Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हॉटेलवर छापा; ५२ जणांना अटक

$
0
0
विमाननगर येथील ‘धुवा-द कबाब हट’ या हॉटेलवर रविवारी पहाटे छापा घालत भोसरी पोलिसांनी ५२ जणांना अटक केली. त्यात नऊ तरुणींचा समावेश आहे. या ठिकाणाहून दारू, हुक्का तसेच सिगारेटचा साठाही पोलिसांनी जप्त केला. कोर्टाने अटक केलेल्या तरुण-तरुणींसह हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची जामिनावर सुटका केली.

बारावीला ‘एक देश, एक पॅटर्न’

$
0
0
बारावीच्या विज्ञान आणि गणिताच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप देशभरात एकसमान करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले आहेत. अभ्यासक्रम आणि परीक्षा या दोन्ही पातळ्यांवर एकसूत्रता आणण्यासाठी हा प्रयोग करण्याचा विचार सुरू आहे.

दहशतवाद्यांचे ‘टार्गेट मोदी’

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर दहशतवादी हल्ला करण्यासाठी इंडियन मुजाहिदीन (आयएम) आणि ‘स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनांचे देशभरातील ३० ‘स्लिपर सेल’ सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

पुण्यात १३४० नावेच गायबः वकील

$
0
0
पुणे लोकसभा मतदार संघातील एक लाख नव्हे तर केवळ १३४० मतदारांचीच नावे गायब असल्याचा दावा सोमवारी सरकारतर्फे हायकोर्टात करण्यात आला.पुण्यातील प्रताप गायकवाड यांनी जनहित याचिका केली असून त्याची न्या. नरेश पाटील व न्या. अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

उकाड्याने पुणेकर हैराण

$
0
0
दिवसभराच्या कडक उन्हामुळे पुण्याची अवस्था जणू तप्त भट्टीसारखी झाली आहे. अंगाला बसणारे चटके आणि गरम हवेच्या झोतांमुळे पुणेकर अक्षरशः भाजून निघत आहेत. परिणामी हा तीव्र उन्हाळा पुणेकरांसाठी ‘ताप’ दायक ठरत आहे. दरम्यान, अवघ्या एका दिवसाच्या खंडानंतर सोमवारी पुण्यातला पारा पुन्हा ४० अंशांवर पोहोचला असून, पुढील चार दिवस पारा ४० अंशांच्या आसपासच राहण्याची शक्यता आहे.

आता कारवाई ‘हार्डरॉक’वर

$
0
0
शहरात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले असून संबंधित हॉटेलांवर कारवाई करण्यात येत आहे. विमाननगर येथे सॅटरडे नाईटला झालेल्या कारवाईनंतर गुन्हे शाखेने संडे नाइटला हार्डरॉक या हॉटेलवर कारवाई केली. या हॉटेलमध्ये १२ परदेशी नागरिक, १४ महिलांसह ५६ ग्राहक ‘एन्जॉय’ करत होते.

जनावरांना सन्मानाची वागणूक द्या

$
0
0
‘ग्रामीण भागातील शेतीला पूरक म्हणून पाळले जाणारे प्राणी असोत किंवा शहरातील भटकी जनावरे, त्यांच्या प्रती क्रूर पावले उचलणे अयोग्य आहे. प्राण्यांना सन्मानाची वागणूक देणे आपला सांस्कृतिक वारसा आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांबरोबरच नागरिकांचाही दृष्टीकोन बदलला पाहिजे, असे मत केंद्रीय पशुसंवर्धन महामंडळाचे अध्यक्ष मेजर जनरल (निवृत्त) डॉ. आर. एल. खरब यांनी व्यक्त केले.

बंदी असूनही ‘ई-सिगारेट’चा धूर

$
0
0
आरोग्यास हानिकारक असलेल्या तंबाखूजन्य सिगारेटला पर्याय म्हणून निकोटिनच्या ई-सिगारेटचे मार्केटिंग केले जात असले, तरी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) त्यावर बंदी घातली आहे. मात्र, या ई-सिगारेटचा धूर पुण्यासह इतर महानगरांमध्ये सर्रास काढला जात आहे.

३० एप्रिलपासून फुटबॉल टॅलेंट हंट

$
0
0
लिव्हरपूल फुटबॉल क्लब (एलएफसी) इंटरनॅशनल फुटबॉल अॅकॅडमी-डीएसके शिवाजीयन्सतर्फे ३० एप्रिलपासून ‘टॅलेंट हंट’चे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील लोणीमधील डीएसके इंटरनॅशनल कॅम्पसमध्ये ही चाचणी होणार आहे.

विद्यार्थ्यांचा विमा सक्तीचा करावा

$
0
0
विद्यार्थ्यांच्या हितासाठी गेली दहा वर्षे सिम्बायोसिसच्या विद्यार्थ्यांचा विमा काढण्यात येतो. आतापर्यंत ही योजना उपयुक्त ठरल्याने राष्ट्रीय स्तरावर हे मॉडेल राबविण्यासाठी देशभरातील शिक्षण संस्थांमध्ये ‘केजी टू पीजी’पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा विमा सक्तीचा करण्यात यावा, असा प्रस्ताव ‘सिम्बायोसिस’कडून विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे (आयआरडीए) सादर करण्यात येणार आहे.

इलेक्ट्रिक वहाने काळाची गरज

$
0
0
स्वच्छ पर्यावरणासाठी देशातील रस्त्यांवर पुढील वीस वर्षांमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहने धावती करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ अणुऊर्जा शास्त्रज्ञ व अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी सोमवारी केले.

तीस हजार लिटर भेसळयुक्त दूध जप्त

$
0
0
अन्नसुरक्षा मानदे कायद्याच्या अंमलबजावणीनंतर पुणे विभागातून गेल्या दोन वर्षात सुमारे ३० हजार लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केली.

रस्त्यांवर पुन्हा खोदकाम सुरु

$
0
0
पुणेकरांच्या हि‌तासाठी यापुढील काळात शहरातील कोणत्याही रस्त्यांवर खोदाईसाठी परवानगी दिली जाणार नाही, अशी घोषणा करून काही तास झाले नाही तोच पौड फाट्याजवळ तसेच एसएनडीटी चौकात रस्ते खोदण्यास नव्याने सुरूवात झाल्याचे समोर आले आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केलेल्या घोषणेचा विसर महापालिकेला पडला असून या दोन्ही रस्त्यांवर अगदी बिनधास्तपणे खोदकाम सुरू असल्याची तक्रार या भागातील नागरिकांनी केली आहे.

उन्हाळ्याच्या सुटीचे खिशाला सटके

$
0
0
उन्हाळ्याच्या सुटीमध्ये बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना खासगी बसने प्रवास करताना जादा पैसे मोजावे लागणार आहे. खासगी ट्रॅव्हल ऑपरेटर्सनी सुटीमुळे भाड्याच्या रकमेत ४०० ते ६०० रुपयांची वाढ केली आहे.

स्वयंसेवी संस्थांना व्यवस्थापनाचे धडे

$
0
0
‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’अंतर्गत (सीएसआर) मोठ्या संख्येने उपलब्ध होणाऱ्या निधीतून गैरव्यवहाराची बिजी रोवली जाऊ नयेत, यासाठी स्वयंसेवी संस्थांचा कारभार पारदर्शक करण्यासाठी आता पावले उचलण्यात येत आहेत. त्यासाठी या संस्थांसाठी विशेष व्यवस्थापन अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून विद्येच्या माहेरघरात तो सुरूही करण्यात आला आहे.

आम्हाला घरी कधी नेणार?

$
0
0
‘मला हॉस्पिटलमध्ये अजिबात करमत नाही, पण काय करणार? नवऱ्याचे देहावसन झाले आहे. एक मुलगा, एक मुलगी आहे. पण तेसुद्धा चार वर्षांपासून भेटायला आलेले नाहीत. दीर आहेत, पण तेदेखील मला घेण्यासाठी येत नाहीत...’ ही कथा आहे मनोविकारातून बऱ्या झालेल्या रेखा (नाव बदलले आहे) यांची.

खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण

$
0
0
वाढत्या नागरीकरणामुळे देण्यात आलेले भरमसाठ नवीन वीज जोड, मागणी आणि पुरवठ्यातील तफावत, भूमिगत वीजवाहिनीतील दोष निवारण करणाऱ्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव आणि भूमिगत वीजवाहिनीतील दोष शोधणाऱ्या अपुऱ्या यंत्रणेमुळे कात्रजमध्ये वीजपुरवठा खंडित होत आहे.

ग​िरबांची फसवणूक

$
0
0
बनावट गृहनिर्माण संस्था स्थापन करून त्याद्वारे दलित समाजातील लोकांना जागा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी त्यास मंगळवार, २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पावसाळी चेंबरची जाळी तुटली

$
0
0
सातारा रस्ता बीआरटी मार्गावरील अहिल्यादेवी चौकातील काकडे ज्वेलर्ससमोरील नागरी मार्गातील पावसाळी वाहिनीच्या मोठ्या चेंबरच्या झाकणाची जाळी तुटल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. वाहतुकीने ओसांडून वाहणाऱ्या या मार्गातील तुटलेल्या झाकणाची दुरुस्ती तत्काळ व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे.

सोनसाखळ्या चोरांचे आव्हान

$
0
0
गेल्या काही वर्षांत पुण्याचा झपाट्याने विकास झाला. गगनचुंबी इमारती उभ्या राहत असताना सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सक्षम पोलिस दल विकसित करण्याचे मोठे आव्हान आहे. त्याचबरोबर उपनगरांमधील पोलिस ठाणी, चौक्यांनाही पुरेसे व सक्षम मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे. याच परिस्थितीचा वेध घेणारे ‘मटा’चे हे खास सुरक्षाविषयक साप्ताहिक सदर.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>