Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वाढत्या वेगाला ‘हायवे सर्व्हेलन्स’चा ब्रेक

$
0
0
वाहनचालकांकडून ‘एक्स्प्रेस वे’ वर होणारे वेगमर्यादेचे उल्लंघन, लेन कटिंगच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने या मार्गावर ‘हायवे सर्व्हेलन्स’ सिस्टीम बसवण्याचे निश्चित केले आहे.

मालगाडी घसरल्याने रेल्वेसेवा विस्कळित

$
0
0
मिरजहून दौंडकडे निघालेल्या मालगाडीचा डबा रुळावरून घसरल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी हडपसरजवळ घडली. यामुळे दौंडकडून पुण्याकडे येणारी रेल्वेसेवा सव्वातास विस्कळित झाली होती. संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास रेल्वेसेवा पूर्ववत झाली.

बालचित्रपट महोत्सव रौप्यमहोत्सवी वर्षात

$
0
0
संवाद, पुणे आणि कावरे आइस्क्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारा बालचित्रपट महोत्सव यंदा रौप्यमहोत्सव साजरा करत आहे. ११ ते १७ एप्रिल या कालावधीत विजय टॉकिज येथे हा महोत्सव होणार असून, उन्हाळी सुट्टीच्या सुरुवातीलाच मुलांना मनोरंजक चित्रपटांची पर्वणी मिळणार आहे.

पालिकेने PMP ला द्यावे ५३ कोटी

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा त्यावर होणारा खर्च अधिक असल्याने पीएमपीएमएल चालविणे अधिकच अवघड झाले आहे.

९६ टक्के आरोपी पीडितेच्या ओळखीचेच

$
0
0
बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांतील ९६ टक्के आरोपी हे पीडितींच्या माहितीतीलच आहेत. पीडितांमध्ये १४ ते १८ वयोगटातील मुली, १८ ते ३० वयोगटातील तरुणी आणि महिलांचा समावेश आहे.

अत्याचाराच्या ‘त्या’ घटनेला संस्थाचालकच जबाबदार

$
0
0
अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या बसमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा निषेध करत मुख्याध्यापक संघटना आणि विद्यार्थी वाहतूक संघटनेने या प्रकाराला संस्थाचालकांनाच जबाबदार धरले आहे.

‘आरटीओ’तर्फे आजपासून स्कूलबसची झाडाझडती

$
0
0
स्कूलबसच्या चालक आणि अटेंडंटकडून झालेल्या प्रकारानंतर ‘आरटीओ’ने बुधवारपासून शहरातील स्कूलबसची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्कूलबसच्या नियमावलीसंदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी, शिक्षण अधिकारी आणि वाहतूक पोलिस यांच्या बैठकीचेही आयोजन करण्यात आले आहे.

अल्पवयीनांच्या सुरक्षेवरून पालक आक्रमक

$
0
0
शाळेच्या बसमध्येच अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग होण्याच्या घटनेमुळे शहरातील पालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. असे प्रकार थांबविण्यासाठी शाळांमधून पालक संघ आणि परिवहन समितीची स्थापन करण्यासोबतच, त्यांच्या नियमित बैठका होणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन त्या विषयी शालेय व्यवस्थापनांना जाब विचारण्याची तयारी पालक संघटनांनी सुरू केली आहे.

संस्थाचालकांविरोधात अदखलप्राप्त गुन्हा दाखल

$
0
0
पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळाल्यानंतरही पोलिसांत तक्रार दाखल न करणारे शाळेचे संस्थाचालक, प्राचार्य आणि वर्गशिक्षकांवर डेक्कन पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वांचा तपास करण्यासाठी कोर्टातून परवानगी घेण्यात येणार असल्याचे डेक्कन पोलिसांनी सांगितले.

‘सुरक्षित’ पुण्यात बलात्कार वाढले

$
0
0
पुणे रेल्वे स्टेशनजवळील वसाहतीमध्ये सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोघा गुन्हेगारांनी बलात्कार केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

‘त्या’ नराधमांना पोलिस कोठडी

$
0
0
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच्या प्रकरणात कारवाई करण्यास उशीर लावणाऱ्या मुख्याध्यापिकेने तक्रार दाखल केल्यानंतर अखेर स्कूलबसचा अटेंडंट आणि बसचालकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दररोज एका बालकाचे लैंगिक शोषण

$
0
0
निरागस, कोवळे जीव लैंगिक शोषणाचे बळी पडत असल्याचे प्रमाण सध्या वाढत आहे. कोर्टात दाखल होणाऱ्या केसेसच्या आकडेवारीवरून पुणे जिल्ह्यात दररोज एक बालक लैंगिक अत्याचारांना बळी पडत असल्याचे दिसून आले आहे. बाल लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना या धक्कादायक आणि लाजिरवाण्या आहेत.

शर्मिला ठाकरे यांचा रोड शो

$
0
0
हाती घेतलेले मनसेचे झेंडे... दुचाकीवरून निघालेली कार्यकर्त्यांची फौज... जीपमध्ये उमेदवार दीपक पायगुडे यांच्यासह राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, कन्या उर्वशी यांचे नागरिकांना हात उंचावून केले जाणारे अभिवादन आणि दिल्या जाणाऱ्या घोषणा...

राज ठाकरे यांच्या सोमवारी दोन सभा

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे लोकसभेचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या येत्या १४ एप्रिलला (सोमवारी) पुण्यात दोन ठिकाणी प्रचारसभा होणार आहेत. पुण्यात मनसेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर राज यांनी टीकास्त्र सोडत शिवसेनेला लक्ष्य केले होते.

अकोल्याव्यतिरिक्त इतरत्र ‘नोटा’चा वापर करा

$
0
0
मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक करण्याची रिपब्लिकन सेनेची अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पंतप्रधानांनीही या स्मारकाची घोषणा करूनही अद्याप त्याची अंमलबजावणी न झाल्याने लोकसभा निवडणुकीत मतदार करताना अकोला मतदारसंघ वगळून बाकी मतदार संघातील आंबेडकरी जनतेने ‘नोटा’ पर्याय वापरण्याचे आवाहन रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केले.

तृतीयपंथींची मतदार यादीत स्वतंत्र ओळख

$
0
0
समाजाकडून उपेक्षित वागणूक मिळणाऱ्या तृतीयपंथीयांना निवडणूक आयोगाने मात्र स्वतंत्र ओळख दिली असून पुण्याच्या मतदार यादीत ४५ तृतीयपंथींची प्रथमच स्वतंत्र नोंद करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर त्यांना येत्या आठवड्याभरात मतदार ओळखपत्रही देण्यात येणार आहे.

व्होटिंग मशिनच्या संरक्षणाची जय्यत तयारी

$
0
0
लोकसभा निवडणुकीचे घोडेमैदान अगदी जवळ येऊन ठेपल्याने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनच्या सुरक्षेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मतदानापूर्वी व मतदानानंतर महिनाभर या मशिन सुरक्षित ठेवण्यासाठी कोरगाव पार्कमधील शासकीय गोदाम व बालेवाडी येथे वॉच टॉवर, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच केंद्रीय व राज्य पोलिसांची द्विस्तरीय सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात येणार आहे.

सभांच्या स्पर्धेतून काँग्रेसची माघार?

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेला जमणाऱ्या गर्दीशी तुलना होऊ नये, यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची शहरात सभा न घेता ‘रोड शो’च्या माध्यमातूनच प्रचार करण्याची व्यूहरचना काँग्रेसकडून आखली जात आहे.

लक्ष्मण जगताप हेच विरोधकांचे टार्गेट

$
0
0
निवडणूक प्रचारासाठी अवघे सात दिवस उरल्याने मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनी रायगड जिल्ह्यात घाटाखाली असलेल्या उरण, कर्जत व पनवेलवर लक्ष केंद्रित केले आहे. घाटाखालच्या लाल बावटा आणि भगव्यातील संघर्षात घड्याळाचे काटे आणि झाडूही फिरू लागला आहे.

‘पुण्याचे आंतरराष्ट्रीय ब्रँडिंग हवे’

$
0
0
विद्येचे माहेरघर, ऑक्स्फर्ड ऑफ दी इस्ट, आयटी-बीटी हब, शांत-सुरक्षित शहर… पुण्याच्या नावलौकिकाची अशी विशेषणे आपण अभिमानाने मिरवतो. पण, महानगराकडे झेपावताना तो नावलौकिक टिकून आहे काय? नसेल, तर हा ‘ब्रँड पुणे’ अबाधित राखण्यासाठी कोणती पावले उचलणे गरजेचे आहे?
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images