Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

जंगली महाराज, र्फग्युसन रस्ता दुहेरी करा ?

$
0
0
जंगली महाराज, र्फग्युसन रस्ता एकेरी केल्याने हॉटेल व्यावसायिकांनाच त्याचा फायदा होत आहे. हे रस्ते दुहेरी करण्याबाबत विचार होणे गरजेचे आहे, अशी सूचनाच पोलिस उपायुक्त मकरंद रानडे यांनी क्राईम मिटिंगमध्ये केली.

शाळा सुटली... कायमची!

$
0
0
मार्च २०१२ मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा शुक्रवारी शेवटचा वर्ग भरला! दहा वर्ष ज्या शाळेने बोटाला धरून मोठे केले त्याच शाळेतून दहावीची मार्कलिस्ट आणि शाळा सोडल्याचा दाखला घेताना मुलांनी 'सेंटी' होऊनच शाळेचा निरोप घेतला.

शक्यता पण हलक्या सरींची...

$
0
0
आतुरतेने वाट पाहणा-या पुणेकरांना पावसाने शनिवारीदेखील फसवले. सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण असल्याने आज पाऊस पडणार असे वाटत होते, पण दुपारनंतर स्वच्छ हवा अनुभवायला मिळाली.

सोनोग्राफी मशीन सील

$
0
0
बाळीवेस येथील डॉ. अजित उपासे यांच्या हॉस्पिटलमधील सोनोग्राफी रूम आणि मशीन सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी शहाजी गायकवाड यांनी शनिवारी सील केली.

भुशी डॅममध्ये विद्यार्थी वाहून गेला

$
0
0
लोणावळ्यातील भुशी डॅमजवळील धबधब्याच्या वाहत्या पाण्यात वाहून गेलेला एक महाविद्यालयीन युवक भुशी डॅममध्ये बुडाल्याची भीती आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याच ठिकाणी (१९ जुलैला) चार महाविद्यालयीन विद्यार्थी वाहून गेले होते. त्यात एका युवतीचा बुडून मृत्यू झाला होता.

पाण्यामागे कॅमेरे

$
0
0
पावसाळ्यात घरांमध्ये पाणी घुसणे, झाडे उन्मळून कोसळल्याने वाहतुकीची कोंडी होणे, या प्रकारांवर नजर ठेवण्यासाठी तसेच आपत्कालीन घटना घडल्यास ताबडतोब मदत मिळण्यासाठी शहरात विविध ठिकाणी २२ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी १८ कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत.

धरणांत धुवांधार...

$
0
0
खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोटात होत असलेल्या धुव्वाँधार पावसाने पाणीसाठ्यात चोवीस तासांत २.१३ टीएमसीने वाढ झाली. हे पाणी पुणे शहराला दोन महिने पुरेल एवढे आहे. खडकवासला प्रकल्पाचा पाणीसाठा आता दहा टीएमसीवर पोहोचला आहे.

पुणे ग्रामीण अधीक्षकपदी मनोज लोहियांची नियुक्ती

$
0
0
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी मुंबई येथे कार्यरत असलेले मनोज लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोहिया यांच्या नियुक्तीचा आदेश पुणे ग्रामीणच्या नियंत्रण कक्षात येऊन धडकल्याने बदलीच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.

एसटी स्थानकांसमोर ‘रास्ता रोको’चा इशारा

$
0
0
राज्यातील प्रत्येक एसटी बसस्थानकाजवळ खासगी वाहतूक व्यवसायाचे प्रमाण वाढले आहे. एसटीच्या अधिकार्यांच्या सहकार्याने हे सुरू आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी येत्या एक सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा मानवी हक्क सुरक्षा महासंघाने दिला आहे. या वेळी एसटी स्टँडसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पालिकेकडून आर्थिक मदत

$
0
0
पुणे महापालिकेच्या वतीने दहावी आणि बारावीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात येणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांनी येत्या तीस ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अतिरिक्त ५.५ लाख हेक्टर क्षेत्र रब्बीला मिळणार

$
0
0
पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे पुणे विभागातील खरिपाचा हंगाम हातातून गेला असला तरी त्याच्या उर्वरीत क्षेत्रापैकी सुमारे पाच लाख साठ हजार हेक्टर एवढे क्षेत्र रब्बी हंगामासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यंदा रब्बीच्या पिकांकडून मोठ्या आशा व्यक्त होत आहेत.

बॅग हरवल्याची नुकसानभरपाई द्या

$
0
0
विमानातून प्रवास करणा-या प्रवाशाच्या लगेजमधील एक बॅग गहाळ झाल्याप्रकरणी किंगफिशर एअरलाइन्सला संबंधित प्रवाशाला बॅगेची नुकसानभरपाई म्हणून १३५० रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून एक हजार रुपये देण्याचा आदेश ग्राहक न्याय मंचाने नुकताच दिला आहे. नियमानुसार हरवलेल्या सामानासाठी प्रतिकिलो ४५० रुपये दिले जातात.

बाणेर, पाषाण, औंधमध्ये 'लेट नाइट' हॉटेलांना दणका

$
0
0
बाणेर, पाषाण, औंध, डीपी रोड परिसरात रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करणार्या हॉटेल; तसेच इतर व्यावसायिकांना चतुशृंगी पोलिसांनी हिसका दाखवला आहे. तब्बल १०७ व्यावसायिकांच्या विरोधात कारवाई करून सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

'टीडीआर देण्याच्या प्रक्रियेस कालमर्यादेचे बंधन घालावे'

$
0
0
आरक्षणाच्या जागांपोटी देण्यात येणारा एफएसआय किंवा टीडीआर देण्याच्या प्रक्रियेस कालमर्यादेचे बंधन घालण्यात यावे, अशी मागणी नागरी हक्क समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अशा प्रकारे मोबदला देण्याची प्रक्रिया अत्यंत संथगतीने आणि दिरंगाईने सुरू असल्याची तक्रार संघटनेचे अध्यक्ष काका कुलकर्णी यांनी केली आहे.

अपघातात सहाजण जखमी

$
0
0
पुणे मुंबई हायवेवर पिंपरी येथे रस्त्यावर थांबलेल्या टेम्पोला सुमो जीपने मागून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात सहाजण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

पुण्याची जैवविविधता चार वर्षे 'कॉपी पेस्ट'

$
0
0
महापालिकेच्या पर्यावरण अहवालात पुण्यातील जैवविविधतेचे भरभरून कौतुक करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात मात्र शहरातील जीवसृष्टीचे दिलेले बहुतेक सर्व संदर्भ तब्बल बारा वर्षांपूर्वीचे आहेत. गेल्या चार वर्षांपासून तर पर्यावरणातील जैवविविधतेचा भाग ‘कॉपी पेस्ट’च होतो आहे.

इन्कम टॅक्स रिटर्न भरा ३१ ऑगस्टपर्यंत

$
0
0
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली असल्याचे इन्कम टॅक्स विभागाने मंगळवारी जाहीर केले. यामुळे काही कोटी करदात्यांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वीची मुदत मंगळवारी ३१ जुलैला संपणार होती. ऑनलाइन रिटर्न भरण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचेही इन्कम टॅक्स अधिका-यांनी सांगितले.

फुगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा

$
0
0
बोगस जात प्रमाणपत्र दाखवून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सीमा फुगे यांनी दिशाभूल केली असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे पत्र राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी मंगळवारी घेतला.

कारवाईपायी विकासाकडे दुर्लक्ष नको

$
0
0
शहरातील अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या मोहिमेपायी अन्य विकासकामांकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये, अशी सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी मंगळवारी केली. संथ विकासकामांना गती देण्यासाठी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी कडक पावले उचलावीत, असा आग्रह धरण्यात आला.

'मल्टिप्लेक्स'ची कागदपत्रे ताब्यात

$
0
0
शहरातील मल्टिप्लेक्स थिएटरना करमाफी दिली असताना त्यांनी प्रेक्षकांकडून आकारलेल्या करमणूक कर व सेवाशुल्काची तपासणी करण्यासाठी थिएटरची करविषयक कागदपत्रे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मंगळवारी दिली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images