Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

फंदफितुरी! संघ झाला ‘दक्ष’

0
0
उमेदवारांच्या प्रचारात तोंडदेखला प्रचार किंवा विरोधी उमेदवाराशी संधान साधण्याबाबतच्या तक्रारींमुळे खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मैदानात उतरण्याची वेळ आली आहे.

अविनाश पाटील यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

0
0
पनवेल वेल्फेअर सोशल क्लबतर्फे युवा कलावंताला दिला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ युवा तबलावादक अविनाश पाटील यांना जाहीर झाला आहे.

बालचित्रपट महोत्सवाची पंचविशी...

0
0
परीक्षांचा हंगाम संपल्यावर बच्चे कंपनीला धमाल मनोरंजक आणि काही संदेशही देणाऱ्या सिनेमांची मेजवानी देणारा बालचित्रपट महोत्सव यंदा पंचविशीत पदार्पण करतोय. यंदा रौप्यमहोत्सवी वर्षातही या उपक्रमात उत्तमोत्तम सिनेमांची मेजवानी मुलांना मिळणार आहे.

‘कट्यार...’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
0
सांस्कृतिक कार्यक्रम, नाटकं आणि दर्जेदार संगीत मैफीली अनुभवण्याची संधी देणाऱ्या महाराष्ट्र टाइम्सच्या ‘कल्चर क्लब’ उपक्रमाला पुणेकरांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे.

मतदारांसाठी डायलॉगबाजी...

0
0
‘आई-बाबा आणि साईबाबांची शप्पथ...’ हा पराजकताच्या दगडूचा डायलॉग सध्या धूम माजवतोय... हो टाइमपास सिनेमा येऊन खूप दिवस झालेत...तो सुपरहिटही झाला...मग आता हा डायलॉग नेमका गाजतोय कुठं, असा प्रश्न पडला असेल तर तो मतदान जनजागृती आणि निवडणुक प्रचारातही गाजतो आहे.

‘कुमाऊँचे नरभक्षक’ अनुभवा ध्वनिपटातून

0
0
छानशा लेखनाला दिग्दर्शन आणि पार्श्वसंगीताची जोड देत सादर होणारा कलाविष्कार ‘स्नॉवेल’मध्ये कुमाऊँचे नरभक्षक हा चित्तथरारक अनुभव घेता येणार आहे. येत्या शनिवारी (१२ एप्रिल) लॉ कॉलेज रोडवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात संध्याकाळी ४ वाजता हा ध्वनिपट सादर केला जाणार आहे.

आघाडीच्या दिग्दर्शकांनी केला सलाम

0
0
‘दुनियादारी’ या बॉक्स ऑफिसवर दणदणीत यश मिळवलेल्या सिनेमाचा दिग्दर्शक संजय जाधव यांनी फिरोदिया करंडकातील विजेती सादरीकरणं पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना मनापासून सलाम केला.

सातारा रोडवर सीसीटीव्हीची नजर

0
0
सातारा रोडवरील पुष्पमंगल कार्यालय चौकातील वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी महापालिका प्रशासनाने दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या ठिकाणी सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामानंतर वाहतुकीचा आढावा घेऊन त्याचे नियोजन करण्यासाठी कॅमेरामार्फत केल्या जाणाऱ्या चित्रीकरणाचा उपयोग होणार आहे.

रखवालदार ठेवताना काळजी घेण्याचे आवाहन

0
0
घरमालक गावाला गेल्यानंतर रखवालदारानेच चोरी केल्याच्या अनेक घटना या पूर्वी शहरात घडल्या आहेत. आता देखील दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत गावाला जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे चोरीच्या घटना टाळण्यासाठी, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला फक्त ती व्यक्ती कमी मोबदला स्वीकारते म्हणून कामावर ठेवू नये.

डॉ. प्रकाश, डॉ. मंदा आमटे यांना ‘लक्ष्मी वासुदेव पुरस्कार’

0
0
आदित्य प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘लक्ष्मी वासुदेव समाजभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांना जाहीर झाला. सोमवारी (१४ एप्रिल) सायंकाळी पाच वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात संत साहित्याचे अभ्यासक डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.

रमेश आणि सीमा देव यांना राजा परांजपे जीवन गौरव पुरस्कार

0
0
राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘राजा परांजपे जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते रमेश आणि सीमा देव यांना, तर ‘राजा परांजपे तरुणाई पुरस्कार’ अभिनेता स्वप्नील जोशी, किशोर कदम, सिनेमॅटोग्राफर महेश लिमये आणि जलतरणपटू गौरी गाडगीळ यांना प्रदान करण्यात येणार आहे.

‘आयएमए’च्या अध्यक्षपदी डॉ. हळबे

0
0
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) कार्यकारिणीत संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. अरुण हळबे यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या पदग्रहण समारंभात त्यांनी पदभार स्वीकारला.

‘प्रत्येक युवकाला हवा रोजगार’

0
0
‘मटा’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हिजन पुणे’ या चर्चेमध्ये उद्योग आणि रोजगार यांविषयी उमेदवारांनी मांडलेली मते…

बेरोजगार तरुणांना कौन्सेलिंगचा आधार

0
0
चांगले मार्क्स आहेत, तांत्रिक ज्ञानही आहे पण काही कारणांमुळे कॅम्पस प्लेसमेंटमध्ये निवड झाली नाही. कंपन्यांकडून नेहमी नकारच कानी पडणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी ‘फेडरेशन ऑफ ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्स’ने (एफटीपीओ) पुढाकार घेतला आहे.

पाठ्यपुस्तके विलंबाची परंपरा यंदाही कायमच?

0
0
शालेय पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात दरवर्षी होणारा विलंब रोखण्यासाठी यंदा शालेय शिक्षणमंत्र्यांनीच लक्ष घातले असले, तरी यंदाही पाठ्यपुस्तकांना उशीरच होण्याची चिन्हे आहेत.

हजेरीच्या पात्रता निकषात १०८ विद्यार्थी ‘नापास’

0
0
परीक्षेसाठी पात्र ठरण्याच्या ७५ टक्के हजेरीच्या अटीची पूर्तता न करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय ‘विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नोलॉजी’ने (व्हीआयआयटी ) घेतला. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांच्या पालकांनी कॉलेजमध्ये धाव घेऊन पाल्यांना परीक्षेस बसू देण्याची मागणी बुधवारी केली.

‘ती’ विद्यार्थिनी सुखरूप

0
0
शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या विनयभंगाच्या घटनेनंतर ‘त्या’ विद्यार्थिनीविषयी शहरात सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून नानाविध चर्चा घडत आहेत. या चर्चांमध्ये तथ्य नसून, संबंधित विद्यार्थिनी सुखरूप असल्याचे शाळेकडून स्पष्ट करण्यात आले.

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक

0
0
रेल्वेमध्ये क्लार्क आणि तिकीट चेकर पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची २४ लाख २८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांनाही ११ एप्रिलपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

जुन्नरमध्ये तीन लाखांची रक्कम हस्तगत

0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस तपासणी स्कॉडकडून जुन्नरमध्ये तीन लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिसांनी पहाटे दीडच्या सुमारास इंडिरा कारमधून ही रक्कम हस्तगत केली आहे.

एमएस्सी बायोकेमिस्ट्रीची ‘केमिस्ट्री’ आज उलगडणार

0
0
एमएस्सी बायोकेमिस्ट्रीच्या निकालामध्ये असलेल्या त्रुटींबाबत विद्यार्थ्यांनीच घेतलेले आक्षेप विचारात घेऊन निकालाचा फेरविचार करण्याचे आश्वासन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी गुरुवारी दिले. सुधारित निकालांबाबत शुक्रवारी दुपारपर्यंत पूर्ण माहिती देणार असल्याचेही संबंधित विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images