Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अन सुप्रिया सुळे रडल्या...

$
0
0
‘मतदार हेच माझे कुटुंब आहे. माझी ओळख बारामतीची लोकप्रतिनिधी म्हणून आहे. मी मतदारसंघात फिरले ते मतदारांचे आभार मानून, पुन्हा निवडून देण्यासाठी. मात्र, त्यावरून विरोधक टीका करत आहेत, असे सांगतानाच दुःखी होऊन बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना भर जाहीरसभेत रडू कोसळले.

मतदारांना पुन्हा मनस्ताप

$
0
0
मतदारयादीतील घोळ, स्लिपा पोचण्यातील समस्या आणि अचानक बदललेल्या केंद्रांमुळे यंदाही पुणे जिल्ह्यातील मतदारांना मनस्तापालाच सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

कदम,पायगुडेंविरुद्ध गुन्हा

$
0
0
पुण्यात गुरुवारी १७ एप्रिल रोजी होणार असलेल्या मतदानाला अवघे काही तास उरले असताना लोकसभा निवडणुकीचे उमेदवार डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस) आणि दीपक पायगुडे (मनसे) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कदम आणि पायगुडे यांनी परस्परांविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोघांविरोधात चोरीचे गुन्हे दाखल केले आहेत.

निवडणूक उधळण्यासाठी मनसेचे षड्‍यंत्रः कदम

$
0
0
शांततेने सुरू असलेल्या पुण्याच्या निवडणुकीला गालबोट लावण्याचा प्रकार मनसेने केला असून, हेतू पुरस्रर रचण्यात आलेले षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांनी बुधवारी केला.

शिवसेनेच्या ३ नगरसेविकांची हकालपट्टी

$
0
0
पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तीन नगरसेविकांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते शशिकांत सुतार यांनी बुधवारी (१६ एप्रिल) दिली.

दुचाकीस्वारांकडून साडेसात लाखांची लुटमार

$
0
0
खराडी आणि बावधन येथे दोन स्वतंत्र घटनांमध्ये दुचाकीवर आलेल्या दोघा आरोपींनी कार चालकांना बेदम मारहाण करत साडेसात लाख रुपयांचा ऐवज लुटला. बावधन येथील घटनेत सचिन शिंदे (वय ३४, रा. निगडी) एक नवी कार टेस्ट ड्राइव्ह करण्यासाठी बावधन येथे आले असता दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्या कारला पाठीमागून धडक दिली.

मतदानाच्या दिवशी हॉस्पिटल्स सुरूच

$
0
0
मतदारांच्या आरोग्य सेवेसाठी पुणे महापालिकेची सर्व हॉस्पिटल आज, गुरुवारी (१७ एप्रिल) मतदानाच्या दिवशी संपूर्ण दिवस सुरू ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांच्या हि‌तासाठी पालिका प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सासवड, पुरंदरमध्ये पुन्हा गारांसह पाऊस

$
0
0
मतदानाच्या आदल्याच दिवशी म्हणजे बुधवारी हडपसर आणि खराडी परिसरात दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर सासवड, पुरंदर परिसरात तासभर गारांसह पावसाच्या सरी कोसळल्या. आज (गुरुवार) मतदानाच्या दिवशीही दुपारनंतर वीजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सौरव राव यांच्या विरोधात फौजदारी अर्ज

$
0
0
मतदारयादीत दोनदा नाव असणे हा कायद्याने गुन्हा आहे. या कायद्याची माहिती असतानाही पुणे येथे मतदारयादीत नाव नोंदविताना नागपूर येथील नाव कमी न केल्याप्रकरणी एका वकिलाने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरव राव यांच्याविरुद्ध कोर्टात खासगी फौजदारी अर्ज दाखल केला आहे.

डॉ. विश्वजित कदम यांना अटक होईपर्यंत आंदोलन

$
0
0
पैसे वाटताना भारती विद्यापीठाच्या तीन शिक्षकांना पकडल्याने कॉँग्रेस -राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार विश्वजित कदम यांना अटक होईपर्यंत आपण समर्थ पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, असा इशारा मनसेचे उमेदवार पायगुडे यांनी दिला.

पायगुडे-कदमांचे परस्परांविरोधात गुन्हे

$
0
0
काँग्रेस-मनसेमध्ये पैसे वाटण्यावरून सुरू झालेला वाद परस्परांविरोधात दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यापर्यंत पोहोचला आहे. काँग्रेसचे उमेदवार डॉ विश्वजित कदम आणि मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल आहे.

निवडणूक उधळण्यासाठी मनसेचे षड‍्यंत्रच

$
0
0
शांततेने सुरू असलेल्या पुण्याच्या निवडणुकीला गालबोट लावण्याचा प्रकार मनसेने केला असून, हेतू पुरस्रर रचण्यात आलेले षड‍्यंत्र असल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांनी बुधवारी केला. पुण्यातून काँग्रेसचाच विजय निश्चित असल्याने संगनमताने ही स्टंटबाजी सुरू असल्याचा आरोपही त्यानी केला.

वैऱ्याच्या रात्री कसोटी पोलिसांची

$
0
0
जनवाडी येथे सांगलीहून प्रचारासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना मनसेचा चोप... लाल देवाळाजवळ काँग्रेस उमेदवाराच्या नातेवाइकाकडे चौकशी... प्रभात रोडवरील काँग्रेसच्या नेत्याच्या घरात चौकशी... सांगवी येथे पैसे वाटताना दोघांना अटक... पोलिसांकडून नाकाबंदी... संशयितांची कसून चौकशी... अशा डझनभर तक्रारींची चौकशी.

आजचा दिवस कर्तव्याचा

$
0
0
प्रचाराच्या रणधुमाळीत मतदारांपुढे आपली बाजू मांडल्यानंतर उमेदवार आज, गुरुवारी निर्णायक परीक्षेला सामोरे जात आहेत. पारंपरिक व्होट बँक, राजकीय-सामाजिक समीकरणे, प्रस्थापितविरोधी लाट, नवमतदारांचा उत्साह… अशा वातावरणात उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतयंत्रात बंदिस्त होईल.

आज पावसाची शक्यता

$
0
0
मतदानाची तयारी पूर्ण होत असतानाच मतदानाच्या दिवशीच दुपारनंतर शहरात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुण्याच्या काही उपनगरात बुधवारी तुरळक पाऊस झाला. सासवडमध्ये गारांसह पाऊस झाला. राज्यात अन्यत्रही पावसाने हजेरी लावली.

जगतापांसाठी सभाच घेतली नसती

$
0
0
‘मावळ लोकसभा मतदारसंघातील शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप अनधिकृत बांधकामांचे समर्थन करीत आहेत, असे मला माहिती असते, तर त्यांच्या सभेला गेलोच नसतो. एका व्यक्तीसाठी पक्षाची भूमिका बदलू शकत नाही,’ असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

प्रचारापासून रिक्षा दूरच...

$
0
0
मोठा गोल कर्णा बांधून ‘ताई, माई, आक्का विचार करा पक्का..’ अशी आरोळी ठोकत वाड्या-वस्त्यांवर जाऊन उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या रिक्षा यंदा प्रचारापासूनच दूर आहेत. प्रचाराची बदललेली माध्यमे, सरकारने रिक्षाचालकांविरोधात घेतलेल्या निर्णयामुळे रिक्षाचालकांचा सरकारवरील रोष आदी कारणांमुळे प्रचारातील रिक्षांची संख्या अत्यल्प आहेत.

रात्रीची विमानसेवा पूर्ववत

$
0
0
लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या आधुनिकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत बंद असलेली रात्री दहानंतरची नागरी विमानसेवा पूर्ववत सुरू झाली आहे. धावपट्टीचे आधुनिकीकरण झाल्यामुळे विमानतळावरून ये-जा करणाऱ्या देशांतर्गत विमानांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे.

पवारांनी केले ‘डॅमेज कंट्रोल’

$
0
0
निवडणुकीत अखेरच्या क्षणी मॅरेथॉन सभा घेऊन उमेदवाराबद्दल ‘योग्य’ संदेश देण्यात हातखंडा असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना अखेर पुण्यात ‘डॅमेज कंट्रोल’ची भूमिका बजावावी लागली आहे.

‘फॉर्म ४-६’ ने चोळले जखमेवर मीठ

$
0
0
‘फॉर्म क्रमांक ४-६’च्या माध्यमातून मतदान करण्याचा हक्क आयत्या वेळेस का होईना मिळेल, अशी आशा पल्लवित झालेल्या पुणेकरांच्या जखमेवर अखेर मीठच चोळले गेले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images