Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘आप’च्या उमेदवाराचा बिनपगारी रजा टाकून प्रचार

$
0
0
निवडणुकीच्या प्रचारासाठी निरपेक्ष भावनेने काम करणारे कार्यकर्ते आता दिसत नाहीत. कार्यकर्त्यांसाठी उमेदवाराला खिसा रिकामाच करावा लागतो, अशी तुमची समजूत असेल, तर ती चुकीची आहे.

पवारांनी उपटले कान, तरीही ‘कपबशी’च छान

$
0
0
मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार अॅड. राहुल नार्वेकर यांच्या प्रचारात सहभागी न होणाऱ्या नगरसेवकांचे कान खुद्द केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उपटले तरी ‘कपबशी’कडे उठबस असणाऱ्यांची मान अजूनही ताठ आहे.

‘फिरोदिया’वर ‘सीओईपी’ची मोहर

$
0
0
फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेचे विजेते म्हणून ‘सीओईपी’चे नाव पुकारले गेले. त्याक्षणी एक रोबो कार मंचावर अवतरला आणि त्या पाठोपाठ दाखल झाला ‘सीओईपी’चा विजेता संघ. त्यावेळी मंचावर होता पारंपरिक वेशातील संघ आणि अखंड जल्लोष...

सांगवीतील केंद्र अतिसंवेदनशील घोषित करा

$
0
0
मावळ लोकसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांची पिंपळे गुरव, सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख या परिसरात दहशत असल्याचा आरोप करीत या भागातील मतदान केंद्र अतिसंवेदनशील म्हणून घोषित करा, अशी मागणी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात असताना उमेदवारांनी विविध संघटना, गृहरचना सोसायट्या तसेच संस्थांच्या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

इतरांची विकासकामे लाटण्याचा खासदारांचा गोरखधंदा जोरात

$
0
0
‘जे कधी संसदेत दिसत नाहीत, ते विकासकामांची एवढी मोठी यादी कशी काय जाहीर करू शकतात याचे नवल वाटते. दुसऱ्यांनी केलेली विकासकामे स्वतःच्या नावावर खपविण्याचा प्रकार सध्या या भागात सुरू आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांचे नाव न घेता केली.

गोपीनाथ मुंडेंना प्रत्युत्तर बीडमध्ये जाऊनच देणार

$
0
0
भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केडगाव येथे मुक्ताफळे उधळली असल्याने, त्यांना बीडमध्ये जाऊनच १४ एप्रिलला प्रत्युत्तर देणार असल्याचे खडे बोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सुनावले.

झोपडपट्टीवासीयांचे प्रश्न महिनाभरात निकालात

$
0
0
वन खात्याच्या जमिनीवर राहात असलेल्या झोपडपट्टीवासियांचे प्रश्न एक महिन्याच्या आत निकालात काढू, असे आश्वासन राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांनी बुधवारी दिले. मात्र, निवडणुकीत तुम्ही तुमची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडा, असे आवाहनही त्यांनी झोपडपट्टीवासियांना केले.

‘त्या’ धक्काबुक्कीशी आमदारांचा संबंध नाही

$
0
0
‘प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये माजी महापौरांना धक्का लागला असेल; पण त्याच्याशी आमदारांचा कोणताही संबंध नाही,’ असा खुलासा काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांनी बुधवारी केला. त्याचवेळी, काँग्रेसनेही पक्षात असे काही घडले नसल्याचा दावा करत, त्याबाबत कोणीही तक्रार केली नसल्याची सारवासारव बुधवारी केली.

राष्ट्रवादी सतर्क, विरोधक निर्धास्त

$
0
0
बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात प्रतिस्पर्धी पक्षांनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचारासाठी प्रथमच धावपळ करावी लागत आहे. राष्ट्रवादीला कधीही बारामतीत ‘रोड शो’ करावा लागला नव्हता; पण या वेळी ’रोड शो’चे ‘दर्शन’ घडवावे लागले.

स्पर्शज्ञानासाठी ‘गुड टच-बॅड टच’

$
0
0
अल्पवयीन बालक आणि शालेय विद्यार्थ्यांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी ओळखीच्या अथवा परक्या व्यक्तींच्या स्पर्शातील फरक ओळखण्याची क्षमता विकसित करणारा ‘गुड टच- बॅड टच’ प्रकल्प विकसित करण्यात आला आहे.

जातीपातींच्या गणिताचे सॉफ्टवेअर

$
0
0
पदयात्रा, मेळावे, जाहीर सभा याद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात राजकीय पक्षांमध्ये हातखंडा असला, तरी कोणत्या मतदारसंघात जाती-पातीची गणिते काय सांगतात...?, कोणत्या भागात कोणत्या समाजाचे प्राबल्य आहे...!

प्रचारामध्ये बालकांचा वापर गैर

$
0
0
निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय उमेदवारांकडून मुलांचा वापर करणे, हे गंभीर कृत्य असून असे प्रकार घडू नयेत यासाठी राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे पत्र निवडणूक आयोगाने ‘चाइल्डलाइन’ संस्थेला पाठविले आहे.

सत्तेशिवाय जगू शकत नाही

$
0
0
‘पवार घराणे ऑक्सिजन शिवाय जगू शकते; पण सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. पाच पांडवांची द्रौपदी कोण आहे असे विचारतात तर महायुतीतल्या पांडवांची द्रौपदी जनता आहे. तिचे वस्त्रहरण थांबवण्यासाठी आम्ही मैदानात आहोत,’ अशी टीका भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी केली.

राज यांचे फक्त टोल एके टोल

$
0
0
‘राज ठाकरे यांना राज्यात ‘टोल’ शिवाय एकही विषय माहिती नसून केवळ मुंबई- पुणे व मुंबई- नाशिक महामार्गावर वाऱ्या करण्यापेक्षा राज्याच्या इतर भागातही डोकावण्याचा प्रयत्न करा,’ असा सल्ला राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिला आहे.

काँग्रेस भवनातील ‘चूल बंद’

$
0
0
मतदारांपर्यंत पोहोचण्याऐवजी कार्यकर्ते काँग्रेस भवनामध्येच रेंगाळत असल्याचे आढळून आल्यानंतर काँग्रेस भवनात सुरू करण्यात आलेला ‘भटारखाना’ बंद करण्यात आला.

काँग्रेसचा प्रवास ‘तंदूर ते लातूर’

$
0
0
लातूरच्या युवक काँग्रेसच्या पदाधिकारी कल्पना गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूची तुलना दिल्लीतील तंदूर हत्याकांडाशी करून भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.

आदिवासी शाळांसाठी अखेर नवीन पदे

$
0
0
आदिवासी आश्रमशाळांची स्थिती सुधारण्यासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर गेल्या पाच वर्षांत कोणतीही कार्यवाही न केलेल्या आदिवासी विकास विभागाने १,९६१ नव्या पदांची निर्मिती केली आहे.

विद्येच्या माहेरघरात आणखी समृद्धी हवी

$
0
0
विद्येचे माहेरघर ही तर पुण्याची पूर्वीपासूनची ओळख आहे. पुणे विद्यापीठासह शहरातील इतर सर्व शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थी घडविण्यात कायमच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे, केवळ राज्यातून नाही, तर देशभरातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.

पाकिस्तानी नागरिकाला अटक

$
0
0
कोरेगाव पार्क येथील कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पाकिस्तानच्या नागरिक असलेल्या वडिलांनी उल्हासनगर येथील रहिवाशाची खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. कोर्टाने त्याला दहा एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images