त्यामधून वाट शोधणारे ग्राहक, मार्केट यार्डमधील मुख्य बाजारपेठेत कायम दिसणाऱ्या या परिस्थितीचा सामना करत व्यापारी आणि ग्राहकांना दररोज हाल सहन करावे लागत आहेत.

तीन वर्षांच्या बालिकेवर बलात्कार

$
0
0
घरामध्ये खेळत असलेल्या तीन वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करणाऱ्या नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. भरत बलभीम थोरात (वय ५२, रा. लक्ष्मीनगर गल्ली क्रमांक पाच, पिंपळे गुरव) असे आरोपीचे नाव आहे.

बंडखोर जगताप समर्थकांना बक्षिसी

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांना कारवाईऐवजी पदांची बक्षिसी दिली आहे. त्यामुळे निष्ठावंतांना जोरदार धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी बंडखोरांचीच पाठराखण करतात, अशी कुजबूज चालू आहे.

नाल्यांच्या सफाईला सुरुवात

$
0
0
पावसाळ्यात धांदल उडू नये म्हणून पुणे कँटोन्मेंट बोर्डाने आतापासूनच नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. बोर्डाच्या हद्दीत असलेल्या माणिक नाला आणि फिलिप्स नाल्याच्या दुरुस्तीचेही काम करण्यात येत आहे.

औषध पुरवठा अडचणीवर बोर्डाचा तोडगा

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना मोफत औषधांचा पुरवठा करण्यासाठी बोर्डाकडून खासगी मेडिकल स्टोअरमार्फत औषध खरेदी करण्यात येणार आहे. बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये औषधांचे दुकान नसल्याने, कर्मचाऱ्यांना औषधांचा पुरवठा करण्यात अडचण निर्माण होते.

अकरा वर्षाच्या मुलीचा विनयभंग

$
0
0
कॅम्पमधील ताबूत स्ट्रिटवरील फुटपाथवर झोपलेल्या अकरा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. घटनेच्यावेळी दुचाकीसोडून पळून गेलेला आरोपी दुचाकी नेण्यास आला असताना पीडित मुलीच्या वडिलांनी तसेच इतरांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

‘अंकुर’ शोधणार मतदारांच्या समस्या

$
0
0
मतदारयादीतून नाव वगळल्या गेलेल्या मतदारांच्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी अंकुर प्रतिष्ठान या संस्थेने पुढाकार घेतला आहे. प्रतिष्ठानने महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने (१ मे) आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये दुपारी २.३० ते सायंकाळी ७.३० या वेळेत नावे वगळल्या गेलेल्या मतदारांच्या माहितीचे संकलन करण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. तसेच, माहिती अधिकाराच्या माध्यमातून या प्रकरणाची माहिती मिळवून हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे.

बलात्कारप्रकरणातील आरोपीची आत्महत्या

$
0
0
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीने सोमवारी दुपारी राहत्या घरी आत्महत्या केल्याने येरवडा परिसरात तणाव निर्माण झाला होता. सुरज उर्फ घोड्या सुग्रीव घोडेस्वार असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, बलात्कार झालेल्या पीडित मुलीच्या भावाने सुरजला धमकाविल्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

‘चराऊ कुरणे’ बनूनही शिक्षण मंडळाला अभय

$
0
0
आपापल्या समर्थकांचे पुनर्वसन करण्याच्या अट्टहासापायी महापालिकांची शिक्षण मंडळे बरखास्तीच्या मार्गात सर्वच राजकीय पक्षांनी खोडा घातला आहे. त्यामुळेच शिक्षण मंडळांमध्ये एकापाठोपाठ एक अशा गैरव्यवहारांची मालिका उघडकीस येत आहे. तरीही, शिक्षण मंडळे बरखास्त करण्याच्या राज्य सरकारच्याच निर्णयावर दादा-बाबा गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीत.

गायब मतदारांत ‘स्थलांतरित’ सर्वाधिक

$
0
0
घर बदलल्यानंतरही जुन्या पत्यावरच मतदारयादील नाव कायम ठेवण्याचा आग्रह यादीतूनच नाव गायब होण्याचे सर्वात मोठे कारण ठरले आहे. जिल्हा प्रशासनाकडे दाखल झालेल्या तक्रारींचा शोध घेतल्यानंतर सर्वाधिक, म्हणजे जवळपास ४० टक्के गायब मतदार हे स्थलांतरित असल्याचे समोर आले आहे.

ठेकेदारांच्या खिशात दरमहा १५०००

$
0
0
पाणीपट्टी भरणे, महापालिकेकडून मिळणारे वेगवेगळे दाखले, रिझर्व्हेशन्स, इन्शुरन्स... अशा अनेक सुविधा बहुउद्देशिय नागरी सुविधा केंद्रांच्या किऑक्समधून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याची स्वप्ने दाखविल्यानंतर प्रत्यक्षात हे किऑक्स फक्त मिळकतकर भरण्यापुरतीच उरली आहेत.

रुळ ओलांडणा-यांकडून ६ लाख वसूल

$
0
0
अनाधिकृतपणे रेल्वेमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याची मो​हीम रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात रेल्वे प्रशासनाने पाच हजार ९११ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी नऊ जणांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे.

घोळ दुबार मतदारांचा

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाने निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा मतदार नोंदणी मोहीम सुरू केली असताना, बोर्डासमोर दुबार नावांची समस्या निर्माण झाली आहे. अनेक मतदारांची नावे दुबार असल्याचे निदर्शनास आल्याने यादी अद्ययावत करण्यात येणार आहे.

लाभार्थींची कामे लागणार मार्गी

$
0
0
गेल्या दीड महिन्यांपेक्षा अधिक काळ लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात सापडल्याने प्रलंबित राहिलेले निर्णय घेण्यासाठी पालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे दहावी-बारावी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप, शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप आणि विकास आराखड्यावरील (डीपी) हरकती-सूचनांच्या सुनावणीची प्रक्रिया मार्गी लागू शकणार आहे.

मतदार ओळखपत्रे कचऱ्यात

$
0
0
मतदार ओळखपत्रे आणि रेशनकार्डांचे गठ्ठे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कचऱ्यात पडून असल्याचे सोमवारी आढळून आले. मतदारयादीतील गोंधळ आणि अनेक नागरिकांना मतदार ओळखपत्रे न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर हे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

कुंड्या महाग झाल्याच कशा?

$
0
0
शिक्षण मंडळातील शाळांमध्ये झालेल्या कुंड्या खरेदीमधील गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंडळाचे अध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन केले. शिक्षण मंडळावर कुंडी मोर्चा काढत अध्यक्षांच्या धिक्काराच्या घोषणा देत शिक्षण मंडळाच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले.

साहित्यांसाठी ५० लाख जादा

$
0
0
सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहणाऱ्या महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या खरेदीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. बाजारभावापेक्षा कमी दरात मिळत असलेल्या वह्या, कंपास तसेच रंगाच्या पेटीसाठी तब्बल ३० टक्के जादा दर देत तब्बल ५० लाख रुपये जादा मोजण्याची तयारी शिक्षण मंडळाने केली आहे.

फेसबुक मैत्रीचा शेवट बलात्कार

$
0
0
फेसबुकवर झालेल्या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. लग्नाच्या आणाभाका घेतल्यानंतर बलात्कार केला आणि तसेच लग्न न करता फसवणूक केल्याची तक्रार एका २९ वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

‘पीएफ’च्या तक्रारींचे १५ दिवसांत निवारण

$
0
0
प्रॉव्हिडंट फंडबाबत (पीएफ) कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारींचे १५ दिवसांमध्ये निवारण करण्याचे आदेश एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या (ईपीएफओ) मुख्यालयाने सर्व विभागीय कार्यालयांना दिले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात एक लाख ९४ हजार ३७१ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

३ महिन्यांत विमानतळ होणार चकाचक

$
0
0
‘लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणातील धावपट्टीचे काम पूर्ण झाले आहे. इन्स्ट्रूमेंट्स लँडिग सिस्टीमसह उर्वरित कामे येत्या दोन ते तीन महिन्यांत पूर्ण केली जातील,’ अशी माहिती टाटा पॉवर कंपनीचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी कमांडर जी. के. जेटली यांनी दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images