Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मुंडे-गडकरींची राजभेट का?

$
0
0
‘आम्ही नरेंद्र मोदी यांना दिलेला पाठिंबा हा ‘न मागता’ दिला असेल, तर भाजपचे नेते राज ठाकरे यांची भेट कशासाठी घेत होते,’ असा सवाल मनसेच्या गोटातून विचारण्यात येत आहे. मनसेशी सलगीचे राजकारण अंगाशी येऊ लागल्यानेच भाजपने टोपी फिरविल्याची भावना मनसेतून व्यक्त होतेय.

पिंपरीत औषध विक्रेत्यांचा ‘FDA’वर मोर्चा

$
0
0
जाचक कारवाईच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडमधील औषध विक्रेत्यांनी स्वयंस्फूर्तीने औषध दुकाने बंद ठेऊन अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयावर शुक्रवारी सकाळी (एफडीए) मोर्चा काढला होता. नाहक कारवाई केल्यास औषध विक्रीचे परवाने परत करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

बलात्कारप्रकरणी एकास अटक

$
0
0
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करून तिच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. कोर्टाने त्याला १४ एपिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अविनाश धोंडीबा पासलकर (वय ४५, रा. शुक्रवार पेठ शिंदे आळी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

निवडणुकीचे कामकाज जबाबदारीने पार पाडा

$
0
0
मतदान प्रक्रियेला सामोरे जाताना निवडणुकीचे कामकाज जबाबदारीने पार पाडावे अशी सूचना, पिंपरी विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी केली आहे. मावळ लोकसभा मतदार संघासाठी मतदान केंद्रांवर नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी इव्हीएम मशिन प्रत्यक्ष हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

शिरूरच्या खासदारांनी लोकांसाठी काय केले?

$
0
0
‘संसदेत काम करीत असताना शिरूरमधून निवडून आलेले खासदार मला कधी दिसले नाहीत. त्यांना बोलताना पाहिले नाही. त्यामुळे त्यांचे काय काम चालले तेच कळत नाही,’ असा सवाल केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी (११ एप्रिल) उपस्थित केला.

जाहीरनामा पूर्ती होईल का?

$
0
0
मावळचा खासदार कोण? हे ठरविण्यासाठी आता केवळ पाचच दिवस शिल्लक आहेत. त्यासाठी गेल्या पंधरवड्यात प्रचाराची रणधुमाळी रंगली. आरोप-प्रत्यारोप झाले. नेत्यांच्या सभा गाजल्या. दिवसा इकडे, रात्री तिकडे अशी कुजबूजही होत राहिली. प्रमुख पक्षांच्या उमेदवाराला आपणच विजयी होणार, अशी खात्री वाटू लागली आहे.

पालकांनीच शाळांवर दबाव आणण्याची गरज

$
0
0
अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार हा गंभीर विषय असून याबद्दल जागृती करण्यासाठी मुलांना लहान वर्गांपासूनच धडे दिले पाहिजेत. मुलांना ‘गुड टच.. बॅड टच’ची जाणीव व्हावी, यासाठी पालकांनीच शाळांकडे प्रशिक्षण वर्गांची मागणी केली पाहिजे, असे मत ‘चाइल्डलाइन’ संस्थेच्या पुण्याच्या प्रमुख अनुराधा सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.

पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी

$
0
0
सोमवार पेठेत‌ील पंधरा ऑगस्ट चौकात असलेल्या ‘पवित्रा एन्क्लेव्ह’ इमारतीमध्ये ड्रेनेजचे पाणी शिरल्याने येथील नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करत पालिकेतील काम करण्यास नकार दिल्याने दाद मागायची तर कुणाकडे, असा प्रश्न स्थानिक रहिवाशांना पडला आहे.

दोन दिवसांत ४६ लाखांच्या घरफोड्या

$
0
0
सोनसाखळी चोरांचा उच्छाद, अल्पवयीन मुलींच्या अब्रूवर हात टाकण्याच्या घटनांपाठोपाठ आता घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी पोलिसांची अब्रू वेशीला टांगली आहे.

परीक्षा प्रक्रियेतील समस्यांची वेळोवेळी कुलगुरूंना माहिती

$
0
0
परीक्षा प्रक्रियेतील समस्या, गैरप्रकार, सर्व बाजूने येणारा दबाव आदींबाबतची माहिती गेल्या दोन वर्षांपासून वेळोवेळी कुलगुरूंना देत आहे. तसेच, त्यांनी माझ्या कामाबाबत कधीही तक्रारीचा सूर लावलेला नाही. किंबहुना, माझी प्रशंसाच केली आहे.

उत्तराखंड सज्ज; पण पर्यटकांना भीती

$
0
0
उत्तराखंडमध्ये गेल्या वर्षी झालेल्या जलप्रलयाच्या धास्तीमुळे यंदा चारधाम यात्रेच्या तारखा जाहीर होऊनही पर्यटक या भागात जाण्यास तयार नाहीत. येत्या २ मेपासून गंगोत्री, यमुनाेत्री, तर ४ मेपासून केदारनाथ आणि ५ मेपासून बद्रिनाथच्या यात्रा जाहीर झाल्या आहेत.

कुणी व्हा पोलिंग एजंट, कुणी कार्यकर्ते

$
0
0
सर्वच बाबतीत नवख्या असलेल्या आम आदमी पक्षाला (आप) प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पोलिंग एजंटची आणि बूथवरील कार्यकर्त्यांची गरज भासणार आहे.

आयोगाने घेतली प्राप्त‌िकर खात्याची मदत

$
0
0
लोकसभा निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर पैशांचा काळा बाजार होण्याची शक्यता लक्षात गुप्तचर विभागाच्या मदतीने प्राप्त‌िकर विभागाने हे व्यवहार रोखण्यासाठी कंबर कसली आहे.

‘दुबार’ मतदारांकडून अन्य पुरावे घेणार

$
0
0
‘पुण्यातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर दुबार नावे असल्याची कल्पना निवडणूक प्रशासनाला आहे. परंतु निवडणूक आयोगाने अशा नावांबाबत काय करायचे याची कार्यपद्धती निश्चित करून दिली आहे.

‘बहुमत भाजपच्या टप्प्यातही नाही’

$
0
0
‘यूपीए सरकारच्या योजनांचा कृषी व औद्योगिक उत्पादनावर सकारात्मक परिणाम होऊन देशाच्या वार्षिक दरडोई उत्पन्नात (जीडीपी) वाढ झाली आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळण्याची सुतराम शक्यता नसून, यूपीएच पुन्हा सत्तेवर येईल,’ असा ठाम विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

‘आप’साठी रघू रोडवर

$
0
0
रात्रीची सव्वाआठची वेळ..तरुणाईच्या गर्दीने ओसंडून वाहणारा फर्ग्युसन रोड....अचानक ‘इन्कलाब झिंदाबाद’ ची घोषणा होते, त्यानंतर ‘मेरा रंग दे बसंती चोला’,‘हम होंगे कामयाब’ यासारखी गाणी गात चार पाच युवक पुढे येतात....

निवडणुकीमुळे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री तेजीत

$
0
0
लोकसभा निवडणुकीची सर्वत्र सुरू असलेल्या धामधुमीचा फायदा देशातील हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला झाला आहे. खास निवडणुकीसाठी टूर ऑपरेटर्सनी इलेक्शन टुरिझम पॅकेजेस तयार केल्यामुळे पर्यटन व्यवसायामध्ये आर्थिक उलाढाल प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्तीचे आदेश देऊनही प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या २६ कर्मचाऱ्यांना तत्काळ हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

परीक्षा नियंत्रक निलंबित

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गैरप्रकारांसाठी परीक्षा नियंत्रक डॉ. संपदा जोशी यांना जबाबदार ठरवत विद्यापीठाने शुक्रवारी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या प्रा. डॉ. अशोक घाटोळ समितीच्या अंतरिम अहवालानंतर ही कारवाई केल्याची माहिती कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिली.

कचरा, पाणी, एलबीटी, ऊर्जानिर्मितीवर भर

$
0
0
पाणी पुरवठा, कचरा समस्या, महिलांवरील अत्याचाराच्या समस्या सोडविण्याबरोबरच, भुयारी मार्ग, उर्जा निर्मिती, आंतरराष्ट्रीय विमानतळ, क्रीडा विद्यीपाठांच्या निर्मितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या पाच वर्षांत भर देणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>