Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आरोपीचा कोर्टात आत्महत्येचा प्रयत्न

0
0
रेल्वेमध्ये चोरीकेल्याप्रकरणी कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याच्या रागातून दोघा आरोपींनी ब्लेडने हातावर वार करुन घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी शिवाजीनगर कोर्टात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

महामंडळाला देणार नवी ओळख

0
0
सासवड येथे झालेले संमेलन वादरहित करण्याची कामगिरी केलेल्या साहित्य महामंडळाला मराठी भाषेच्या विकासासाठी केलेल्या घोषणांचा विसर पडला आहे. परिणामी साहित्य संमेलन भरविणारी संस्था ही ओळख पुसण्यात महामंडळाला अद्याप तरी यश आलेले नाही.

अॅडमिट कार्ड नाही; तक्रार कोणाकडे करू?

0
0
‘जेईई-मेन’चे अॅडमिट कार्ड हातात नसेल, तर परीक्षा कशी द्यायची, याचे उत्तर राज्यातील एकाही यंत्रणेकडे नाही. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) काही पावले उचलत नाही, तोवर विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार, की नाही, या प्रश्नाचे उत्तर तरंगतच राहणार आहे.

विनयभंगाच्या घटना वाढल्या

0
0
शहरात सोनसाखळी आणि घरफोडीच्या गुन्हेगांराचा उच्छाद सुरू असतानाच आता महिला, लहान मुलींच्या विनयभंगाचे प्रकार वाढले आहेत. गेल्या दोन दिवसांत विनयभंगाच्या तीन घटना घडल्या असून, त्यात कोथरूड येथे महिलेचा तर सहकारनगर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्थलांतर

0
0
नवीन ग्रीन बिल्डिंगच्या उभारणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्थलांतर नवीन विभागीय आयुक्तालयात करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्याबरोबरच अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, महसूल शाखा, गृह शाखा व भूमी अभिलेख कार्यालयाचे येत्या दोन दिवसांत स्थलांतर होणार आहे.

जर्मनचा पेपर पाऊण तास उशीरा

0
0
पुणे विद्यापीठाच्या परीक्षांदरम्यान मंगळवारी बी. कॉमच्या विद्यार्थ्यांसाठीचा जर्मनचा पेपर तब्बल पाऊण तास उशीरा मिळाल्याने विद्यार्थ्यांना ‘वेट अँड वॉच’चे धोरण अवलंबवावे लागले.

शिफारसपत्रांचा अधिकार नगरसेवकांकडून काढणार?

0
0
पेशंटच्या वैद्यकीय खर्चाची बिले ​कमी किंवा रद्द करण्यासाठी नगरसेवकांकडून दिली जाणारी शिफारसपत्रे पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलला आर्थिक संकटात टाकणारी ठरत आहेत. त्यामुळे नगरसेवकांच्या शिफारसपत्रांची पद्धत बंद करून याबाबतचे सर्वाधिकार बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.

मतांचा ‘जोगवा’ अन् सोसला थकवा

0
0
निवडणुकीच्या मतसंग्रामात प्रत्येक पक्षाचा उमेदवार पदयात्रा, कोपरा सभा, मेळावे आदींच्या माध्यमातून अखेरच्या मतदारापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो. त्याचाच आजपासून हा ‘आँखो देखा हाल’…

उपस्थित राहूनही शिक्षकांना नोटीस

0
0
मतदान प्रशिक्षण कार्यक्रमाला पूर्णवेळ हजर राहूनही मॉडर्न हायस्कूल मुलांची या शाळेतील मुख्याध्यापकांसह ४५ शिक्षकांना अनुपस्थित दाखवून जिल्हा प्रशासनातर्फे नोटीस बजाविण्यात आली आहे. या प्रकरणी तुमच्यावर फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस आल्याने या शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.

‘एक खिडकी’ चे हेलपाटे वाचणार

0
0
पुणे पोलिस आयुक्तालयाकडून ‘एक खिडकी’ योजनेसाठी तीन सहायक आयुक्तांसह सात अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ अशा चारही मतदार लोकसभा मतदार संघासाठी हे अधिकारी काम पाहणार असल्याचे विशेष शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

निळ्या कानाचा खंड्या आढळला

0
0
प्रदूषणमुक्त जिवंत झरा आणि संवेदनशील नैसर्गिक अधिवासाचे प्रतिक असलेला निळ्या कानाचा खंड्या हा दुर्मिळ पक्षी नुकताच गुहागर परिसरामध्ये आढळून आला आहे. वन्यजीव छायाचित्रकार राजा पुरोहित यांनी त्याल्या कॅमेऱ्यात टिपले आहे.

दोन कोटींचा घोटाळा

0
0
जिल्हा परिषदेमार्फत महिलांना देण्यात येणाऱ्या व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये सुमारे दीड कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

खडकवासल्यावर विशेष ‘वॉच’

0
0
बारामती लोकसभा मतदारसंघात असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जास्त असतानाही विरोधी पक्षांना यश मिळत आले आहे. कायम दगाफटका करणाऱ्या या भागाकडे राष्ट्रवादी काँग्रेसने विशेष लक्ष ठेवले आहे.

पुण्यातील मतदारांना ‘न्याय’!

0
0
लोकसभा निवडणुकीसाठी २२ मार्चपर्यंत मतदार नोंदणीचा अर्ज भरलेल्या नव्या मतदारांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या नव्या मतदारांची नावे असलेली पुरवणी मतदार यादी येत्या दोन दिवसांत निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे.

पालिकेने सोडले २ कोटींवर पाणी

0
0
फुरसुंगी येथील कचरा प्रकल्प चालविण्यासाठी महापालिकेने हंजर कंपनीकडून दोन कोटी रूपयांची बँक गॅरंटी घेणे गरजेचे होते. मात्र गेल्या पाच वर्षात पालिकेतील अधिकाऱ्यांनी हंजरकडून ही गॅरंटी न घेता त्यावर पाणी सोडले असून उलट वीजबील भरण्यासाठी हंजरला लाखो रूपयांची मदतच केल्याचे समोर आले आहे.

अभिनयातील करिअरची ‘दिशा’

0
0
१० दिवसांची कार्यशाळा म्हटलं, की आपल्या डोक्यात पहिला विचार येतो, तो १० दिवस काही विशिष्ट खेळ, उपक्रम आणि त्यानंतर ‘टा टा, बाय बाय’. ‘स्नेह’तर्फे आयोजिण्यात आलेली ‘दिशा’ ही कार्यशाळा या बाबतीत मात्र वेगळी ठरते.

अरभाटच्या दुसऱ्या पर्वाचं आज उद्‍घाटन

0
0
अरभाट शॉर्ट फिल्म क्लबच्या दुसऱ्या पर्वाचं उद्‍घाटन गुरुवारी (३ एप्रिल) संध्याकाळी साडेसहा वाजता राष्ट्रीय फिल्म संग्रहालय इथं होणार आहे. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, किरण यज्ञोपवित, अविनाश अरुण, श्रीहरी साठे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

कलाकारांसाठी कलाविश्व २०१४

0
0
चित्रलिला निकेतन कला महाविद्यालय आणि शिवस्फूर्ती प्रतिष्ठान यांच्यातर्फे ‘कलाविश्व २०१४’ या राज्यस्तरीय कलामहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. चित्रकलेचे शिक्षक आणि विद्यार्थी अशा सगळ्यांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.

प्राणीविश्वाची रंजक सफर

0
0
सर्वसामान्य माणसाला जंगलातील, अभयारण्यातील ज्या रस्त्यांवरून सहज चालत जाता येत नाही, खरंतर चालण्यास परवानगी नसते, त्या रस्त्यांवरून राज्याचे माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक म्हणून प्रकाश ठोसरे यांना फिरावं लागायचं.

नवे शब्द, नव्या स्वरांना वाटवे करंडकाचं व्यासपीठ

0
0
नवखे, हौशी कवी, संगीतकार, गायक-गायिका यांच्या सांघिक प्रयत्नांना वाव देण्यासाठी ‘नवे शब्द, नवे सूर’ ही गजाननराव वाटवे करंडक स्पर्धा स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजिण्यात आली आहे. राज्य पातळीवर आयोजिण्यात आलेल्या या स्पर्धेची संकल्पना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष (कै.) सुधीर मोघे यांची आहे. हे या स्पर्धेचं चौथं वर्ष आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images