Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मोदी, राहुल गांधींच्या पुण्यात होणार सभा

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी ते काँग्रेसचे प्रचारप्रमुख राहुल गांधी यांच्यासह अनेक पक्षांतील नेते-अभिनेते आणि खेळाडू पुण्याच्या मतसंग्रामात तलवारी उपसणार आहेत.

‘व्हिजन पुणे’साठी चारही उमेदवार ‘मटा’त ‘एकत्र’!

$
0
0
‘पुण्याचा समतोल विकास साधायचा असेल, तर पायाभूत सुविधांपासून मूलभूत साधन-सुविधांची संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे… सार्वजनिक वाहतूकव्यवस्था सुधारण्यास अग्रक्रम देणे आवश्यक आहे… विकास आराखड्यापासून रस्तेआखणीपर्यंतच्या कामात सुसूत्रता आणणे महत्त्वाचे ठरेल…

घरच्या कार्यासारखी ‘लगीनघार्इ’

$
0
0
कार्यकर्त्यांचा सततचा राबता..., महत्त्वाच्या निरोपांची देवाण-घेवाण..., उमेदवाराच्या पुढच्या कार्यक्रमांची आखणी..., काँग्रेसच्या छत्रीखाली एकवटलेल्या विभागांचा स्वतंत्र कारभार... अन् निवडणुकीच्या धामधुमीत कार्यकर्त्यांच्या हक्काचं आदरस्थान असलेलं काँग्रेस भवन आता पुरतं गजबजून गेलंय.

‘स्टार प्रचारकां’च्या सभांचे... आता रंगणार शब्दयुद्ध

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी ते काँग्रेसचे प्रचारप्रमुख राहुल गांधी यांच्यासह अनेक पक्षांतील नेते-अभिनेते आणि खेळाडू पुण्याच्या मतसंग्रामात तलवारी उपसणार आहेत.

बारावीचे हॉल तिकीटही हवे

$
0
0
‘जेईई-मेन’ परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रात जाताना विद्यार्थ्यांना ‘जेईई-मेन’च्या अॅडमिट कार्डच्या जोडीने बारावीचे हॉल तिकिटही पर्यवेक्षकांना दाखवावे लागणार आहे. पेन-पेपर पद्धतीची ‘जेईई-मेन’ रविवारी होत आहे.

‘पुणे शहर सुरक्षित कसे?’

$
0
0
बॉम्बस्फोट-चोऱ्या, अतिरेकी-नक्षलवाद्यांच्या कारवाया आणि बॉम्बस्फोट यांची टांगती तलवार असल्याने पुणेकर जीव मुठीत धरून जगत असताना पुणे सुरक्षित शहर कसे ठरले, असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना शुक्रवारी केला.

'ते' देश काय एकसंध ठेवणार?

$
0
0
‘ठाकरे बंधूंनी घरातील भांडण लोकसभेच्या वेशीवर टांगले आहे, जे घर एकसंध ठेवू शकत नाहीत, ते देश काय एकसंध ठेवणार,’ असा सवाल राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केला आहे.

‘दारू पार्टी’चे नाट्य

$
0
0
वैदूवाडी येथे पार्टी सुरू असून बिर्याणी, मद्य तसेच पैसे वाटप होत असल्याची तक्रारी निवडणूक आयोगाला शुक्रवारी सायंकाळी मिळाली... दक्षता पथक, चतुःशृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शहानिशा केली... संबंधितांकडे चौकशीही झाली... मात्र, त्या ठिकाणी सुरू होती ती बर्थ-डे पार्टी...

मोदी कुर्ता, मिनिस्टर कोट

$
0
0
मोदी कुर्ते, मिनिस्टर कोट, पीएम साड्या, चायनीज कॉलरचे शॉर्ट कुर्ते, लिननचे शर्ट, राजनीती कुर्ता इथंपासून इरकली, राजकोटी, व्यंकटगिरी, गडवाल अशा ‘सोबर’ साड्या... ... एरवी शेरवानी, पैठणी, सूट-सफारी, धोती-कुर्त्याच्या भरजरी फॅशनने खुलणारी बाजारपेठेत सध्या अशा शब्दांचे ‘ट्रेडिंग’ आहे.

उपग्रह विकासाला नवी दिशा

$
0
0
भारताच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचे (पीएसएलव्ही-सी २४) श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रातून शुक्रवारी यशस्वी प्रक्षेपण झाले. या पीएसएलव्हीने ‘इंडियन रिजनल नेव्हीगेशन सॅटेलाइट सिस्टीम’मधील (आयआरएनएसएस १ बी) दुसऱ्या दिशामार्गदर्शक उपग्रहाला २८३ बाय २०,६३० किलोमीटरच्या कक्षेत प्रस्थापित केले.

मूर्तिमंत आम आदमी

$
0
0
प्रा. सुभाष वारे हे मान्यताप्राप्त पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते. सामाजिक कार्यकर्ता म्हटले की पाठीवर विंचवाचे बिऱ्हाड आलेच. आधी छात्रभारती आणि नंतर राष्ट्र सेवा दलाच्या कामाच्या व्यापामुळे पायाला सतत भिंगरीच असायची. छात्रभारतीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी संपूर्ण राज्य पालथे घातले.

हाडाचा कार्यकर्ता...

$
0
0
झुंजूमंजू झाले की दीपकभाऊंचा नित्यक्रम सुरू होतो व्यायामाने. दिवसभर कराव्या लागणाऱ्या कष्टांसाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे त्यांना महत्त्वाचे वाटते. त्यामुळे सकाळचा पहिला प्रहर व्यायामाचा ठरलेला. सकाळची आन्हिके उरकल्यावर दिवसभरातील कामांवर एक नजर टाकली जाते आणि दहा वाजता दीपक पायगुडेंची पावले घराबाहेर पडतात.

शिस्तप्रिय अन् मृदुभाषी!

$
0
0
सकाळी सहा ते मध्यरात्री दोन-अडीच... असा रोजचा दिनक्रम असेल, तर कोणतीही व्यक्ती काही दिवसांतच आजारी पडेल, हे सांगायला नको. परंतु, काँग्रेससारख्या देशव्यापी आणि तळा-गाळापर्यंत पसरलेल्या पक्षाचा उमेदवार म्हणून संधी मिळाली, तर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी घड्याळाच्या काट्यांशी स्पर्धा करताना दिवसातले २४ तासही अपुरे पडू लागतात, याचा अनुभव विश्वजित कदम गेल्या काही दिवसांपासून घेत आहेत.

कडक शिस्तीचे बहुपेडी व्यक्तिमत्त्व

$
0
0
अगदी कट्टर विरोधकही एखाद्या गैरप्रकाराबाबत बोट दाखवू शकणार नाही, अशी पुण्यातील सर्वपक्षीय राजकीय वर्तुळात अनिल शिरोळे यांची ख्याती आहे.

मतदारांत संभ्रम का?

$
0
0
देशात मोदी लाट आहे, मात्र भाजपला बहुमत मिळणार नाही. काँग्रेसबद्दल प्रचंड संताप आहे, तरीही त्यांना १२५च्या आसपास जागा मिळतील... असे जनमत चाचण्यांतील निष्कर्ष पुढे येत आहेत. या ‘पिवळ्या’ निष्कर्षांमुळे मतदारांमध्ये चांगलाच गोंधळ माजत आहे. या संभ्रमावस्थेला नेमके कोणते घटक कारणीभूत आहेत?

वेबसाइट २१ एप्रिलपासून सुरू होणार

$
0
0
पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील अकरावीच्या प्रवेशांसाठीची वेबसाइट येत्या २१ एप्रिलपासून खुली होणार आहे. त्या आधारे विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

एमबीएच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेचे ‘सरप्राइज’

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या एमबीएच्या नव्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या सोमवारपासून ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने शुक्रवारी जाहीर केले.

कम्प्युटराइज्ड ‘लॉटरी’ पद्धतीमुळे पालकांचा हिरमोड

$
0
0
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठी शनिवारी काढण्यात आलेल्या ‘लॉटरी’साठी वापरण्यात आलेल्या कम्प्युटराइज्ड पद्धतीमुळे पालकांचा हिरमोड झाल्याचे चित्र पुण्यात अनुभवायला मिळाले.

मतदान टक्केवारी वाढल्यास राजकारणातील अधर्म दूर

$
0
0
‘देश घडवण्यासाठी धार्मिक, राजकीय मार्गदर्शनाची परंपरा समर्थ रामदास व शिवरायांपासून महाराष्ट्रात आहे. १०० टक्के मतदान करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्यानेच राजकारणातील अधर्म दूर होईल,’ असा विश्वास आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी शनिवारी व्यक्त केला.

प्रचारातही ‘आप’ची भिस्त आम आदमीवरच!

$
0
0
आम आदमी पक्षाने पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघांत उमेदवार उभे केले असले, तरी त्यांच्या प्रचारासाठी दिल्लीची कुमक मिळण्याची शक्यता दुरावली आहे. त्यामुळे दुसऱ्या फळीतील नेत्यांना प्रचारासाठी पाचारण करताना या पक्षाची ‘आम आदमी’वरच भिस्त राहणार असल्याचे चिन्ह आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images