Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्रचार झाला करुनि… नागरिक मात्र ‘कोरडा’!

$
0
0
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भामा नदीकाठी असलेल्या विऱ्हाम गावामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना नाईलाजास्तव अशुद्ध पिवळट व हिरवट पाणी प्यावे लागत आहे. गेल्या महिन्यापासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून टँकरने या गावाला पिण्याचे पाणी पुरविले जात आहे.

इमारतीमधून पार्किंगची उंची वगळणार

$
0
0
शहरामध्ये पार्किंगसाठी बांधण्यात आलेल्या मजल्यांची उंची इमारतीच्या उंचीत न मोजण्यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे, शहरातील दोन मजल्यांपर्यंतचे पार्किंग आता इमारतीच्या उंचीच्या बंधनातून मुक्त होऊ शकणार असून, पार्किंगसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होऊ शकेल.

जुन्नर तालुक्यात दुर्गसंवर्धनाचे रोल मॉडेल

$
0
0
विविध सामाजिक संस्थांचा पाठपुरावा असेल आणि शासकीय यंत्रणांचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तर दुर्गसंवर्धनाचे काम अत्यंत प्रभावीपणे होऊ शकते. याचा प्रत्यय अनुभवायचा असेल तर जुन्नर तालुक्याचे नाव अग्रक्रमाने पुढे येते.

आगीत वीस झोपड्या जळून खाक

$
0
0
कोंढवा बुद्रुक येथील फरांदेनगर येथील बांधकाम कंपन्यांसाठी काम करणाऱ्या कामगारांच्या वसाहतीला सकाळी आग लागल्याची घटना घड़ली. या आगीत कामगारांच्या पत्र्याच्या वीस झोपड्या जळून खाक झाल्या. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.

घरी जायला सांगणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार

$
0
0
रात्री उशीरापर्यंत रस्त्यावर बोलत थांबलेल्या तरुणांना घरी जायला सांगणाऱ्यावर कोयत्याने वार करून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या तिघा तरुणांना खडक पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.

पालेभाज्या महागल्या, फळबाज्या स्थिर

$
0
0
उन्हाची काहिली वाढू लागल्यामुळे पालेभाज्या महाग झाल्या आहेत. किरकोळ बाजारपेठेत कोथिंबीर, मेथीच्या जुडीचा दर १५ ते २० रुपयांपर्यंत गेला असून अन्य पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे.

आंबा पिकविण्यासाठी ‘कार्बाईड’ वापरल्यास कारवाई

$
0
0
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, देवगड येथून पुण्यात येणारा कच्चा आंबा कृत्रिमरित्या पिकविण्यासाठी कॅल्शिअम कार्बाईडचा वापर केल्यास संबंधित विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाने (एफडीए) दिला आहे.

शहरात पाणीकपातीचे नियोजन

$
0
0
पाणीपुरवठ्याबाबतच्या तक्रारी वाढल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत सोमवारपासून (२१ एप्रिल) निम्म्या शहराचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस सायंकाळी बंद करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया लांबणार?

$
0
0
अखिल भारतीय कोट्यातील १५ टक्के प्रवेश जुलैच्या दुसऱ्या आठवड्याशिवाय होणे शक्य नसल्याने इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया यंदा लांबण्याचीच शक्यता जास्त आहे. ‘जेईई-मेन’ची अखिल भारतीय गुणवत्ता यादी ७ जुलैला जाहीर होणार असल्याने हा उशीर होणार आहे.

वीस हजार विद्यार्थ्यांनी दिली फार्मसीची एमटी-सीईटी

$
0
0
फार्मसी अभ्यासक्रमाच्या राज्याच्या प्रवेश परीक्षेला रविवारी सुमारे २० हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. ही परीक्षा यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे.

‘आरटीई’ला विरोध करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे

$
0
0
शिक्षण हक्क कायद्यातील २५ टक्के आरक्षणाला विरोध करणाऱ्या शाळा आणि शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच राज्यातील गरजू विद्यार्थी आपल्या हक्काच्या आरक्षणापासून वंचित राहत असल्याचा आरोप शिक्षण हक्क मंचाने केला आहे.

राजाभाऊंच्या आठवणींना मिळाला उजाळा

$
0
0
पुण्यात राजभाऊ परांजपे यांच्याशी रेसकोर्सवर झालेल्या पहिल्या भेटी दरम्यान घडलेले किस्से, सिनेमात काम करायचे ठरल्यावर घरातून आलेला सूर, चित्रपटात काम करताना आलेले अनुभव, अशा अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

फॅमिली डॉक्टरवरचा विश्वास टिकून...

$
0
0
डॉक्टर तुमचा हसरा चेहरा, योग्य निदान आणि घरच्यांसारखी वागणूक हेच आमचे टॉनिक आहे... तुमच्यामुळेच स्पेशलाईज्ड डॉक्टरांच्या जमान्यात आमचा फॅमिली डॉक्टरांवरचा विश्वास टिकून आहे... अशा शब्दात ज्येष्ठ पेशंट्सनी गुजरातीतून दिलेले आशीर्वाद...

रक्ताचा एक थेंब... दाभोलकरांसाठी

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आठ महिने पूर्ण होत असताना त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना त्यांचा लढाही पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. निमित्त होते बालगंधर्व पुलावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे.

अजित पवारांचा गावकऱ्यांवर दबाव

$
0
0
मते दिली नाहीत, तर गावाला पाणी न देण्याची धमकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर आता पवार यांच्याकडून गावकऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप या मतदारसंघातील ‘आप’चे उमेदवार माजी पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केला आहे.

कारवाईचे धाडस होणार का?

$
0
0
मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार अॅड. राहुल नार्वेकर यांच्याविरोधात काम करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांवर कारवाईचे धाडस होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पुण्यात मेघगर्जनेसह पाऊस

$
0
0
सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर दुपारी शहराच्या काही भागात ढगांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रोड, कात्रज-बिववेवाडी अशा शहराच्या उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली.

बेकायदा बांधकामे रोखण्यास स्वतंत्र पोलिस यंत्रणा

$
0
0
शहरातील विविध भागात होणारी बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या वतीने स्वतंत्र पोलिस यंत्रणा तयार केली जाणार आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार करावी, असे आदेश राज्य सरकारने दिले होते.

मतदानप्रक्रियेतील अधिकारी मतदानापासून वंचित

$
0
0
मतदारयादीतून नाव गायब झाल्याने मतदानापासून वंचित राहिलेल्या सर्वसामान्य मतदारांपाठोपाठ निवडणूक प्रक्रियेत‌सहभागी झालेले हजारो कर्मचारी, अधिकारी देखील मतदानापासून वंचित राहणार आहेत.

कंपन्यांच्या हलगर्जीपणाने कचऱ्याचे ढीग प्रक्रियेविनाच

$
0
0
शहरातील कचरा प्रश्न गंभीर होत असून कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांची क्षमताही कमी होत चालली आहे. कचऱ्यावर प्रकिया करणाऱ्या कंपन्यांनी आपली क्षमता वाढवावी, यासाठी महापालिकेने संबधित कंपन्यांना नोटिसा बजाविल्या आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images