Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मतदानानंतरही उमेदवारांचा ‘ओव्हरटाइम’

$
0
0
प्रचाराची सांगता आणि त्यानंतर मतदानाचा दिवस संपला, की उमेदवाराला उसंत घेण्याची संधी मिळते; पण यंदा मतदान होऊन २४ तास उलटून गेले, तरी पुण्यातील उमेदवारांचा ‘ओव्हरटाइम’ सुरू आहे.

बारामतीतही वाढला टक्का

$
0
0
बारामती लोकसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी ५९.४१ टक्के झाली असून, सर्वाधिक मतदान बारामतीत आणि सर्वांत कमी खडकवासला विधानसभा मतदार संघामध्ये झाले आहे. त्यामुळे बारामतीचा निकाल या दोन्ही भागातील मतांवर अवलंबून राहणार आहे.

देशातील १५ पक्ष्यांवर गंडांतर

$
0
0
मानवी अतिक्रमणामुळे नष्ट होत असलेले नैसर्गिक अधिवास, शिकारी आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे भारतातील पंधरा पक्षी ‘डेंजर झोन’मध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सहा पक्ष्यांचा समावेश आहे.

MPSC पूर्वपरीक्षेच्या उत्तरसूचीत चूक

$
0
0
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अंतिम उत्तरसूचीत चुका असल्याचा दावा काही विद्यार्थ्यांनी केला आहे. या उत्तरसूचीत आयोगाने चुकीचीच उत्तरे बरोबर म्हणून दिली आहेत, असा दावा या विद्यार्थ्यांनी केला असून, त्यात सुधारणा करून त्याप्रमाणेच गुण दिले जावेत, अशी मागणीही केली आहे.

उद्रेकानंतर आता निकराची लढाई

$
0
0
मतदानहक्कापासून वंचित ठेवल्याने लाखभर पुणेकरांच्या झालेल्या उद्रेकाने शुक्रवारी निकराच्या लढाईचे स्वरूप धारण केले आहे. हायकोर्टात जनहित याचिका, ई-याचिका, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव आणि स्थानिक व राज्य आयोगावर दबाव टाकणे आदींद्वारे मतदारांनी यंत्रणा हलवून सोडली.

‘धमकी’चा आयोगाने मागितला जाब

$
0
0
खासदार सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही, तर गावाचे पाणी बंद करण्याची धमकी दिल्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणाचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाने मागितला आहे.

सुरेश भटांचा दस्तऐवज वाचकांपुढे

$
0
0
मराठी गझल आणि काव्यात नवा प्रवाह आणणारे कविवर्य सुरेश भट यांच्या विचारांचा दस्तऐवज वाचकांच्या हाती येणार आहे. भटांनी लिहिलेल्या आत्मपर, सामाजिक आणि काव्यविषयक लेख ‘हिंडणारा सूर्य’ या पुस्तकात डॉ. पुरुषोत्तम माळोदे यांनी संपादित केले आहेत.

मतदारांना पक्षच महत्त्वाचा!

$
0
0
देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांचे चित्र ‘रागा विरुद्ध नमो’ असे रंगविले जात असले, तरी अशा नेत्यांपेक्षा संबंधित पक्षांचाच विचार अजूनही देशातील बहुसंख्य मतदार करत असल्याचे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

अजित पवारांविरोधात गुन्हा

$
0
0
सुप्रिया सुळे यांना मत दया, नाहीतर गावाला होणारा पाणी पुरवठा बंद करेन, अशा शब्दात मतदारांना धमकावल्याच्या आरोपप्रकरणी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

डॉ. दाभोलकर खून प्रकरणी रविवारी पुण्यात धरणे आंदोलन

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाला आठ महिने उलटले तरी मारेकऱ्यांचा तपास लागत नसल्याच्या निषेधार्थ रविवारी ( २० एप्रिल) राज्यासह शहरात निदर्शने करण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असून त्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.

‘आरटीई’च्या आरक्षित प्रवेशाची मुदत संपली

$
0
0
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठीची पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरांमधील अंतिम मुदत शनिवारी संपली. पहिल्यांदाच ऑनलाइन आणि लॉटरी पद्धतीच्या वापरातून पूर्ण झालेल्या या प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर सोमवारी या विषयीची पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

भाऊसाहेब, रावसाहेब पुन्हा कार्यरत

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यग्र असलेले तलाठी भाऊसाहेब आणि तहसीलदार रावसाहेब आता पुन्हा आपल्या नेहमीच्या महसूल खात्याच्या कामाला लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली तलाठी कार्यालये व तहलीदार कार्यालय आता पूर्ण क्षमतेने कार्यरत होणार आहेत.

मासाळवाडीचे ग्रामस्थ ‘अजितदादां’साठी सरसावले

$
0
0
‘राष्ट्रवादी’ला मत न दिल्यास गावाला पाणी देणार नाही, अशी दमबाजी करणाऱ्या अजित पवार यांच्या समर्थनार्थ मासाळवाडी ग्रामस्थांनी मोर्चा काढला. पवार कुटुंबीय हेच आमच्या गावचा प्रश्न सोडविणार आहेत. केवळ राजकीय स्वार्थापोटी गावाचे नाव पुढे करून खोट्या तक्रारी केल्या जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

‘डेटा एंट्री’चे काम करणाऱ्या एजन्सीला काळ्या यादीत टाका

$
0
0
सदोष मतदारयादीबाबत संबंधित अधिकारी आणि डेटा एंट्री करणाऱ्या एजन्सीवर कारवाई करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

आचारसंहिता होणार २४ एप्रिलनंतर शिथिल?

$
0
0
दहावी-बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे चेक वाटप असो, वा शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सायकल वाटप... आचारसंहितेच्या कात्रीत अडकलेल्या या योजनांची अंमलबजावणी पालिकेला पुढील आठवड्यानंतर करता येण्याची शक्यता आहे.

महिला कंडक्टरचा मृतदेह कालव्यात

$
0
0
नारायणगाव एस. टी. आगारात कार्यरत असलेल्या महिला कंडक्टरचा मृतदेह पिंपळवंडी येथे कालव्यात आढळल्याने खळबळ उडाली आहे. अनिता विजय दुराफे (वय-३८ रा. कुसुर ता. जुन्नर) असे या कंडक्टरचे नाव आहे.

वेबसाइटवर त्रुटीचे बजेट

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या सिनेटमध्ये नुकत्याच सादर झालेल्या आणि विद्यापीठाने आपल्या वेबसाइटवरून प्रसिद्ध केलेल्या बजेटच्या विवरणामध्ये तफावत आढळून आली आहे. विद्यापीठाने वेबसाइटवरील बजेटमध्ये तातडीने सुधारण करण्यासाठी पावले उचलली असली, तरी ही तफावत राहत असल्यास खऱ्या नोंदी कोणत्या असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पालकांचा शाळाप्रमुखांना घेराव

$
0
0
अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची कल्पना असतानाही, त्या विरोधात पावले उचलण्यात टाळाटाळ करणाऱ्या वानवडीतील एका ख्यातनाम शाळेच्या प्रशासनाविरोधात पालकांनी शनिवारी तीव्र आंदोलन केले.

‘त्या’ शिक्षकांच्या नोकरीवर गदा

$
0
0
बायफोकलचे विषय २०० ऐवजी १०० गुणांचे केल्याने शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार का, असा प्रश्न बायफोकल विषयांच्या शिक्षकांपुढे आहे. याबाबत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने स्पष्टीकरण करावे, अशी मागणी व्यवसाय शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

भटकंतीमध्ये पुणेकर देशात अव्वल

$
0
0
जगाच्या पाठीवर कोठेही जा, एक तरी पुणेकर तुम्हाला नक्कीच सापडेल… अशी चेष्टा अनेक जण करतात. पण उत्साही असलेल्या पुणेकरांची दखल घेत मध्यप्रदेश, उत्तराखंड, हिमाचलप्रदेश अशा विविध राज्यांच्या पर्यटन महामंडळांनी पुण्यात कार्यालये थाटली आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images