Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सजणार ‘कालजयी कुमार गंधर्व’

$
0
0
अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये अलौकिक प्रतिभेने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ गायक पं. कुमार गंधर्व यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. ६) ‘कालजयी कुमार गंधर्व’ हा विशेष कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.

श्री रागात रंगलेला माहौल

$
0
0
‘श्री’ रागात झालेला मैफीलीचा श्रीगणेशा, स्वामी समर्थ उत्सवानं भारलेलं वातावरण आणि जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका मंजिरी कर्वे-आलेगावकर यांचे गोड स्वर अशी भक्तिरसात न्हालेली मैफील रसिकांनी अनुभवली.

भावपूर्ण गायकीनं रंगलेली संध्या

$
0
0
प्रसिद्ध नाट्यगीतं, ठाव घेणारे अभंग, कानांना तृप्त करणारी ठुमरी आणि रसिकमनाला स्पर्शून जाणारी गायकी अशी भावपूर्ण संध्या संगीतप्रेमींनी अनुभवली. निमित्त होतं रामनवमी उत्सवाचं. प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी यांचे सुरेल स्वर आणि तितकीच समर्पक दाद देणारा रसिक असा योग या मैफीलीत जुळून आला.

उलगडला स्वातंत्र्याचा कालपट

$
0
0
हुतात्म्यांचं योगदान, भूमिगत राहून स्वातंत्र्य चळवळीला योगदान देणारे क्रांतिकारक, स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणारे वीर असा १७५७ मध्ये झालेल्या प्लासीच्या लढाईपासून १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्यमिळेपर्यंतचा १९० वर्षांचा कालपट ‘आझादी के दिवाने’ या प्रदर्शनातून उलगडला.

पोलिस असल्याच्या बहाण्याने फसवणूक

$
0
0
कात्रज परिसरात मित्रासह चहा पिण्यास निघालेल्या दोघा ज्येष्ठ नागरिकांना पोलिस असल्याच्या बहाण्याने लुटल्याचा प्रकार घडला. यात एका ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल, सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटला.

गौरी गाडगीळला 'सलाम पुणे' पुरस्कार

$
0
0
'सलाम पुणे'च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या यंदाच्या महाराष्ट्र दिन सोहळ्यात पुण्यातील गौरी गाडगीळ या एका अभिनेत्री आणि खेळाडू असलेल्या विशेष मुलीला-' सलाम पुणे' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे असे येथे 'सलाम पुणे'चे अध्यक्ष शरद लोणकर आणि कार्याध्यक्ष संतोष चोरडिया यांनी जाहीर केले.

ठोस माहिती नसताना काढला खुन्याचा माग

$
0
0
कॅम्पमध्ये एका वाइन शॉपजवळ एका ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा खून करणाऱ्या आरोपीला लष्कर पोलिसांनी अटक केली. कुठलीही ठोस माहिती हाती नसताना अत्यंत चिकाटीने पोलिसांनी खुन्याचा माग काढला.

सरकारी कर्मचाऱ्यांची जातपंचायतींकडे पाठ

$
0
0
शासकीय सेवेत मागासवर्गीय जागेवर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जातपडताळणीचे दस्तऐवज मार्चअखेरपर्यंत जमा करण्याची शेवटची संधी देऊनही जातपंचायतींना कर्मचाऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला.

महामार्गांवर हवी सुरक्षा यंत्रणा

$
0
0
महामार्गावरील वाहतूक हा विषय दिवसेंदिवस चिंतेचा होतो आहे. काही दिवसांपूर्वी पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नऱ्हे येथे अपघात झाला आणि त्यानंतर पुन्हा या महामार्गावरील असणाऱ्या समस्यांची चर्चा झाली.

ग्रामीण महिलांची बचतीत दुपटीने वाढ

$
0
0
बचत गटांच्या माध्यमातून उद्योजकतेची कास धरलेल्या महिलांचे आर्थिक बचतीचे प्रमाण गेल्या तीन वर्षात दुपटीने वाढले असल्याचे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. तसेच त्यांना व्यवसायासाठी मिळणाऱ्या कर्जाचे प्रमाणही वाढले आहे.

पीएफ खात्याची माहिती मिळणार ताबडतोब

$
0
0
'एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) कार्यालयाने भविष्य निर्वाह निधी बुडविणाऱ्यांवर लक्ष ठेवणारे आणि कोणत्याही पीएफ खात्याची माहिती ताबडतोब देणारे सॉफ्टवेअर कार्यान्वित केले आहे.

स्वच्छतेसाठी ‘चालते व्हा’

$
0
0
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने पुणे डॉक्टर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने येत्या सहा एप्रिलला पुण्यातील रस्त्यावरून स्वच्छतेचा संदेश देत शहरातील सर्व डॉक्टर, विविध संस्थांचे कार्यकर्ते चालणार आहेत. पुणे वॉकेथॉन हा उपक्रम या निमित्ताने राबविला जाणार आहे.

जात पंचायतींची महापंचायत

$
0
0
भटक्या विमुक्त जमातींच्या जात पंचायतींमध्ये कालानुरूप बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने भटक्या विमुक्त जमाती संघटनेने जात पंचायतींची महापंचायत आयोजिली आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी दिली.

‘थर्ड एसी’च्या डब्यातील पडदे काढणार

$
0
0
बेंगळुरु-नांदेड रेल्वेमध्ये आगीची घटना घडल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे बोर्डाने थर्ड एसीच्या डब्यातील पडदे काढण्याचा निर्णय घेतला आहे. एक एप्रिलपासून या कामाला सुरुवात झाली असून आठवडाभरात ते काम पूर्ण करण्यात येणार आहे.

लोकसाहित्य समितीचे ४० लाख ‘लॅप्स’

$
0
0
गेल्या पावणेतीन वर्षे निधी मिळत नसल्याने मरणासन्न अवस्थेत असलेली लोकसाहित्य समिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ग्रंथप्रकाशन आणि अन्य उपक्रमांसाठी या समितीला राज्य सरकारकडून हिवाळी अधिवेशनात देण्यात आलेला चाळीस लाखांचा निधी लॅप्स झाल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रातही हवी पशुबळींवर बंदी

$
0
0
‘मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये देवासमोर पशुबळी देण्यावर बंदी घालण्यात आली असून, त्यांच्यापेक्षा तुलनेने पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्रात या प्रकारावर बंदी का घातली जात नाही,’ असा सवाल सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी उपस्थित केला आहे.

मुस्लिम उमेदवारांचा घटता टक्का

$
0
0
राज्यातील लोकसंख्येच्या १३.४ टक्के असलेल्या मुस्लिम समाजाच्या मतांवर सर्वच प्रमुख पक्षांचा डोळा असला, तरी त्यांच्या लेखी मुस्लिम समाज हा केवळ मतदारच आहे. राज्यातील ४८ मतदारसंघांपैकी अकोला मतदारसंघातून काँग्रेसने हिदायत पटेल यांना दिलेली उमेदवारी वगळता प्रमुख पक्षांनी मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्याचे औदार्य दाखविले नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.

इंजिनीअरिंग परीक्षांसाठी कॉलेज यंत्रणांवर विश्वास

$
0
0
इंजिनीअरिंगच्या ऑनलाइन परीक्षेमधील घोटाळ्यांबाबत कॉलेज पातळीवरील परीक्षा यंत्रणांना दोष देणारे पुणे विद्यापीठ इंजिनीअरिंगच्याच परीक्षांसाठी कॉलेजमधील यंत्रणांवर विश्वास टाकत आहे.

पुण्याबाहेरील विद्यार्थी ‘कट-ऑफ’?

$
0
0
पुणे आणि पिंपरी- चिंचवड भागातील कॉलेजांमध्ये अकरावीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पुण्याबाहेरील विद्यार्थ्यांपर्यंत केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची माहिती पोहोचविण्याची कोणतीही थेट सुविधा केंद्रीय प्रवेश समितीने अद्यापपर्यंत केली नाही.

चित्रपट संग्रहालयात मनुष्यबळाची उणीव

$
0
0
चित्रपटांना दीर्घायू मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात गेल्या काही वर्षांमध्ये रिक्त झालेल्या पंधरा जागांची भरतीच करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images