Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘आप’ची पदयात्रा…इफेक्ट केजरीवालांचा

0
0
पांढरे ‘कडक’ कुर्ते, महागडे गॉगल आणि गळ्यात पक्षाच्या चिन्हाचे पट्टे घालून फिरणारे ‘टिपिकल’ उमेदवार आणि जोरजोरात घोषणा देऊन शक्तिप्रदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा ताफा असलेली ती पदयात्रा नव्हती. मोजकेच पण कळकळीने भ्रष्टाचार आणि राजकीय घराणेशाहीच्या विरोधात प्रचार करणारे कार्यकर्ते त्यात दिसले.

पूर्वेकडूनही होणार ‘मनसे’चा ‘मतोदय’?

0
0
नगरसेवक, दोनदा आमदार आणि नंतर सामाजिक कार्यातून कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील नागरिकांचा संपादन केलेला विश्वास, स्थानिक मतदारांशी जवळीक आणि आता ‘राज’करिष्म्यामुळे कोथरूड, कसब्याप्रमाणे कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरीतूनही मताधिक्य मिळविण्याची व्यूहरचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दीपक पायगुडे करत आहेत.

येत्या शनिवारी मोदींची सभा

0
0
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची येत्या शनिवारी (१२ एप्रिल) पुण्यात प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. विशेषतः मनसेच्या ‘नमो नमः’च्या घोषणेमुळे मतदारांमधील संभ्रम दूर करण्यासाठी खुद्द मोदीच पुण्याच्या मतसंग्रामात उतरणार असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.

अधिकाऱ्यांची इलेक्शन ड्युटी, कर्मचाऱ्यांची कामाला सुटी

0
0
लोकसभा निवडणुकीसाठी पालिकेतील अनेक अधिकाऱ्यांची ‘इलेक्शन ड्युटी’ लागली आहे. त्यातच आचारसंहितेचे कारण पुढे करत अधिकारीही उशिरा येत असल्याने पालिकेत आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.

ऐतवारी उडणार प्रचाराचा धुरळा

0
0
राज ठाकरे यांच्या गुढी पाडव्याच्या सभेनंतर निवडणुकीच्या प्रचाराचा नूर पालटेल असे वाटत असताना गेल्या आठवडाभरात पुण्यात राजकीय प्रचाराचा फड रंगला नाही. आता मात्र प्रचाराचे शेवटचे दोनच रविवार उरल्यामुळे प्रचाराची रंगत वाढण्याची चिन्हे आहेत.

किरकोळ कारणावरून मारहाण

0
0
रस्त्याचे काम चांगले झाले नाही असे म्हटल्याच्या रागातून एकाला तलवार, लोखंडी रॉड, काठ्या यांनी मारहाण केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अजय लक्ष्मण मोरे (वय ३८, रा. खडकवासला) याला अटक करण्यात आली आहे.

पुण्याचा पारा ३९ अंशांवर

0
0
उन्हाच्या झळा आता अधिक तीव्र होऊ लागल्या आहेत. शहरातील पाराही रोज चढत असून, शनिवारी शहरात ३९.४ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. शुक्रवारीही तापमानात वाढ झाली होती, तर कात्रज परिसरात पावसानेही हजेरी लावली होती.

‘राज’सभेसाठी पोलिस दक्ष

0
0
मुंबईत मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातही खबरदारी घेण्याच्या सूचना राज्य गुप्तवार्ता विभागाने पुणे पोलिसांना दिल्या आहेत. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या रविवारी दोन जाहीर सभा असल्याने पा​लिसांकडून पुरेशी खबरदारी घेण्यात येत आहे.

मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी

0
0
पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघांत होणाऱ्या मतदानासाठी १७ एप्रिल रोजी कामगारांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी देताना कामगारांच्या वेतनातून कोणत्याही स्वरूपाची कपात करण्यात येऊ नये, असे कामगार विभागाने स्पष्ट केले आहे.

राहुल गांधींची सभा लांबणीवर?

0
0
काँग्रेस आघाडीचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची एस. पी. कॉलेजच्या मैदानावर होणारी सभा दोन ते तीन दिवसांनी पुढे जाण्याची शक्यता आहे. गांधी यांची सभा पुढील आठवड्याच्या अखेरीस होण्याचे संकेत दिले जात आहेत.

कम्प्युटरचा ‘आवाजी’ प्रोग्राम

0
0
की- बोर्ड किंवा माउस न वापरता केवळ आवाजाच्या सहाय्याने कम्प्युटर वापरण्याची ताकद देणारे संशोधन पुण्यातील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. आपले हे संशोधन दृष्टीहीन आणि विकलांगांसाठी फायदेशीर ठरणारे असून, केवळ आवाजाच्या आधारे अशा व्यक्तीही सहज कम्प्युटर वापरू शकतात, असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.

पुण्यासह राज्य डेंगीच्या विळख्यात

0
0
स्थलांतरात होणारी वाढ, तापमानात सातत्याने होणारे बदल, घरात पाणी साठविण्याच्या बदललेल्या सवयींमुळेच डेंगीच्या डासांची सर्वाधिक पैदास होत आहे. परिणामी गेल्या काही वर्षांत मलेरियाचे निर्मूलन करण्यात यश आले असले तरी, पुण्यासह राज्याला डेंगीच्या डासांचा विळख्याचा सर्वाधिक धोका भेडसावत आहे.

‘नाजूक’ किती पुरुषहृदय बाई…

0
0
बदलत्या जीवनशैलीमुळे पुण्यातील ५० टक्के पुरुषांना; तर ४३ टक्के महिलांना हृदयविकाराचा धोका संभवतो आहे. तर, सुमारे ४६ टक्के पुणेकर डायबेटिसच्या आजाराने ग्रासले आहेत. पुणेकरांनी वेळीच पावले उचलली नाही, तर मात्र शांत वातावरण, आरोग्यदायी हवा असूनही पुण्याचे आरोग्य बिघडण्याचीच शक्यता अधिक आहे.

पहिल्या ४ दिवसांत ६ कोटींचा भरणा

0
0
महापालिकेच्या नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात अत्यंत चांगली झाली असून, पहिल्या चार दिवसांतच पालिकेच्या तिजोरीत सहा कोटींहून अधिक रकमेचा प्रॉपर्टी टॅक्स जमा झाला आहे. ३१ मे पर्यंत प्रॉपर्टी टॅक्स भरणाऱ्या मिळकतदारांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये पाच ते दहा टक्के सवलत दिली जाणार आहे.

१ तोळ्याची साखळी चोरली

0
0
बुधवार पेठेतील एका व्यावसायिकाला उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या बहाण्याने त्याच्या गळ्यातील एक तोळ्याची साखळी चोरून नेल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ईरप्पा कृष्णा हलगेकर (वय ५५, रा. बुधवार पेठ) यांनी पोलिसांत तक्रार केली आहे.

मोहोळ टोळीतील गुंडाकडून पिस्तुल जप्त

0
0
गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने शरद मोहोळ टोळीतील गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालिका अधिकाऱ्यांना पडला आश्वासनांचा विसर

0
0
बीआरटी मार्गावरील वाढत‌े अपघात लक्षात घेऊन पंधरा दिवसांत संपूर्ण बीआरटी रोडचे सेफ्टी ऑडिट करून त्याचा अहवाल पालिकेतील सभासदांना दिला जाईल, या आश्वासनाचा पालिकेतील अधिकाऱ्यांना विसर पडला आहे.

स्वयंसेवी संस्थेच्या प्रयत्नांनी ११ पादचारी सिग्नल पूर्ववत

0
0
वाहनांच्या गर्दीतून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे सुलभ व्हावे, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या पादचारी सिग्नलपैकी कोथरूड भागातील ११ बंद पडलेले सिग्नल ‘सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट’ (एसपीटीएम) संघटनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे महापालिकेने नुकतेच दुरूस्त केले.

‘कात्रज-हडपसर’चा सर्व्हे

0
0
शहराभोवतीच्या बहुचर्चित रिंग रोडचा प्रकल्प अहवाल तयार करण्याची तयारी ‘एईकॉम एशिया’ या अमेरिकन कंपनीने दाखविली असून, तूर्त कात्रज ते हडपसर या पहिल्या टप्प्याचा अहवाल तयार केला जाणार आहे.

डंख छोटा.... धोका मोठा

0
0
जागतिक आरोग्य संघटनेची घटना ७ एप्रिल १९४८ पासून अंमलात आली तेव्हापासून ७ एप्रिल हा जागतिक आरोग्यदिन म्हणून साजरा होतो. दरवर्षी सार्वजनिक आरोग्य समस्येच्या विशिष्ट पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक घोषवाक्य निवडले जाते व त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images