Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपीच्या एक हजार घटना

$
0
0
बोर्डातर्फे राबविण्यात येत असलेल्या कॉपीमुक्त अभियानाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये एकत्रितरीत्या एक हजार १६ कॉपी प्रकरणांची नोंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘पीएमपीएम’ला १५ कोटी देणार

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपीएमएल) वाढता खर्च लक्षात घेता कर्मचाऱ्यांचे पगार, बस देखभाल दुरूस्ती, डिझेल खरेदीसाठी १५ कोटी रुपये पालिकेच्या वतीने अॅडव्हान्स म्हणून देण्याचा निर्णय गुरुवारी स्थाय‌ी ‌समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

कुलगुरूंनी घेतली अधिष्ठात्यांची बैठक

$
0
0
पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी विद्यापीठाच्या सर्व अधिष्ठात्यांची गुरुवारी बैठक बोलावली होती. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची ‘अँटी करप्शन’ने सुरू केलेली चौकशी आणि विभागाबाबत कडक भूमिका न घेतल्यास अधिष्ठात्यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक, विद्यापीठ प्रशासन विभागाचा ‘निकाल’ लावणार की काय, असाच प्रश्न उपस्थित करणारी ठरली.

तिहेरी हत्याकांड: सावकाराला अटक

$
0
0
फातिमानगर येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपीकडून विनापरवाना सावकारी करणाऱ्या एका व्यक्तीकडून १५ टक्के मासिक व्याजाने कर्जवसुली करण्यात येत असल्याची माहिती समोर आली असून कर्जाचे हप्ते थकल्यामुळे सावकराने सागर गायकवाड याची कारही जबरदस्तीने नेल्याचे निष्पन्न झाले आहे.

तीन टक्के विद्यार्थी ‘फर्स्ट क्लास’

$
0
0
राज्याच्या एमबीए/एमएमएस - सीईटीमध्ये ‘फर्स्ट क्लास’ मिळवणारे १४११ विद्यार्थीच आहेत. परीक्षेला एकूण ४९,२७६ बसले होते. ‘सीईटी’त २०० पैकी १५८ (७९ टक्के) हे सर्वोत्तम गुण असून, ते मिळवणारे चार विद्यार्थी आहेत.

मोदीसभेसाठी पुणे भाजप सज्ज

$
0
0
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील प्रचारसभेला पुणेकरांमध्ये टीआरपी मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीने विविध उपक्रम आखण्यात आले आहेत. शहरातील अनेक चौकांमध्ये सभेच्या घोषणा करण्यासाठी कार्यक्रम होणार आहेत. तसेच सोशल मीडियातूनही शेकडो मेसेजेसचा पाऊस पाडण्यात येत आहे.

ट्रॅफिक जाम टाळून पदयात्रा काढा

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सुरू असलेले रोड-शो तसेच पदयात्रांमुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश विशेष शाखेने दिले आहे. वाहतूक पोलिस तसेच स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी खबरदारी घ्यावी, असे या आदेशात म्हटले आहे.

मतदान करणाऱ्यांना फुल्ल टू डिस्काउंट

$
0
0
मतदान केल्याची खूण दाखविल्यावर मॉल, डिपार्टमेंटल स्टोअर्स, पेट्रोलपंप, पर्यटन कंपन्या आणि डॉक्टर्सनी खरेदी व उपचारांवर डिस्काऊंट देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरव राव यांनी दिली.

शिवशाहिरांवरील शाईफेकीचा निषेध

$
0
0
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शाई फेकणाऱ्या संबंधित व्यक्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे लोकसभेचे उमेदवार दीपक पायगुडे यांनी निषेध नोंदविला आहे.

मोदींचा अर्ज बाद करावा

$
0
0
‘निवडणूक अर्जामध्ये खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा अर्ज आयोगाने बाद करावा’, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी केली. तसेच, या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

व्होटर हेल्पलाईनवर तक्रारी उदंड

$
0
0
आमचे मतदार यादीत नाव नाही... व्होटरकार्ड अजून मिळालेले नाही... व्होटरकार्डवरील फोटो चुकला आहे... मतदार स्लिप मिळालेली नाही... अशा तक्रारींचा पाऊस व्होटर हेल्पलाइनवर पडत असून आतापर्यंत सुमारे ७५० तक्रारी आल्या आहेत. यातील ३०० हून अधिक तक्रारी मतदार यादीत नाव नसल्याच्या आहेत.

कोणतेही बटण दाबा, मत घड्याळाच

$
0
0
इले​क्टॉनिक व्होटिंग मशिनचे (इव्हीएम) बटन दाबल्यानंतर घड्याळालाच मतदान होत असल्याचा प्रकार इंदापूरमध्ये इव्हीएम तपासणीच्यावेळी आढळून आल्याचा आरोप करून बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी याबाबतची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

कदमांना सांगलीला परत पाठवा

$
0
0
‘राज्याचे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी स्वतः जमिनी लाटल्या. मात्र, पानशेत पूरग्रस्तांचे पुनर्वसन सरकाने अद्याप केलेले नाही. आता स्वतःच्या मुलाला त्यांनी उमेदवारी मिळवून दिली आहे. अनिल शिरोळेंना मतदान करून या कदमांना सांगलीला परत पाठवा,’ असे आवाहन भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले.

रामदेवबाबा विरुद्ध राहुल

$
0
0
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि योगगुरू रामदेवबाबा प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात ‘एसएसपीएमएस’च्या मैदानातून एकमेकांविरोधात तोफा डागणार आहेत. मात्र, सभांच्या तयारीसाठी काँग्रेस-भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र बसून पोलिसांसह एकाच मैदानावर आपापल्या जागा निश्चित केल्या.

…आणि पवार विरुद्ध राज

$
0
0
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा एकाच भागात होणार असून, या निमित्ताने पवार-ठाकरे यांची जुगलबंदी सोमवारी (१४ एप्रिल) रंगणार आहे.

‘मतदार आघाडीला पुसून टाकणार’

$
0
0
यंदाच्या निवडणुकीत मतदार बोटावरील शाई पुसून दोनदा मतदान करणार नाही, तर काळजीपूर्वक मतदान करून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीच्या सरकारला सत्तेतून पुसून टाकून देशात महायुतीची सत्ता आणतील,’ असा दावा गोपीनाथ मुंडे यांनी केला.

कलमाडींना का नाही?- मुंडे

$
0
0
‘आदर्श गृहप्रकल्पाच्या गैरव्यवहारात अडकलेल्या अशोक चव्हाण यांना तिकीट दिले जाते; मग राष्ट्रकुल गैरव्यवहारात अडकलेल्या खासदार सुरेश कलमाडी यांना तिकीट का दिले नाही,’ असा सवाल भाजपच्या संसदीय दलाचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी गुरुवारी काँग्रेसला उद्देशून केला.

लिफ्टमध्ये अडकून मुलाचा मृत्यू

$
0
0
लिफ्टमध्ये अडकून चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना मोलेदिना हायस्कूलजवळील श्रीकृष्ण हाउसिंग सोसायटीत गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

जाहीरनामे गुलदस्त्यातच

$
0
0
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी पाच दिवस बाकी असतानाही, आम आदमी पक्षाचे उमेदवार वगळता पुण्यातील अन्य कोणाही उमेदवारांनी अद्याप आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे पुण्याच्या विकासाबाबतचा त्यांचा जाहीरनामारूपी दस्ताऐवज अजून तरी गुलदस्त्यातच आहे.

दहावीचे अर्ज आता ऑनलाइन

$
0
0
मार्च २०१४ मध्ये झालेल्या बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यासोबतच, येत्या ऑक्टोबरच्या परीक्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जही ऑनलाइन पद्धतीने भरून घेतले जाणार आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>