Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

येऊन, येऊन ‘आम्हीच’ येणार...

0
0
परंपरागत भागांत झालेले सुशिक्षितांचे वाढीव मतदान फायदेशीर ठरणार..., झोपडपट्टीबहुल भागांमध्ये दुपारनंतर झालेले एकगठ्ठा मतदान नौका तारून नेणार..., बालेकिल्ल्यातील कमी मतदानामुळे मताधिक्य घटणार... अन् कोणत्या मतदारसंघात मताधिक्य मिळणार, तर मनसेचे इंजिन कोणाला किती फ‍टका देणार...

राष्ट्रभाषा सभेचे अभ्यासक्रम रोजगारक्षम होणार

0
0
महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या दहावी ते पदवी समकक्ष असलेल्या अभ्यासक्रमांची व्याप्ती वाढविण्यात आली असून ते आता ‘रोजगारक्षम’ होणार आहेत. राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, विविध राज्यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे आणि विद्यापीठ यांच्या धर्तीवर अभ्यासक्रमांची नव्याने मांडणी करण्यात आली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

गदादे यांचे नगरसेवकपद रद्द

0
0
जन्माचा बनावट दाखला दिल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महापालिकेत अजून एक धक्का बसला आहे. बनावट दाखला दिल्याप्रकरणी हायकोर्टाने मनसेच्या नगरसेविका प्रिया गदादे पाटील यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे.

उच्चभ्रू मतदारही मतदानापासून वंचित

0
0
कोरेगाव पार्क, बंडगार्डन रस्ता, मंगलदास रोड, बोट क्लबसारख्या उच्चभ्रू सोसायट्यांतील चारचाकीतून आलेल्या वयोवृद्ध, उच्चशिक्षितांची मतदार यादीतच नाव नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

पुण्यात ५४.२४ टक्के मतदान

0
0
मतदार यादीतून लाखो मतदारांची नावे ‘गायब’ झाली असतानाही पुण्यातील तब्बल ९ लाख ९४ हजार ६२४ म्हणजे ५४.२४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदानामध्ये जवळपास पन्नास टक्के वाटा महिलांचा आहे तर तृतियपंथीयांसाठी पहिल्यांदाच केलेल्या ‘अन्य’ या परिशिष्ठांतर्गत दोन मतदारांची नोंद झाली.

पोलिस आयुक्तालयात तक्रार

0
0
कसबा पेठेतील संजय वसंत पायगुडे यांच्या कुटुंबातील पाच व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळली गेली आहे. ही नावे जाणीवपूर्वक वगळली गेली असल्याचा आरोप त्यांनी केला असून, या प्रकरणी पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रारी अर्ज दाखल केला आहे.

मतदानापासून वंचित नागरिकांचा आक्रमक पवित्रा

0
0
मतदार याद‌ीतील गोंधळाबाबत अनेकदा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करत असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून त्याकडे दुर्लक्ष केल्याने मतदार याद्यांचा घोळ निर्माण झाला आहे.

मतदारांनी घेतला सवलतींचा लाभ

0
0
मतदारयादीत नाव कायम राहिलेल्या सुदैवी पुणेकरांनी गुरुवारी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर विविध दुकानांमधून देण्यात आलेल्या सवलतींचाही हक्काने लाभ घेतला. काही सवलती फक्त गुरुवारपर्यंतच मर्यादित असल्या तरी काही सवलतींचा लाभ आज (शनिवारीही) घेता येणार आहे.

गायब मतदारांची आयोगाकडून गंभीर दखल

0
0
पुण्यातील हजारो मतदार मतदानापासून वंचित राहिल्याच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून पुण्यातील घडामोडींकडे आयोग विशेष बाब म्हणून पाहत आहे, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांनी शुक्रवारी सांगितले.

वंचितांना मतदानाची संधी देण्याची मागणी

0
0
मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिलेल्या पुणेकरांना पुन्हा मतदानाची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच मतदार यादीतून नावे वगळणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.

स्वयंसेवी संस्थांनीही मागितली दाद

0
0
मतदानाच्या दिवशी पुण्यातील लाखो मतदारांची नावे गायब झाल्याप्रकरणी स्वयंसेवी संस्थांनी थेट मुख्य निवडणूक आयुक्तांकडेच दाद मागितली आहे. माहिती अधिकार कायद्यानुसार, कोणत्या कारणाने मतदार गायब झाले ते वेबसाइटवर जाहीर करावे; तसेच ‘गायब’ मतदारांची पुरवणी यादी तयार करून त्यांना मतदानाची संधी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

२ घरफोड्यांमध्ये ५ लाखांचा ऐवज चोरीस

0
0
गेल्या दोन दिवसांत घरफोडीचे दोन गुन्हे घडले असून, त्यात सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज चोरी गेला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ आणि चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलीचा सहकारनगरमध्ये विनयभंग

0
0
अल्पवयीन मुलींच्या लैगिंक शोषणाच्या तक्रारी वाढत असून सहकारनगर येथे आणखी एका ११ वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तळजाई वसाहत येथे लहान मुलीला दोन रुपयांचे आमिष दाखवत लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जगताप बदनामी : सासवडमध्ये पाळला बंद

0
0
तालुक्यातील काँग्रेसचे युवा नेते संजय चंदुकाका जगताप यांची फेसबुक व ‘व्हाट्स अॅप’वरून अटक केल्याचा व्हिडीओ प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी शुक्रवारी सासवड बंदची हाक देण्यात आली होती.

१० लाखांचा टप्पा ‘शिरूर’मध्ये ओलांडला

0
0
रणरणते ऊन, मतदार यादी आणि मतदान केंद्रातील गोंधळानंतरही शिरूर लोकसभा मतदारसंघाने दहा लाख मतदानाचा टप्पा ओलांडला आहे. या मतदारसंघात तब्बल ५९.७७ टक्के म्हणजे १० लाख ८८ हजार ७२ मतदारांनी मतदानावर मोहोर उमटविली.

वाढीव टक्का कोणाच्या पथ्यावर?

0
0
मावळ लोकसभा मतदारसंघात ११ लाख ७४ हजार ४६४ म्हणजे ६०.१६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. हे प्रमाण गतवेळच्या तुलनेत सुमारे साडेचार लाखांहून अधिक असल्यामुळे ते कोणाच्या पथ्यावर पडणार याविषयी तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

मिस्ड कॉल द्या... ‘HIV’ची माहिती घ्या

0
0
‘एचआयव्ही’ म्हणजे काय...? एचआयव्हीची लक्षणे नेमकी काय...? हा आजार कसा रोखता येईल... यासारख्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत? मग संवाद हेल्पलाइनने सुरू केलेल्या मोबाइल क्रमाकांवर ‘मिस्ड कॉल’ द्या... आणि सर्व माहिती मोफत मिळवा..

विशेष शिक्षकांचे वेतन रखडले

0
0
जिल्ह्यातील अपंगांच्या अनुदानित विशेष शाळा, कर्मशाळा, वसतिगृहातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन ते पाच महिन्यांपासून रखडले असून कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

मतदानानंतर ‘लाँग वीकेंड पिकनिक’

0
0
लोकसभेसाठी योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी मतदानाचा अधिकार बजावला अन् दुपारनंतर पुणेकर ‘लाँग वीकेंड पिकनिक’साठी रवाना झाले. मतदानासाठी मिळालेली सुट्टी आणि गुड फ्रायडेमुळे सलग चार दिवस जोडून आलेल्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आता पर्यटनस्थळे बहरू लागतील.

पोलिस आयुक्तांचीही आयोगाकडे लेखी तक्रार

0
0
पुण्याच्या मतदारयादीत आपले नाव न आल्याबद्दल नाराजी व्यक्त करणारे पत्र पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठविले आहे. मतदारयादीत नाव दाखल करून पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करून घेण्याची विनंतीही त्यांनी आयोगाकडे केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images